सदस्य चर्चा:Shrinivaskulkarni1388/श्रीनिवास गोविंदराव कुलकर्णी

सुरेश खोले संपादन

@अभय नातू, V.narsikar, आणि सुबोध कुलकर्णी: प्रस्तुत लेख लिहिणारा आणि त्याने लिहिलेली पाने ही निव्वळ जाहिरातबाजीचा भाग आहेत आणि त्याचे लेख लिहिणारी सर्व खाती ही त्याचीच कळसुत्री खाती आहेत हे सिध्द झालेले आहे. म्हणून मी‌ हे पान काढायचा साचा लावला होता पण सर्वज्ञ टायवीन यांनी तो कसलीही चर्चा न करता परस्पर काढून टाकला आहे. यातून ते किती सद्भावना गृहित धरतात हे स्पष्ट दिसते. सुरेश खोले "संदर्भ द्या! अगदी भांडतानासुध्दा"!!! १९:३६, ११ ऑक्टोबर २०१८ (IST)Reply

@अभय नातू आणि V.narsikar: प्रचालकांचे अजुनही ह्या पानावर लक्ष गेलेले नाही, म्हणून परत आठवण करीत आहे. सुरेश खोले "संदर्भ द्या! अगदी भांडतानासुध्दा"!!! १०:००, १७ ऑक्टोबर २०१८ (IST)Reply

सुबोध कुलकर्णी संपादन

मी पान काढावे या मताशी सहमत आहे. इंग्रजी विकीवरील शोध तपासणी अहवाल व लेखातील दिलेले बाह्य दुवे पहाता ही जाहिरातबाजी आहे असे दिसते.

--सुबोध कुलकर्णी (चर्चा) १०:२४, १७ ऑक्टोबर २०१८ (IST)Reply

श्रीनिवास कुलकर्णी संपादन

नमस्कार !!

ज्यावेळी विकीपिडिया संपादन प्रक्रियेस सुरवात केली त्यावेळी काही नियमांची माहिती नव्हती, त्या चुकांमुळे सदरील लेख लिहिला गेला असल्याने आपण हा लेख काढून टाकु शकता, कोणत्याही लेखामागे जाहिरातबाजी हा हेतू निश्चित नव्हता, केवळ मराठी चित्रपट श्रुष्टीत कार्यरत असल्याने मराठी कलाकार आणि त्यांचे योगदान जगासमोर यावे हा एकमेव हेतू त्यामागे होता, जाहिरातबाजी म्हणजे नक्की काय ? आणि ती वघळून लेख कसा लिहिला जावा हा प्रश्न अनेक वेळा मी वैयक्तिक भेटीत अथवा ज्ञाप्रबोधिनी येथे पार पडलेल्या कार्यशाळेत विचारला होता त्याचे उत्तर आजही मला मिळाले नाही,

कलाकारांचे लेख संपादन कसे करावेत हे मी इतर उपलब्ध लेख पाहुन शिकलो, त्यामुळे इतर लेखांबद्दल कारवाई होणे आवश्यक आहे, अथवा माझ्यासारख्याच चुका नवीन संपादकांकडून होऊ शकतात.

इंग्रजी संपादन करताना देखील हेच माझ्या बाबतीत घडले, विकिपीडिया संपादन हे मुक्त संपादन असल्याचे मी अनेकांना (विशेषतः कलाकारांना) सांगत आलो आहे, त्यांच्याकडून विकिपीडिया पान तयार करण्यासाठी पैसे मागितले गेले, त्यामुळे कलाकार याचे बळी होऊ नये यासाठी मी स्वतः विकिपीडिया संपादन शिकण्यास सुरवात केली आणि मी केलेले प्रत्येक पान हे कोणताही मोबदला न घेता केलेले संपादन आहे, या संपादनामुळे (पैसे घेऊन संपादन करणाऱ्या) अनेक लोकांचा व्यवसाय बंद झाला, असो ... हे मी कलाकारांची भेट घडवून त्यांना आलेल्या अनुभवातून सिद्ध करू शकतो आणि इंग्रजी विकिपीडिया वर पैसे घेऊन केलेले संपादन हा आरोप देखील मी चुकीचा आहे सिद्ध करू शकतो, पण अनुभावाअभावी आणि काही चुका यांमध्ये सापडल्याने ती संधी अथवा मार्ग मला अजुनही सापडला नाही.

माझ्या लेखांमधे जाहिरातबाजी असेल आणि त्या माझ्या चुका मला मान्य आहेत, पण योग्य मार्गदर्शनाअभावी होणारे चुकीचे संपादन आणि कोणताही लाभ, हेतू न बाळगता संपादन करणारे संपादक आशयामुळे विकिपीडिया वरून भविष्यात नाहीसे होतील आणि पुन्हा लेख संपादन करण्यासाठी पैसे आकारले जाण्याचे प्रसंग वाढीस लागतील.

