• श्री. नरसीकर यांचे सुभाषीत आठवून दिल्या बद्दल धन्यवाद !!
आपला,
(आभारी)विशुभाऊ रणदिवे १२:२१, १७ ऑगस्ट २०१० (UTC)
  • तसेच विकीचे नव-नविन खाचखळगे शिकवल्या बद्दल अजून एकदा अभार ++
आपला,
(नवशिक्या)विशुभाऊ रणदिवे १२:२४, १७ ऑगस्ट २०१० (UTC)
  • व‍र्गीकरणा बद्दल समजवल्या बद्दल धन्यवाद, पुढील लेख लिहीताना नक्की काळजी घेईन !
आपला,
(वर्गीकृत)विशुभाऊ रणदिवे ०८:५०, १८ ऑगस्ट २०१० (UTC)

नागद्वार

संपादन

नमस्कार!

काही मुद्द्यांबद्दल टिप्पणी मांडतो :

  1. सुमारे १ लाख लोकं येतात असा अंदाज : लेखात 'लोकं' असा शब्द लिहिला आहे. मुळात 'लोक' हा शब्द (माणसे या अर्थाने वापरल्यास) अनेकवचनीच आहे; त्यात एकवचनी रूप अव्यवहार्य गणले जाते. त्याचे योग्य लेखन व उच्चार 'लोक' असा होतो. कृपया लेखात इतरत्रही या शब्दासाठी दुरुस्ती करावी.
  2. कोरकू आदिवाश्यांसाठी वेगळा उपविभाग करण्याचे विश्वकोशीय प्रयोजन फारसे दिसले नाही.. जी माहिती नोंदवली आहे, ती अन्य उपविभागांतही सामावली जाऊ शकेल.
  3. यात्रेकरू, पायी यात्रा या उपविभागांऐवजी अजून सुटसुटीत व चपखल नाव असलेला एकत्रित विभाग करता येईल काय, ते एकदा विचार करून बघावे. मला वाटते 'यात्रा' (यात्रेचे टप्पे, तपशील, स्थाने इत्यादी गोष्टी) व 'यात्रेची व्यवस्था' असे दोन उपविभाग सध्याच्या माहितीला पुरेसे ठरावेत. अन्य संकीर्ण माहितीसाठी वाटल्यास 'संकीर्ण' असा विभाग करावा.

--संकल्प द्रविड (चर्चा | योगदान) ०४:०९, ७ ऑगस्ट २०१० (UTC)

प्रबंधकपदाची खोटी बतावणी

संपादन

नमस्कार! प्रबंधकपदाची खोटी बतावणी केल्याचे लक्षात आणून दिल्याबद्दल धन्यवाद! त्या सदस्याकडे तूर्तास स्पष्टीकरण विचारले आहे. त्याच्या उत्तरानुसार पुढील दिशा ठरवावी लागेल.

--संकल्प द्रविड (चर्चा | योगदान) ०५:४५, ८ ऑगस्ट २०१० (UTC)

माफ करा, पण खोटी बतावणी हा शब्दप्रयोग द्विरुक्ती आहे -मनोज २३:२६, १ ऑक्टोबर २०१० (UTC)

विक्रम साळुंखे

संपादन

विक्रम साळुंखे हे सदस्य मराठी विकिपीडियावरील प्रबंधक/प्रचालक नाहीत. त्यांनी कोणा प्रबंधकाचे सदस्य पान अलगद उचलून आपल्या सदस्यपानावर डकवले आहे. साळुंख्यांना प्रचालकपदाचे अधिकार नाहीत.

चौकसपणे लक्ष ठेवून संदेश दिल्याबद्दल धन्यवाद.

