राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार, सर्वोत्कृष्ट सहायक अभिनेत्री

ナショナル・フィルム・アワード 助演女優賞 (ja); National Film Award de la meilleure actrice dans un second rôle (fr); Penghargaan Film Nasional untuk Aktris Pendukung Terbaik (id); قومی فلم اعزاز برائے معاون اداکارہ (ur); National Film Award/Beste Nebendarstellerin (de); Национальная кинопремия за лучшую женскую роль второго плана (ru); राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार, सर्वोत्कृष्ट सहायक अभिनेत्री (mr); భారత జాతీయ చలనచిత్ర పురస్కారాలు - ఉత్తమ సహాయ నటి (te); جائزة الفيلم الوطني لأفضل ممثلة مساعدة (ar); National Film Award for Best Supporting Actress (en); Ազգային կինոմրցանակ երկրորդ պլանի կնոջ լավագույն դերակատարման համար (hy); শ্রেষ্ঠ পার্শ্ব অভিনেত্রী বিভাগে জাতীয় চলচ্চিত্র পুরস্কার (ভারত) (bn); राष्ट्रीय फ़िल्म पुरस्कार - सर्वश्रेष्ठ सहायक अभिनेत्री पुरस्कार (hi) film award (en); ఉత్తమ సహాయ నటికి జాతీయ చలనచిత్ర పురస్కారం (te); film award (en); կինոմրցանակ (hy); جائزة سينمائية (ar) Национальная кинопремия (Индия) за лучшую женскую роль второго плана (ru); ナショナル・フィルム・アワード 最優秀助演女優賞 (ja)

राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार, सर्वोत्कृष्ट सहायक अभिनेत्री ही राष्ट्रीय चित्रपट पुरस्कारांमधील एक श्रेणी आहे. भारतातील माहिती व प्रसारण मंत्रालयाने स्थापन केलेल्या डायरेक्टरेट ऑफ फिल्म फेस्टिव्हलद्वारे दरवर्षी हे पुरस्कार सादर करण्यात येतात.[] हा सहायक भूमिकेत सर्वोत्कृष्ट कामगिरी बजावणाऱ्या कलाकारास सादर केला जातो. हा एक रजत कमल पुरस्कार आहे. २०१७ला या पुरस्कारात रजत कमल, प्रमाणपत्र आणि रोख रक्कम असे पारितोषिकात समाविष्ट होते. नवी दिल्ली येथे आयोजित कार्यक्रमात राष्ट्रपतींच्या हस्ते हा पुरस्कार प्रदान केला जातो.[]

राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार, सर्वोत्कृष्ट सहायक अभिनेत्री 
film award
माध्यमे अपभारण करा
  विकिपीडिया
प्रकारराष्ट्रीय चित्रपट पुरस्कार,
सर्वोत्तम सहाय्यक अभिनेत्री पुरस्कार
स्थान भारत
प्रायोजक
अधिकृत संकेतस्थळ
अधिकार नियंत्रण
साचा:Translations:Template:Wikidata Infobox/i18n/msg-editlink-alttext/mr

राष्ट्रीय चित्रपट पुरस्कारांची स्थापना १९५४ मध्ये "उच्च सौंदर्याचा आणि तांत्रिक मानक आणि शैक्षणिक आणि संस्कृती मूल्य असलेल्या चित्रपटांच्या निर्मितीस प्रोत्साहित करण्यासाठी" केली गेली आणि प्रादेशिक चित्रपटांसाठी पुरस्कारांचा समावेश करण्याचे नियोजनही केले. पुरस्कार "चित्रपटांसाठी राज्य पुरस्कार" म्हणून स्थापित करण्यात आले होते. परंतु १९५६ मध्ये १५व्या राष्ट्रीय चित्रपट पुरस्कारांमध्ये त्याचे "राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार" असे नामकरण करण्यात आले.

राज्य पुरस्काराने १९८४ मध्ये सहायक अभिनेत्रीची श्रेणी सुरू केले गेली. जरी भारतीय चित्रपटसृष्टीने सुमारे २० भाषा आणि बोलीभाषांमध्ये चित्रपटांची निर्मिती केली असली तरी हिंदी, मल्याळम, तामिळ, बंगाली, मराठी, उर्दू, इंग्रजी, मणिपुरी, ओरिया आणि हरियाणवी अशा दहा प्रमुख भाषांमध्ये काम केलेल्या कलाकारांनी हे पारितोषिक मिळवले आहेत.

या पुरस्कारच्या पहिला प्राप्तकर्ता रोहिणी हट्टंगडी होत्या, ज्यांना हिंदी चित्रपट पार्टी (१९८४) मधील कामगिरीबद्दल ३२व्या राष्ट्रीय चित्रपट पुरस्काराने गौरविण्यात आले. २०१९ पर्यंत सुरेखा सिक्री यांना त्यांच्या हिंदी चित्रपटांसाठी तीन वेळा सन्मानित करण्यात आले आहे - तमस (१९८७), मम्मो (१९९४) आणि बधाई हो (२०१८). के. पी. ए. सी. ललिता यांनी अमरम (१९९०) आणि शांथम (२०००) मधील मल्याळम चित्रपटात काम केल्याबद्दल दोन वेळा हा पुरस्कार जिंकला. शिप ऑफ थीसियस (२०१३) या इंग्रजी-हिंदी चित्रपटातील कामगिरीबद्दल ६१व्या राष्ट्रीय चित्रपट पुरस्कारात गौरविण्यात आलेल्या इजिप्शियन अभिनेत्री ऐडा अल-काशिफ हा पुरस्कार जिंकणारी एकमेव अ-भारतीय अभिनेत्री आहे. उर्वशी आणि कल्पना हे सन्मान मिळालेले एकच बहीणींचे जोडपे आहे. १९९९, २०१२ आणि २०१३ या वर्षात दोन अभिनेत्रींमध्ये विभागून दिले गेले आहेत. सर्वोत्कृष्ट अभिनेत्री आणि सर्वोत्कृष्ट सहाय्यक अभिनेत्री अशा दोन्ही श्रेणींमध्ये शर्मिला टागोर, कोंकणा सेन शर्मा आणि कंगना राणावत या तीन अभिनेत्री आहेत. सर्वात अलिकडील प्राप्तकर्ता सुरेखा सिक्री आहे, ज्यांना बधाई हो (२०१८) या हिंदी चित्रपटातील अभिनयाबद्दल ६६व्या राष्ट्रीय चित्रपट पुरस्काराने गौरविण्यात आले.

संदर्भ

संपादन
  1. ^ "About National Film Awards". Directorate of Film Festivals. 25 ऑक्टोबर 2011 रोजी मूळ पानापासून संग्रहित. 8 नोव्हेंबर 2013 रोजी पाहिले.
  2. ^ "National Awards 2015, as it happened: Winners, wishes and morel". India Today. 3 मे 2015. 23 मे 2015 रोजी मूळ पानापासून संग्रहित. 21 मे 2015 रोजी पाहिले.