माझा लेख वाघळून टाकावा / संपादन करण्यास माझ्यावर बंदी घालण्यात यावी त्याबाबत माझी कोणतीही तक्रार नाही, माझे म्हणणे मी मांडले त्याचे काही पुरावे खाली नमूद करत आहे.

विकिपीडिया संपादनास पैसे आकारणारया संस्था

इंग्रजी विकिपीडिया वर मला ज्या व्यक्तीच्या सततच्या प्रयत्नांमुळे मला बंदी ला सामोरे जावे लागले ती व्यक्ती आणि पैसे घेऊन संपादन करणारी व्यक्ती यांचे संबंध असल्याचे उघड होऊ शकते तसे पुरावे माझ्या हाती लागत आहेत.

धन्यवाद !!

Shrinivaskulkarni1388 २०:४९, १७ ऑक्टोबर २०१८ (IST)


@Shrinivaskulkarni1388:

  • आपली समस्या ही आहे की, आता सगळीकडे हे मान्य झालेले आहे आपण आपल्या कंपनीसाठी विकिपीडिया जाहिरातबाजीचा भाग म्हणून वापरत आहात.
  • आपल्याला जर लिहायचेच आहे इथे तर सिनेमा सोडून इतर विषयावर लिहा?
  • आपल्याकडे ज्यांच्याविरुद्ध पुरावे आहेत ते घेऊन तक्रार करा विकिवर इथे सांगुन काय उपयोग?
  • शिवाय आपल्या संदर्भ म्हणजे काय हे कळलेले नाही, संदर्भ म्हणजे ज्याने विधानाची सत्यता पडताळून पहाता येते. त्यामुळे तो संदर्भ विश्वासार्ह असायला हवेत. आपले अनेक संदर्भ हे गोसिप प्रकारातले असतात. त्यामुळे आणखीन घोळ आहेत.
  • शिवाय बातमीत नावं आली म्हणून व्यक्ती उल्लेखनीय होत नाही, असे अनेक ठिकाणी व्याख्याने, कार्यशाळा, सद्यघटनांवर मते, पुस्तके, लेख असे अगणित ठिकाणी माझे किंवा सुबोध कुलकर्णी यांचे नाव बातमीत आले असेल म्हणून आम्ही काय उल्लेखनीय होत नाही. आणि आमचे लेखही लिहायला घेत नाही नाही आम्ही. सुरेश खोले "संदर्भ द्या! अगदी भांडतानासुध्दा"!!! १५:४३, १९ ऑक्टोबर २०१८ (IST)Reply

@Sureshkhole:

  • कंपनीसाठी विकिपीडिया हे विधान अतिशय चुकीचे आहे, इंग्रजी विकिपीडियाचे निकष आपण येथे मराठी विकिपीडिया वर लावणे अयोग्य आहे.
  • मराठी विकिपीडिया जर आपण तपासला तर सिनेमा सोडून अनेक विषयांवर मी लेख संपादित केले आहेत.
  • आपण जाहिरातबाजीची व्याख्या अजुनही यात नमूद केली नाही, कोणत्या संपादनात मी माझ्या कंपनीची, त्यामार्फत पुरवल्या जाणार्या सुविधांची जाहिरात केली कृपया स्पष्ट करावे ?
  • संदर्भ हा उल्लेख आपण करत आहात, मराठी विकिपीडिया वर अनेक लेख त्यातील वाक्य संदर्भाविना आहेत, ते लेख काढणार का ? मी लेखांची माहिती आपल्याला पुरवतो, त्यावर आपण साचा लावणार का ?
  • माझे अनेक संदर्भ विधानाची सत्यता पडताळून पाहता येण्यासारखे आहेत, फक्त सुरवातीला ते संपूर्ण लेख लिहून झाला कि मी एकत्र देण्याची चुक करत असे.
  • माझ्या लेखावर मला बोलायचे नाही तो काढून टाकावा हे मी नमूद केलेलेच आहे, आणि कार्यशाळा, पुस्तके, दिवाळी अंक यात माझेही लेख छापून आले आहेत, पण अभिनेता कलाकार म्हणून २ पेक्षा अधिक चित्रपटात काम, शरद पोंक्षे, राहुल सोलापूरकर, सुरेश वाडकर यांच्या सोबत मुख्य कलाकार म्हणून मी काम केले आहे टाईम्स ऑफ इंडिया तसेच इतर संदर्भात ते नमूद आहे.

