साधु सुंदर सिंग ( जन्म ३ सप्टेंबर , १८८९:पंजाब,लुधियाना ) हे एक भारतीय ख्रिस्ती मिशनरी होते. जे संभवत: १९२९ मधे हिमालयाच्या पायथ्याशी मरण पावले.

सुरुवातीचा काळसंपादन करा

सुंदर सिंग यांचा जन्म एका श्रीमंत शीख घरात झाला. त्यांच्या आई अतिशय धार्मिक वृत्तीच्या होत्या व त्यांना नेहमी साधु संताच्या सहवासात राहण्यासाठी नेत असत. सुंदर सिंग यांना लुधियाना मधील एका ख्रिस्ती मिशनरी शाळेत भरती केले. सुंदर सिंग १४ वर्षांचे असताना त्यांच्या आई मरण पावल्या. त्यामुळे ते अतिशय निराश झाले व त्यांनी आपला सर्व राग ख्रिस्ती मिशनरींवर काढला. त्यांनी बायबलची पाने फाडून जाळली जे त्यांच्या मित्रांनी पाहिले.

ख्रिस्ती धर्माचा स्वीकारसंपादन करा

बायबल फाडून जाळल्यानंतर काही दिवसांनी अतिशय बेचैन झाल्यामुळे सुंदर सिंग यांनी रेल्वे खाली आत्महत्या करण्याचे ठरविले. त्या रात्री त्यांनी थंड पाण्याने आंघोळ केली व म्हटले की, ईश्वराने मला दर्शन द्यावे अन्यथा मी आत्महत्या करीन. त्या रात्री प्रभु येशू ख्रिस्ता ने सुंदर सिंग यांना दर्शन दिले. त्याच वेळी त्यांनी जाऊन आपले वडिल शेर सिंग यांना सांगितले की मी ख्रिस्ती होणार व ख्रिस्ताचे मिशनरी कार्य करणार. [१]कृपया स्वत:च्या शब्दात परिच्छेद लेखन करून या लेखाचा / विभागाचा विस्तार करण्यास मदत करा.
अधिक माहितीसाठी या लेखाचे चर्चा पान, विस्तार कसा करावा? किंवा इतर विस्तार विनंत्या पाहा.
  1. ^ https://en.wikipedia.org/wiki/Sadhu_Sundar_Singh