सलमान, सौदी अरेबिया

सलमान बिन अब्दुलअझीझ अल सौद (अरबी: سلمان ابن عبد العزيز آل سعود; ३१ डिसेंबर १९३५) हा पश्चिम आशियातील सौदी अरेबिया देशाचा विद्यमान राजा आहे. २३ जानेवारी २०१५ रोजी सावत्र भाऊ व तत्कालीन राजा अब्दुल्ला ह्याच्या मृत्यूनंतर सलमान राज्यपदावर आला.

सलमान बिन अब्दुलअझीझ अल सौद
Salman bin Abdull aziz December 9, 2013.jpg

विद्यमान
पदग्रहण
२३ जानेवारी २०१५
मागील अब्दुल्ला

जन्म ३१ डिसेंबर, १९३५ (1935-12-31) (वय: ८७)
रियाध
वडील अल-सौद
धर्म सुन्नी इस्लाम
अब्दुल्ला रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमिर पुतिनसोबत

३१ डिसेंबर १९३५ रोजी रियाध येथे जन्मलेला सलमान अल-सौदचा २५वा मुलगा होता. १९६३ ते २०११ दरम्यान रियाध प्रांताचा राज्यपाल राहिलेला सलमान २०११ पासून सौदी अरेबियाचा संरक्षणमंत्री होता. १६ जून २०१२ रोजी सलमान सौदी राजघराण्याचा युवराज बनला.

हे सुद्धा पहासंपादन करा

बाह्य दुवेसंपादन करा