Shrinivaskulkarni1388 १६:४४, १९ ऑक्टोबर २०१८ (IST)


@Shrinivaskulkarni1388:

  • मराठीची ध्येय धोरणे आपण पाहून घ्यावीत ही विनंती ती इंग्रजीपेक्षा वेगळी नाहीत,
  • आपण एकच व्यक्ती असून आपण स्वत:ची तीन खाती काढली आहेत, Tejashree1994, Ksg18 ही आपलीच खाती आहेत. त्यांनी मराठीवरही लेख केले आहेत किंवा भर घातली आहे. मुळात हे चालत नाही मराठीवरही चालत नाही.
  • आता तुम्ही मराठीवरचे जाहिरातबाजीचे धोरण वाचा साच्यावर त्याचे दुवे आहेत.
  • मराठीवरचे इतर संदर्भ नसलेले लेखांना संदर्भ देणे आणि ते जमत नसल्यास त्यांना संदर्भ हवा असा साचा लावणे किंवा इतर आवश्यक साचे लावणे हे काम मी सतत करत असतो आपणही ते करायला मोकळे आहात. अनेक संदर्भहीन लेख आहेत म्हणून नविन येणारे लेखांवर कडक लक्ष ठेवणे आणि आधीच्यांना संदर्भ देणे हे काम गतीने होणे गरजेचे आहे. तेव्हाच इथल्या लेखांची गुणवत्ता सुधारेल.
  • योग्य संदर्भ असणे हे लेख टिकवण्यासाठी आवश्यक आहे, आज ना उद्या संदर्भ नसलेले लेख काढले जातील किंवा त्यांना संदर्भ जोडले जातील. संदर्भ नसलेली विधाने आपोआप शोधणाणी उपकरणे तयार होत आहेत त्यामुळे ह्या सगळ्या लेखांवरही काम होईलच की? सुरेश खोले "संदर्भ द्या! अगदी भांडतानासुध्दा"!!! १७:३२, १९ ऑक्टोबर २०१८ (IST)Reply

उल्लेखनियता संपादन

वर उल्लेख केल्याप्रमाणे पान काढून टाकावे, मी स्वतः हा लेख संपादित करू शकत नाही तरी उल्लेखनियता यासाठी काही लिंक -

Shrinivaskulkarni1388 १०:२४, १९ ऑक्टोबर २०१८ (IST)

जाहिरात बाजी संपादन

कृपया जाहिरात बाजीची व्याख्या स्पष्ट करावी, आणि प्रसिद्ध व्यक्तीं, अभिनेते या लेखात ती आढळल्यास त्यालेखात सुधारणा करावी अथवा नियमांप्रमाणे ते काढून टाकावेत. व्याख्या स्पष्ट झाल्यास त्याचा शोध घेऊन उदाहरणे मी येथे प्रस्तुत करेन.

काही उदाहरणे -

अरुण नलावडे पान - (रिकामे)

https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%85%E0%A4%B0%E0%A5%81%E0%A4%A3_%E0%A4%A8%E0%A4%B2%E0%A4%BE%E0%A4%B5%E0%A4%A1%E0%A5%87

उल्लेखनियता -

मधुरा वेलणकर -

https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%AE%E0%A4%A7%E0%A5%81%E0%A4%B0%E0%A4%BE_%E0%A4%B5%E0%A5%87%E0%A4%B2%E0%A4%A3%E0%A4%95%E0%A4%B0

जाहिरात बाजी -

माझे संपादित पान -

सायली संजीव - (आरोप जाहिरातबाजी)

https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%B8%E0%A4%BE%E0%A4%AF%E0%A4%B2%E0%A5%80_%E0%A4%B8%E0%A4%82%E0%A4%9C%E0%A5%80%E0%A4%B5

अगोदरपासून उपलब्ध पान

सई ताम्हणकर - (सध्यातरी कोणताही आरोप नाही)

https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%B8%E0%A4%88_%E0%A4%A4%E0%A4%BE%E0%A4%AE%E0%A5%8D%E0%A4%B9%E0%A4%A3%E0%A4%95%E0%A4%B0

@अभय नातू, V.narsikar, सुबोध कुलकर्णी, आणि Sureshkhole:

Shrinivaskulkarni1388 १०:२८, १९ ऑक्टोबर २०१८ (IST)

तडीपार करणे बाबत संपादन

नमस्कार !