अभय नातू १५:१६, ८ ऑगस्ट २०१० (UTC)

नागद्वार

संपादन
वेळ निघेल तसे सविस्तर लिहिन माहितगार ०६:४६, १० ऑगस्ट २०१० (UTC)
चर्चा:नागद्वार पहावेत माहितगार १४:०१, १२ ऑगस्ट २०१० (UTC)

नमस्कार, तुम्हाला आवाज फाईल आवडल्याचे पाहून आनंद झाला, अंगावर मूठभर मांस चढल्यासारखे वाटले. सहज लिहितोय हे नो विकि आहे, या फाईलच्या इतिहास मध्ये लिहिता आले असते तर लिहिले असते हे रेकॉर्डींग करतांना एक हात आणि एक कॅमेरा मोडला. पण चलता है. तुम्हाला रेकॉर्डींग आवडले म्हटल्यावर क्षणात सर्व विसरलो, कष्टाचे चीज झाले. Gypsypkd ०६:५९, ११ ऑगस्ट २०१० (UTC)

मोक्षगुंडम विश्वेश्वरय्या

संपादन

नमस्कार! आता तुम्ही काय सांगत होतात, ते कळले. :) संध्याकाळी जरा निवांत वेळी दोन्ही लेखांचे मजकूर एकत्र करून एकाच लेखाकडे पुनर्निर्देशन करीन.

--संकल्प द्रविड (चर्चा | योगदान) ०३:०१, १७ ऑगस्ट २०१० (UTC)

एक विनंती

संपादन
आपण मराठी विकिपीडियातील अनुभवी आणि जाणते सदस्य आहात.मराठी विकिपीडियास नेहमीच प्रचालन कार्याची निकड असते त्यातही नवीन युजेबिलिटी इनिशिएटीव्ह अंतर्गत व्हेक्टर स्किन इंप्लिमेंटेशन हि येऊ घातले आहे. आतापर्यंत मराठी विकिपीडियातील विवीध पैलूंचा आपला बर्‍यापैकी परिचय झाला आहे म्हणून माझी विनंती योग्य वाटल्यास प्रचालकपदाकरिता आपण आपली विनंती कौल पानावर माडावी अशी इच्छा आहे.
या जबाबदारी बद्दल सदस्य मै हि हू डॉन यांनी सुद्धा विचार करावा असे मला वाटते तशी विनंती मी त्यांनासुद्धा करणार आहे आणि विकिपीडीया चावडीवर नविन प्रचालक सुचवणी विभागत हा मुद्दा मी मांडला आहे त्यास आता पर्यंत संकल्पजींचे अनुमोदन सुद्धा प्राप्त झाले आहे माहितगार ०८:३१, १७ ऑगस्ट २०१० (UTC)
आपल्या विनम्रते बद्दल आदर आहे, विंनंती केवळ लोभ (तो आहेच, पण...) आहे म्हणून केलेली नाही, असावयास हवे पण अनफॉर्च्यूनेटली माझ्या तर्कदुष्ट स्वभावास ते मानवत नसल्यामुळे सहसा वेगवेगळे तराजू मोज माप घेऊनच पाऊल पुढे टाकतो, तर आप-पर भावाने नव्हे केवळ विकिपीडियाच्या दृष्टीने आपणास विकिपीडीयाच्या परिघाची आणि पैलूंची बरीचशी कल्पना आलेली आहे असा माझा अभ्यास आहे,आणि तसा विश्वास वाटल्या नंतरच नंतरच मी हि विनंती केली आहे. आपणास सर्व माहित आहे किंवा असावे असाही दावा नाही. सर्वात चांगली गोष्ट आपल्याला काय माहित नाही याची व्यवस्थित कल्पना आहे आणि गंमत म्हणजे हि फार महत्वाची गोष्ट आहे :)
त्या शिवाय आपण जमेल त्या प्रत्येक गोष्टीत पुढाकार घेतला माहिती करून घेऊन किमान प्रयत्न निश्चितपणे केले आहेत. नवागत सद्स्यांना सहाय्य देण्यातही आपला बर्‍या पैकी पुढाकार राहिला आहे.
वेळेच्या बाबतीत सदस्य कोल्हापुरी आणि सदस्य सुभाष राऊत यांची उदाहरणे आहेत- (एके वेळी त्यांनी खूप संपादने केली) - पण प्रचालक म्हणून विशीष्ट वेळी जमेल तेवढीच ठरावीक जबाबदारी पार पाडतात, कुठे गहबज नाही कुठे चर्चा नाही.तर हर्षलजीसारख्ए संस्थापक सदस्यांनी स्वतःहून् कालांतराने राजीनामाही दिला.
प्रचालक पदाची विनंती करण्यापुर्वी हवे तर विशेष:विशेष_पाने येथील वर्ग वारीचा अभ्यास करावा आणि त्यातील काही गोष्टी करण्याचा प्रयत्न केल्यास मागे पडलेल्या प्रचालकीय कर्तव्यंचाही अंदाज येईल, आणि त्यातील जमेल तशी काही पार पाडण्यास आपला अनुभव आणि माहिती आपल्या कडे आहे असे वाटते.
या पुर्वीही मी स्वतःहून काही जणांना विनंती केली संकल्पजींप्रमाणे काही जणांनी स्विकारली , प्रिया व्हिपी प्रमाने काही जणानी विनम्रतेने नाकरली देखील,आम्ही आमच्या कडून पावती दिली, विकिपीडियास आपले योगदान मोलाचे आहेच त्यात प्रचालकआधिकारांनी अधीक भर पडू शकेल, अर्थात निर्णय आपला असेल माहितगार १५:०८, १७ ऑगस्ट २०१० (UTC)

