रामचंद्र गणेश कुंदगोळकर

हिंदुस्थानी शास्त्रीय संगीत गाणारे एक गायक
(सवाई गंधर्व या पानावरून पुनर्निर्देशित)

सवाई गंधर्व (१९ जानेवारी १८८६, २ सप्टेंबर १९५२) हे हिंदुस्थानी शास्त्रीय संगीत गाणारे गायक हे गंधर्व परंपरेतील एक गायक होते. त्यांचे मूळ नाव रामभाऊ कुंदगोळकर (पूर्ण नाव : रामचंद्र गणेश कुंदगोळकर) होते.

रामचंद्र गणेश कुंदगोळकर

सवाई गंधर्व
उपाख्य सवाई गंधर्व
आयुष्य
जन्म १९ जानेवारी १८८६
जन्म स्थान कुंदगोळ, (धारवाड), कर्नाटक, भारत
मृत्यू १२ सप्टेंबर १९५२
व्यक्तिगत माहिती
धर्म हिंदू
नागरिकत्व भारतीय
देश भारत ध्वज भारत
भाषा मराठी, कन्नड
पारिवारिक माहिती
वडील गणेश कुंदगोळकर
संगीत साधना
गुरू उस्ताद अब्दुल करीम खॉं
गायन प्रकार हिंदुस्तानी शास्त्रीय संगीत, भजन, अभंग,
घराणे किराणा घराणे
संगीत कारकीर्द
पेशा गायकी

रामभाऊंच्या कुटुंबात संगीताची विशेष पार्श्वभूमी नसताना त्यांनी संगीतामध्ये रुची वाढविली आणि उस्ताद अब्दुल करीम खान यांच्या मार्गदर्शनाखाली हिंदुस्थानी शास्त्रीय संगीताच्या अभ्यासाला प्रारंभ केला. तेथील अभ्यास पूर्ण केल्यानंतर रामभाऊ एका नाटक कंपनीत सामील झाले आणि थोड्याच काळात मराठी रंगभूमीवर त्यांनी स्वतःचे स्थान निर्माण केले. नारायण श्रीपाद राजहंस यांना ज्याप्रमाणे लोक बालगंधर्व म्हणून ओळखू लागले, त्याचप्रमाणे रामभाऊ कुंदगोळकरांना लोक सवाई गंधर्व या नावाने ओळखू लागले. त्यांनी गायलेली मराठी नाट्यसंगीतातील काही पदे अजरामर झाली आहेत.

ख्यातनाम गुरू आणि मार्गदर्शक

संपादन

व्यक्तीच्या गुणवत्तेचा खरा कस अनेक ठिकाणी लागतो, त्यातील सर्वाधिक उच्च दर्जाची कसोटी म्हणजे ती व्यक्ती इतरांमध्ये असलेल्या गुणवत्तेला कसे फुलविते, त्यांना कसा वाव देते व मार्गदर्शन करते. सवाई गंधर्व या मूल्याधारित कसोटीवर सर्वाधिक खरे उतरले आहेत. किराणा घराण्याची परंपरा यशस्वीरीत्या पुढे नेणाऱ्या आणि अधिकच उजळविणाऱ्या त्यांच्या शिष्यपरंपरेतील गायक/गायिकाच नव्हे तर संपूर्ण भारतीय शास्त्रीय संगीत क्षेत्र आज त्यांचे ऋणी आहे. सवाई गंधर्वांच्या शिष्यांपैकी काही नावे म्हणजे भीमसेन जोशी, बसवराज राजगुरू, गंगूबाई हनगळ, वगैरे. यापैकी पंडित भीमसेन जोशी यांनी पुण्याला त्यांच्या गुरूंच्या स्मरणार्थ दरवर्षी होणारा सवाई गंधर्व संगीत महोत्सव सुरू केला.

मास्तर कृष्णराव फुलंब्रीकर यांनी त्यांची सांगीतिक कारकीर्द नाट्यकला प्रवर्तक नाटक मंडळीत बाल गायक-नट म्हणून सुरू केली होती. तिथे त्यांना काही काळ सवाई गंधर्वांकडून नाट्य संगीताचे प्राथमिक मार्गदर्शन लाभले. त्यावेळी सवाई गंधर्व हे नाटक दौऱ्यांमध्ये अत्यंत व्यस्त असल्यामुळे मास्तरांनी पं. भास्करबुवा बखले यांच्याकडे शास्त्रीय संगीताचे समग्र शिक्षण घेतले.

संदर्भ

संपादन