मराठी विकिपीडिया एक विश्वकोश असल्यामुळे मजकूर विश्वकोशास साजेशा स्वरूपात बसवावा लागतो, म्हणजे काय ते आपण खाली पुढे पाहू, परंतु आपल्या लेखनाबद्दल दिलेले कोणतेही संदेश केवळ पुर्नलेखनाची विनंतीच असतात. असे पुर्नलेखन तुम्ही स्वतःच पूर्ण केले पाहिजे असेही नाही, इतर मंडळींकरिता ते तसेच सोडले तरीही चालते. त्यामुळे आपण आपले इतर लेखन किंवा वाचन चालू ठेवून खालील सहाय्यपर लेखन सुद्धा आपल्या सवडीने जरूर तेवढेच वाचू शकता.
आपण लेखन केलेल्या लेखानापुढे शीर्षकलेखन संकेत, पुर्नलेखन, विकिकरण, संदर्भ द्या, व्यक्तिगत मते, शुद्धलेखन, पक्षपात, पूर्वग्रह अशा अर्थाचे काही संदेश, लेखन करणार्या संपादकास घाबरवण्याकरिता नव्हे तर आपल्या सारख्या नवागत सदस्यांच्या लेखनाकडे नियमित जाणत्या सदस्यांचे लक्ष जावे आणि विकिपीडियाच्या स्वरूपास अनुकूल विकिकरण (बदल) करण्यास आपल्याला सहाय्य आणि सहयोग उपलब्ध व्हावा, असे असते आणि कालौघात लेखात दर्जात्मक सुधारणा व्हावी असा उद्देश असतो.
त्या शिवाय, असा संदेश कुणी लावला आहे ते लेखाच्या इतिहासात पाहून संबंधीत सहसंपादकाच्या चर्चा पानावर लेखाच्या चर्चा पानावर, चावडी, मदत केंद्र इत्यादी ठिकाणी आपण आपले शंका निरसन करून घेऊ शकता. असे संदेश लावण्यात आपल्यालाही पुढाकार घ्यावयाचा असेल तर विकिपीडियाचा दर्जा सांभाळण्याच्या अमूल्य कार्यात विकिपीडिया:पहारा आणि गस्त ,विकिकरण आणि इतर विवीध समन्वय प्रकल्पात आपण स्वतः सुद्धा सहभागी होऊ शकता.
मराठी विकिपीडिया केवळ एक विश्वकोश आहे.संबधीत माहिती संबधीत प्रकरणात (लेखात) लिहिणे अपेक्षीत असते.
विश्वकोशांना स्वतःचा विशिष्ट वाचकवर्ग असतो. त्याला येथे केवळ विश्वासार्ह, संक्षिप्त(मोजके) साक्षेपी(संदर्भ असलेली काही विरूद्ध मते असल्यास, त्याच्या सह) शक्य तेथे संदर्भ असलेली वस्तुनिष्ठ(Objective) आणि तटस्थपणे (impartial) दिलेली माहिती वाचण्याची अपेक्षा असते.
(इथे वाचकांना रूक्षता अपेक्षित नसते, पण निव्वळ ज्ञान आणि माहिती हवी असते. वाचकाचा दृष्टीकोण आम्ही मोजक्या Facts आणि statistics सह वाचतो. आम्हाला इतरांची परस्परविरोधी मते विशिष्ट संदर्भासहीत सांगा, पण आमचे मत प्रभावित करण्याकरिता तुमच्या स्व:चे मत स्वतः त्यात मिसळू नका असा असतो.)
सारे विश्वकोश विश्वकोशाची विश्वासार्हता जपण्याकरिता सहसा वस्तुनिष्ठ लेखन करण्याचा संकेत पाळत असतात.त्यामुळे शब्दांचा(स्वतः जोडलेल्या विशेषणांचा) फुलोरा, स्वतःच दिलेला व्यक्तिगत दुजोरा, इत्यादी ललित लेखनाच्या किंवा ब्लॉग या स्वरूपातील लेखन टाळणे अपेक्षीत असते.
ललित लेखनाच्या किंवा ब्लॉग स्वरूपातील लेखन आपल्या आवडीचा किंवा सवयीचा भाग असेल तर, विकिपीडियात लिहिण्याच्या दृष्टीने, आपण आधी मराठी विकिपीडियात आधीपासून असलेल्या एखाद दुसर्या लेखांमध्ये भर घालून पाहू शकता, मुखपृष्ठ सदर म्हणून मागे निवडले गेलेले लेख अभासू शकता अथवा धूळपाटी येथे कच्चे लेखन करून इतर संपादकांचे सहाय्य घेऊन ते बरोबर करून घेऊ शकता .
आपल्याला इतर नवागत सदस्यांकडून काय चुका होतात हे नवीन सदस्यांकडून होणार्या सर्वसाधारण संपादन त्रूटी लेखात जाणून घेता येईल.आणि विकिपीडियाच्या इतर मर्यादांची माहिती विकिपीडिया:विकिपीडियाच्या मर्यादा या लेखात घेता येईल.
माहीतगार १०:४०, ४ सप्टेंबर २००९ (UTC)