धन्यवाद

संपादन

सध्या मी {{Infobox Stadium‎}}मध्ये बदल केले आहेत.

समर्थन कौल दिल्याबद्दल मनःपुर्वक आभार.

Maihudon ०४:०५, २० ऑगस्ट २०१० (UTC)

शुध्दलेखन

संपादन

' तार्‍यापासुन ' की ' तारयापासुन ' कुठला शब्द योग्य आहे याबद्दल माझा गोंधळ असुन कृपया योग्य शब्द सांगुन मदत करा. Vishal1306 ०६:२५, २० ऑगस्ट २०१० (UTC)


राज्य परिवहन च्या बसेसवर हेच नाव असते,धन्यवाद. संदर्भ:पोलीस स्थानक लिंक[१] --विक्रम , चर्चा

काम चालू

संपादन

अगदी बरोबर करत आहात. दोन महिन्यांहून अधिक काळात जर बदल न घडता नुसताच काम चालू साचा लागला असेल, तर तो काढायला हरकत नाही.

--संकल्प द्रविड (चर्चा | योगदान) १६:००, २२ ऑगस्ट २०१० (UTC)

मला वाटते २ महिने खूप लांबचा कालावधी झाला, कामचालू साचाची सुरवात नवागत मंडळींना अचानक वादग्रस्त संपादन सुचना कूठे आढलळलीकी करण्यास सुरवात होते, कामचालु साचामुळे ज्यांना काही संपादन सदुरूस्तीकरावयाची ते हे टालतात. इतर नवागतांना इतिहासात जाणे संपादन् चालू आहेकी नाही तपासणे ह्या टर्मिनॉमलॉजी अगदीच नवीन असतात त्यामुळे एकुणच अशा लेखातून संपादन् टाळण्याकडे कल वाढतो.
माझ्यामते संपादन अवस्थेत नसेल तर दोन तासापेक्षाही जास्त वेळ हा साचा ठेवण्याची गरज नाही. आवश्यकता असेलतर साचा पुन्हा लावण्यास वेळ लागत नाही. ह्या साचामुळे विनाकारण इतिहास तपासून साचे काढण्याचे प्रचालकांचे काम वाढते. त्यामुळे जेव्हा साचा तयार झाला तेव्हाही इंग्रजी विकिपीडियावरसुद्धा तासाभरापेक्षा अधीक काळ तो असणे कधीही अभिप्रेत नव्हते. आणि माझा कल्पने नुसार इंग्रजी विकिपीडियात देखील हा साचा आता वापरला जात नाही.माहितगार १३:५३, २३ ऑगस्ट २०१० (UTC)
माहीतगारांची़ माहिती अधिक योग्य आहे. तुम्ही केलेले काम तर चांगलेच होते. धन्यवाद!
--संकल्प द्रविड (चर्चा | योगदान) १४:४१, २३ ऑगस्ट २०१० (UTC)

प्रचालक काढतील हि शब्द योजना टाळावी इतर सदस्य काढतील असे ठिक राहील कारण हे काम करण्यास प्रचालक असणे गरजेचे आहे असे नाही.माहितगार १४:४७, २३ ऑगस्ट २०१० (UTC)

