सरदारी बेगम
सरदारी बेगम हा श्याम बेनेगल दिग्दर्शित १९९६ चा भारतीय संगीतमय चित्रपट आहे. या चित्रपटात किरण खेर, अमरीश पुरी, रजित कपूर आणि राजेश्वरी सचदेव यांच्या भूमिका आहेत.
1996 film by Shyam Benegal | |||
माध्यमे अपभारण करा | |||
विकिपीडिया | |||
प्रकार | चलचित्र | ||
---|---|---|---|
मूळ देश | |||
संगीतकार |
| ||
पटकथा |
| ||
निर्माता |
| ||
दिग्दर्शक | |||
प्रमुख कलाकार | |||
प्रकाशन तारीख |
| ||
| |||
चित्रपटाची मुख्य अभिनेत्री किरण खेर हिला १९९७ चा राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार - विशेष ज्युरी पुरस्कार मिळाला व राजेश्वरी सचदेव यांना सर्वोत्कृष्ट सहाय्यक अभिनेत्रीचा राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार मिळाला.
हा चित्रपट कौटुंबिक नातेसंबंध, पिढ्यानपिढ्या आणि लैंगिक राजकारणाच्या गुंतागुंतीच्या चित्रावर तसेच भारतातील सामाजिक गोष्टींवर लक्ष केंद्रित करतो.[१]
पुरस्कार
संपादनजुलै १९९७ मध्ये सादर झालेल्या ४४ व्या राष्ट्रीय चित्रपट पुरस्कारांमध्ये या चित्रपटाने ३ पुरस्कार जिंकले.[२][३]
- राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार - सर्वोत्कृष्ट सहाय्यक अभिनेत्री : राजेश्वरी सचदेव
- उर्दूमधील सर्वोत्कृष्ट फीचर फिल्म : निर्माते: अमित खन्ना आणि महेश भट्ट, दिग्दर्शक: श्याम बेनेगल
- विशेष ज्युरी पुरस्कार : किरण खेर
- इतर
- १९९७: २० वा मॉस्को आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव : गोल्डन सेंट जॉर्ज: श्याम बेनेगल : नामांकित [४]
संदर्भ
संपादन- ^ Sardari Begum at imagineindia Archived 2007-09-10 at the Wayback Machine.
- ^ "44th National Film Awards". International Film Festival of India. 5 May 2014 रोजी मूळ पान पासून संग्रहित. 13 May 2012 रोजी पाहिले.
- ^ "44th National Film Awards (PDF)" (PDF). Directorate of Film Festivals. 13 May 2012 रोजी पाहिले.
- ^ "20th Moscow International Film Festival (1997)". MIFF. 22 March 2013 रोजी मूळ पान पासून संग्रहित. 2013-03-22 रोजी पाहिले.