सर्बानंद सोनोवाल

(सर्वनंद सोनोवल या पानावरून पुनर्निर्देशित)

सर्बानंद सोनोवाल (आसामी: সৰ্বানন্দ সোণোৱাল; ३१ ऑक्टोबर, इ.स. १९६२) हे एक भारतीय राजकारणी, विद्यमान राज्यसभा सदस्य व केंद्रीय मंत्रीमंडळात बंदर व जलवाहतूक मंत्री व आयुष मंत्री आहेत. ते आसाम राज्याचे माजी मुख्यमंत्री आहेत. २०१६ सालच्या आसाम विधानसभा निवडणुकीत भारतीय जनता पक्षाला स्पष्ट बहुमत मिळाले. भाजपच्या विधीमंडळाचे नेते असलेल्या सोनोवालांनी २४ मे २०१६ रोजी मुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली व १० मे २०२१ पर्यंत मुख्यमंत्रीपदाचा कार्यभार सांभाळला.

सर्बानंद सोनोवाल

बंदर व जलवाहतूक मंत्री
विद्यमान
पदग्रहण
७ जुलै २०२१
पंतप्रधान नरेंद्र मोदी
मागील मनसुख मांडवीय

विद्यमान
पदग्रहण
७ जुलै २०२१
पंतप्रधान नरेंद्र मोदी
मागील श्रीपाद येस्सो नाईक

राज्यसभा सदस्य
विद्यमान
पदग्रहण
१ ऑक्टोबर २०२१

कार्यकाळ
२४ मे २०१६ – १० मे २०२१
मागील तरुण गोगोई
पुढील हिमंता बिस्वा सरमा

युवक कल्याण व क्रीडामंत्री
कार्यकाळ
२६ मे २०१४ – २३ मे २०१६
पंतप्रधान नरेंद्र मोदी
मागील जितेंद्र सिंह

लोकसभा सदस्य
कार्यकाळ
मे २०१४ – मे २०१६
मतदारसंघ लखीमपूर
कार्यकाळ
२००४ – २००९
मतदारसंघ दिब्रुगड

जन्म ३१ ऑक्टोबर, १९६२ (1962-10-31) (वय: ६२)
दिंजन, दिब्रुगढ जिल्हा, आसाम
राजकीय पक्ष भारतीय जनता पक्ष

सोनोवाल सोळाव्या लोकसभेचे सदस्यभारताच्या केंद्रीय मंत्रिमंडळातील माजी युवक कल्याण व क्रीडामंत्री आहेत (२०१४-२०१६). ते एम्‌.एल्‌‍एल. बी.सी.जे. (मास्टर ऑफ लॉज-बॅचलर ऑफ क्रिमिनल जस्टिस) असून व्यवसायाने वकील आहेत.

इ.स. १९९२ ते १९९९ या कालावधीत सर्वानंद हे आसाम राज्याच्या राजकारणातील प्रभावशाली असून सहा वर्षे आसाम आंदोलनाचे नेतृत्व करणाऱ्या ऑल आसाम स्टुडंट्स युनियन (आसू) या विद्यार्थी संघटनेचे अध्यक्ष होते. 'इल्लीगल मायग्रंट डिटरमिनेशन बाय ट्रिब्युनल' (आयएमडीटी) या बेकायदा स्थलांतरितांसंबंधीच्या कायद्याला सर्वोच्च न्यायालयात आव्हान दिल्यानंतर ते प्रसिद्धीच्या झोतात आले. १९९६ ते २००० दरम्यान त्यांनी 'नॉर्थ ईस्ट स्टुडंट्स ऑर्गनायझेशन'चे (एनईएसओ) अध्यक्ष म्हणूनही काम पाहिले. सोनोवाल सर्वप्रथम २००१ साली मोरन विधानसभा मतदारसंघातून आमदार झाले होते. परंतु २००४ साली झालेल्या लोकसभा निवडणुकीत ते दिब्रुगडमधून निवडून गेले होते. त्यांनी ८ फेब्रुवारी २०११ रोजी भारतीय जनता पक्षात प्रवेश केला. सुरुवातीला पक्षाच्या राष्ट्रीय कार्यकारिणीत आणि नंतर आसाम राज्यातील भाजपचे प्रवक्ते म्हणून त्यांची नियुक्ती करण्यात आली.

पुढे २०१२मध्ये सोनोवाल यांना प्रदेशाध्यक्ष करण्यात आले. २०१६ साली २८ जानेवारीला पक्षाने त्यांना आसामच्या मुख्यमंत्रिपदाचे उमेदवार म्हणून जाहीर केले.