माहिती हवी

संपादन

नमस्कार, तुम्ही सदस्यांच्या पानावर तुमची सही करतांना तुमचे नाव आणि चर्चा/योगदान हे दिसते, ते कसे करता? नुसते ४ वेळा ~~ दाबून की आणखी काही. वरील संकल्प यांच्याही नावासह हे दिसते. यासाठी वेगळा साचा बनविला आहे की दरवेळा सगळे टाईप करावे लागते. मला उत्सुकता लागून राहिली आहे. Gypsypkd ०५:०९, २३ ऑगस्ट २०१० (UTC). तुम्ही महत्त्वाची माहिती दिली, धन्यवाद. आता हवे तेव्हा, हवे ते बदल करता येतील. फक्त सहीची माहिती एका सरळ ओळीत न येता वर-खाली येते (वेळ, तारीख). तुम्ही सुचविलेली दुसरी पद्धत जास्त बरोबर आहे.

१२:३४, २३ ऑगस्ट २०१० (UTC)

शुध्दलेखन विनंती

संपादन

शुध्दलेखन विनंती साठी साचा आहे का?

आपला
(अशुध्दलेखक)विशुभाऊ रणदिवे ११:०४, २३ ऑगस्ट २०१० (UTC)

धन्यवाद

संपादन
ट्रांसलेटविकितील महत्वाचे काम वेळेच्याआतपूर्णकरण्यात सक्रीय सहाय्य दिलेत छान मदत झाली , टिमवर्क केल्यासारखे वाटले . धन्यवाद व्यक्त करणे मीत्रत्वात बसत नाही पण सध्या दुसरे अजून चांगली शब्द रचना सुचेपर्यंत स्विकार करावा.
माहितगार १३:५५, २३ ऑगस्ट २०१० (UTC)
माझ्या मताप्रमाणे कौल हा लेख इमारतीस लागणार्र्या कौला करिता वापरावा, कौल घेणे या लेखाशी केवळ नि:संदिग्धीकरणकरून घ्यावे आणि कौल घेणे लेख मतघेणे संदर्भातील जास्त सुयोग्य लेखाकडे पुर्ननिर्देशित करावा दुसरा सुयोग्य लेख नसल्यास दैवी कौल नावाने नवीन लेख बनवता येईल( बाय दवे नाणे फेक ही दैवी कौल का लॊटरी कशात मोडते?) . अलिकडे पोपट आणि आक्टोपसचा सुद्धा कौल घेतला जाऊ लागला त्यामुळे पुरेसे विश्वकोशिय बळ त्याही लेखास प्राप्त होईल असे वाटते
कौल/कौलारू शब्दामुळे मातीच्या कौलारू कौलाचिच प्रतिमा डोळ्या समोर येते. roofing tiles फ्लॅट सुद्धा असतात, molsworth पहा. मोल्सवर्थ मध्ये दिलेले कवूल आणि थापीकौल हे दोन श्ब्द बरे वाटले , कवूल म्हणजे कौलच पण डोळ्यांसमोर लगेच पन्हळीकौलाची प्रतिमा येत नाही. थापीकौल/पनाळी कौल म्हणजे n A flat tile with raised edges. पण शेवटी बांधकाम क्षेत्र तुमचे तेव्हा तुम्हीच सुयोग्य निर्णय घ्यावा हे श्रेयस्कर

माहितगार ०७:५५, २५ ऑगस्ट २०१० (UTC)

निःसंदिग्धीकरण करावे लागेल

संपादन

माझ्या मते 'कौल' हा मुख्य लेख नि:संदिग्धीकरणासाठी वापरावा. तिथून 'कौल (बांधकाम साहित्य)', 'कौल (निर्णय)' (लॉटरी/ सार्वमत या अर्थाने), 'कौल मार्ग' ('कौल मार्ग/कौल मत/कौल पंथ' या हिंदू धर्मातील वामाचारी साधनामार्गाविषयीचा लेख), 'कौल (आडनाव)' अश्या अन्य लेखांचे दुवे नोंदवावेत.

--संकल्प द्रविड (चर्चा | योगदान) ११:२१, २५ ऑगस्ट २०१० (UTC)

ओह! मी नीट बघितलेच नाही बहुधा. :( ... संपादनाच्या खिडकीत कमेंट केलेला अन्यभाषक मजकूर पाहिला, आणि मला वाटले काढून टाकायला हरकत नाही. असो. याबद्द्ल थोडा अधिक विचार करून कळवतो.
--संकल्प द्रविड (चर्चा | योगदान) १५:५०, २५ ऑगस्ट २०१० (UTC)

सजगता

संपादन
दुरूस्त्यांचे स्वागतच आहे, कुठे एखादे सहाय्य पान जोडण्या सारखे वाटले तर ते ही अवश्य करावे . माहितगार १०:१०, ३० ऑगस्ट २०१० (UTC)
 
अविश्रांत योगदान देण्याबद्दल गौरवचिन्ह

माहितगार ०७:४४, ३१ ऑगस्ट २०१० (UTC)

नमस्कार, तुम्ही तातडीने हिरडा लेखात योग्य बदल केल्याबद्दल उपचार म्हणून नव्हे खरोखरच मी आभारी आहे. नाहीतर तो ले़ख तसाच राहिला असता. येवढ्यात जास्त वेळ देता येत नाही, तो आणखी कमी होत जाईल असे वाटते. जर मा़झ्या लेखात काही कमी आढळली आणि तुम्हाला शक्य असेल तर तुम्ही आवश्य्क बदल कराल का? सध्या माझे वेळेचे गणीत फारच बिघडले आहे. कदाचित दीर्घ विकिरजेवरही जावे लागेल (सध्या सगळेच अनिश्चित) म्हणून तुम्हाला आणि संकल्प द्रविड यांना विनंती केली आहे. नवीन बार्नस्टार बद्दल अभिनंदन. (माझा हात आता ठीक झाला). gypsypkd (चर्चा) ०५:०१, १ सप्टेंबर २०१० (UTC)

विकिपीडियाचा नवा चेहरा मोहरा

संपादन

आपण देवनागरी लेखनव्यवस्था सुरळीत चालावी म्हणुन तातडीने भाषांतर सहकार्य पुरवल्याबद्दल मनःपूर्वक धन्यवाद विकिपीडियाचा नवा चेहरा मोहरा व्हेक्टर बद्दल प्रेस रिलीज पाठविण्याचा मानस आहे. विकिपीडिया:माध्यम प्रसिद्धी मजकुर येथे प्रेस रिलिजमध्ये सुयोग्य सुधारणा करण्यात सहकार्य हवे आहे.माहितगार ०७:५४, ६ सप्टेंबर २०१० (UTC)

नवे आवाज

संपादन

नमस्कार, आज मी चिमणी आणि हळद्या या पक्ष्यांचे आवाज चढविले आहेत, एकदा ऐकून पहावे. मला असे आढळले की, जेथे नेट कनेक्शन स्लो आहे तेथे आवाज ऐकण्यास वेळ लागतो. त्याबाबत सूचना लिहिवी का असा प्रश्न पडला आहे. का कुणास ठाऊक पण तुमच्याशिवाय माझ्या कामाची दखल अन्य कोणीही घेतलेली नाही, (अपवाद १, इंग्रजी विकि) काही कमी-जास्त असल्यास तसेही कळविलेले नाही. मी निराश झालेलो नाही पण मी केलेले काम बरोबर आहे / नाही हे कळायला मार्ग नाही येवढेच. माझ्याजवळील कनेक्शन म्हणजे सगळी बोंबच (लहान गावाच्या मर्यादा). तुम्ही काही मदत करू शकाल या आशेने तुम्हास लिहिले आहे. कामाचा दर्जा खरोखरीच चांगला असावा असा प्रयत्न आहे. त्यासाठी हात मोडला तरी काळजी केली नाही. असो. gypsypkd (चर्चा) ०८:०६, ७ सप्टेंबर २०१० (UTC)

भाषांतर सहाय्य हवे

संपादन

en:Google translator toolkit या महत्वपूर्ण लेखाचे मराठी विकिपीडियात आणून भाषांतर करून हवे आहे. आपल्या सवडीने सहकार्य करावे हि नम्र विनंती माहितगार १०:४७, ७ सप्टेंबर २०१० (UTC)

पिवळ्या मारबतीचे चित्र

संपादन

श्री. नरसीकर, आपण मराठी विकिपीडियावर चढवलेले पिवळ्या मारबतीचे चित्र कृपया Wikimedia Commons वर अपलोड करावे म्हणजे ते इतर WIkimedia प्रकल्पांमध्ये सहज वापरता येईल. धन्यवाद. गणेश धामोडकर ०४:११, ९ सप्टेंबर २०१० (UTC)

धन्यवाद! गणेश धामोडकर ०२:४०, १० सप्टेंबर २०१० (UTC)

अलीकडील बदल

संपादन
दुर्लक्ष करा (सांगकाम्याची नोंदणी न केली गेल्यास अशी परिस्थिती असते खरी.पण त्याकडे दुर्लक्ष क्लेले बरे.), इंग्रज विकिपीडियात या पेक्षा कैक जास्तवेगाने सदस्य संपादने होतात बॉटचे तर विचारणेच नको.अशा परिस्थितीत इंग्रजी विकिपीडीयात मी कधीही अलकडील बदल पानावर जात नाही कारण ते दर सेकंदाला बदलत जाते.त्यामुळे खुपसंपादनांनी बिझी विकिवर अलिकडील पान पुरेसे ठरत नाही फक्त सर्व लोक त्या पानास भेट देतात तेव्हा त्यांना संपादन आणि नियंत्रणाचे इतर पर्यायांकडे अंगुली निर्देश करणारे पान एवढाच त्याचा उद्देश शील्लक रहातो.

मुख्य अलिक्डीलबदल कडे दुर्ल़क्ष करून केवळ अनामिकांचे अथवा केवळ नवीन सदस्यांचे अथवा नवीन पानांची निर्मिती तपासता येईल.किंवा वर्गीकरणानुसार अलिकडील बदल सुद्धा तपासण्याचा मार्ग आहे.

माहितगार ०६:५६, १० सप्टेंबर २०१० (UTC)

प्राधान्याने भाषांतर सहाय्य हवे

संपादन
विकिपीडिया:विकिभेट/मुंबई/मुंबई१ पानावर प्राधान्याने भाषांतर सहाय्य हवे आहे माहितगार ०५:५५, १४ सप्टेंबर २०१० (UTC)
बाकीची कामे मी करून घेईन, खूप खूप धन्यवाद,अजून एक असे की :Wikipedia Meetups करिता इंग्रजी विकिपीडियात सध्या "विकिपीडिया मिलन" असा शब्दप्रयोग केला आहे. मराठी विकिपीडियात सध्या "विकिभेट" असा शब्द प्रयोग आहे. सर्वांना अधीक सुगम आणि सुलभ शब्द प्रयोग कोणता वाटतो ते लवकरात लवकर कळवावे कारण संबधीत पानांच्या शीर्षके लवकरात लवकर बनवणे जरूरी आहे . माहितगार ०८:४३, १४ सप्टेंबर २०१० (UTC)

वर्ग : विस्तार विनंती

संपादन

सध्या मराठी विकिवरील लेखांची संख्या ३०,८२५ आहे व वर्ग:विस्तार विनंती मधील लेखांची संख्या १३,२४२ आहे म्हणजे जवळजवळ ४०%. सध्या वर्गातील लेखांना वर्गीकरणाची गरज आहे. सांगकाम्या रिकाम्या हे काम फार उत्तम रितीने तसेच जलद करत आहे. मी माझ्या समजुतीनुसार काही बदल रिकाम्या कडून करून घेतले आहेत. परंतु ह्या वर्गात असणार्‍या लेखांना वर्गीक्रुत करण्यासाठी सर्वांच्या सहभागाची गरज आहे. ह्याचा उपयोग जर पहायचा असेलतर दालन:क्रीडा मधील तुम्ही काय करू शकता हे सदर पहावे, इथे इच्छुक सदस्याला आपण एकाच ठीकाणी विस्तारण्या जोग्या लेखांबद्दल माहिती देउ शकतो. अश्या प्रकारे आपण ह्या वर्गीकरणाचा फायदा करून घेउ शकतो.

ह्या साठी सर्वांच्या आक्रमक सहभागाची गरज दिसते आहे

Maihudon ०६:३७, १५ सप्टेंबर २०१० (UTC)

तुम्ही केलेल्या सुचना बद्दल धन्यवाद.
सर्वसाधारण पणे मराठी विकि वरील लेख खालील वर्गात मोडतात,
  • देश, शहर इत्यादी
  • भारतीय इतिहास, इतर ऐतिहासिक घटना
  • व्यक्ती (कला,क्रिडा,राजकारणी)
  • खेळ
  • मनोरंजन
सुरवातीचा प्रयत्न म्हणुन आपण ह्या वर्गातील लेखांवर लक्ष केंद्रित करू शकतो. मला असे वाटतेकी प्रत्येक सदस्याला एखाद्या विषयात काम करण्यास इछा असतो. अभिजित साठे, प्रसन्नकुमार इ. सदस्यानाजर पाहिलेतर त्यांना विषेश विषयाची आवड आहे व त्यात ते भरघोस काम करत आहेत.
क्रिडा दालनवर काम केल्यानंतर मला अश्या वर्गीक्रुत कामाची कल्पना मिळाली. मोठ्याप्रमाणावर जर हि संकल्पना अमलात आणायची असेल तर काय कराव लागेल ह्या बद्दल मी सध्या काहि स्पष्टपणे सांगु शकत नाही, परंतु काहि तरी कराव लागेल अस वाटत आहे.
सांगकाम्याबद्दल तुम्हाला अधिक माहिती अभय नातु देउ शकतील.
Maihudon ०६:१३, २३ सप्टेंबर २०१० (UTC)

धन्यवाद आणि सय

संपादन

नमस्कार!

चर्चापानावर तुमचा संदेश पाहून बरे वाटले. :) खेरीज काही दिवसंमध्ये इकडे येणे जमले नव्हते, तेव्हा तुम्ही व डॉन यांच्यासारख्या नियमित सदस्यांनी साफसफाई व गस्तीची कामे निभावल्याचे पाहिले.. आनंद वाटला. :)

बाकी, त्या पानावरील सयीच्या अद्यतनाबद्दल मला नक्की कल्पना नाही, पण त्या आपापल्या ब्राउझरात असाव्यात, अस माझा कयास आहे. वाटल्यास, हा मुद्दा चावडीवर मांडून माहिती घ्यावी.

--संकल्प द्रविड (चर्चा | योगदान) १६:१८, १८ सप्टेंबर २०१० (UTC)

वर्गीकरणे सर्वसाधारणतः बरोबर वाटतात माहितगार १०:०४, १९ सप्टेंबर २०१० (UTC)
  • दासू वैद्य हे लेखकाचे नाव असावे आणि वर्ग:मराठी साहित्य नामसूची वर्ग केवळ ग्रंथांचे वर्गीकरण करण्याकरिता आहे किंवा कसे ते पडताळून पहावयास हवे.
  • दख्खनची राणी/मार्ग वर्ग:रेल्वे स्थानके हे वर्गीकरण लुन्हा पहावे असे वाटते शिवाय लेखा बद्दल उल्लेखनीयतेचा मुद्दा उपस्थित केला आहे त्या बद्दलही मतप्रदर्शन करावेत.

माहितगार १०:०४, १९ सप्टेंबर २०१० (UTC)

नमस्कार,

आठवण करुन दिल्याबद्दल धन्यवाद. मी चावडीवर संदेश टाकून एक-दोन दिवसांत पुढील पावले टाकतो.

अभय नातू १६:२८, २१ सप्टेंबर २०१० (UTC)

प्रचालकपद

संपादन

नरसीकर, अभिनंदन आणि वाढीव जबाबदारी यशस्वीरीत्या सांभाळण्यासाठी शुभेच्छा.

अभय नातू ०१:२१, २४ सप्टेंबर २०१० (UTC)

अभिनंदन, काही शंका अथवा अडचणी असल्यास आवर्जून नमूद कराव्यात माहितगार ०४:५८, २४ सप्टेंबर २०१० (UTC)
अभिनंदन! एकमेकांना सांभाळून घेत मदत करायला आपण सारे आहोतच. :)
--संकल्प द्रविड (चर्चा | योगदान) १६:२१, २५ सप्टेंबर २०१० (UTC)
Return to the user page of "V.narsikar/जुनी चर्चा ६".