@Sureshkhole: यांनी माझ्या आणि त्यांच्या चर्चा पानावर लिहिल्याप्रमाणे, मराठीत अजून नियम कडक नसल्याने मला तडीपार करणे शक्य होत नाही, अरुण नलावडे पान (रिकामे) यांसारख्या कलावंतांची पाने पाहुन त्यात कोणताही मजकुर नाही हि मला शरमेची बाब वाटली, त्यातच विकिपीडिया संपादन कोणीही करू शकतो हे समजल्यानंतर मी संपादनास सुरवात केली. कला क्षेत्रात काम करत असल्याने आणि पर्यायाने अधिक माहिती असल्याने त्यांच्याबद्दल माहिती लिहिणे मला अनिवार्य वाटल्याने मी विकिपीडिया संपादन सुरु केले, प्रथम मराठी, इंग्रजी असे विकिपीडिया वेगळे असतात याबद्दल माहिती नव्हती, हळू हळू माहिती होत गेली, चुका होत होत्या मार्गदर्शन मिळत नव्हते, त्यात @सुबोध कुलकर्णी: सर यांच्या बद्दल माहिती मिळाली, अनेक गोष्टी त्यांच्याकडून आणि टिटो सर यांच्या कडून शिकायला मिळाल्या, काही प्रश्नांची उत्तरे मिळाली देखील नाही, त्यामुळे स्वतः प्रयत्न केल्या शिवाय शिकायला मिळणार नाही या उक्तीप्रमाणे काही वेगळ्या खात्यावरून संपादन करण्यास सुरवात केली, हेतू फक्त हाच कि माझे मूळ खाते बंद होऊ नये, त्यामुळे केवळ शिकणे या उद्देशापोटी माझ्याकडून अनेक चुका झाल्या, आणि कोणत्याही मोबदल्याविना संपादने करत असल्याने अनेक पैसे घेऊन काम करणारे विरोधक तयार झाले. त्यातच माझा संपादनाचा वेग मी कमी केला होता परंतु काही चुकांमद्धे अडकवून माझ्यावर बांधी घालण्यात आली.

अनेक चुका मान्य करून माझ्यावर कोणत्याही स्वरुपाची बंदी घातल्यास ती मला मान्य असेल असे मी नमूद केले आहे. परंतु इंग्रजी मद्धे आणि मराठीमद्धे जाहिरातबाजी केली हे विधान मला मान्य नाही, आणि ती केली असेल तर इतर अनेक लेख त्याप्रकारचे आपल्याला पाहायला मिळतील, ते पाहुन मी माझे संपादित लेख त्याप्रकारचे लिहिण्याचा प्रयत्न केला.

पैसे घेऊन संपादन करणे हे रोखण्यासाठी खरंतर मी अनेक लेख संपादित केले, हे मी सिद्ध करू शकतो, मला कृपया मेल मिळाला तर समंधित कलाकारांचा पैसे न घेता संपादन केल्याचा उल्लेख करणारा (ज्यांचे लेख मी संपादित केले असतील अश्या सर्व) कलाकारांचा व्हिडीओ मिळवून आपल्याला मेल करू शकतो, (कृपया मेल आय डी द्या).

शेवटी इतरांना ज्ञान देणे यात आनंद आहे, परंतु कोणत्याही अपेक्षेविना तो करत असताना पैसे घेतल्याचा आरोप होणे अतिशय शरमेची बाब आहे, पैसे घेऊन संपादन केले असते तर त्याचे वाईट वाटले नसते पण न घेता आरोप सहन करणे अतिशय अवघड बाब आहे. त्यामुळे @Sureshkhole:यांचे आरोप, विकिपीडिया बाहेर माझा व्यवसाय उल्लेख आणि त्याचा चुकीचा संबंध लावणे याप्रकारामुळे प्रचंड निराशा झाली आहे.

त्यामुळे @Sureshkhole: यांनी उल्लेख केल्याप्रमाणे मला तडीपार करण्ण्यासाठी मराठीतील नियम कडक होण्याची वाट न बघता मी स्वतः तडीपार होणे पसंद करेन, माझी विनंती आहे कृपया माझे सदस्यत्व आणि संपादने रद्ध करावीत. आणि यापुढील कार्यशाळेत जाहिरातबाजी, वेगवेगळी खाती संपादन याबद्दल नवीन संपादकांना पूर्ण माहिती द्यावी. मराठी विकिपीडिया टिम आणि संपादकांना शुभेछ्या !

@अभय नातू, V.narsikar, सुबोध कुलकर्णी, संदेश हिवाळे, आणि Tiven2240:

धन्यवाद !!

Shrinivaskulkarni1388 २२:४८, १९ ऑक्टोबर २०१८ (IST)

@Shrinivaskulkarni1388:

  • जाहिरातबाजीचा आरोप नाही ते वास्तव आहे, आपण अनेक लेखांना आपल्या संकेतस्थळाचा एस के स्टुडीओज, आणि सिनेकट्टाचा संदर्भ दिला आहे. आणि आपल्या सदस्यपानावर स्पष्ट उल्लेख आहे, आपण ते सुरू करण्यात सहभागी आहात.
  • या व्यतिरीक्त, कार्यशाळांमध्येही आपल्याला सगळ्या बाबीं देणे शक्य नाही त्यामुळे कार्यशाळांवर खापर फोडणे बंद करा, तुम्हांला अनेकवेळा सुचना मिळूनही आपण त्या कधीच वाचल्या नाहीत, आपण त्यांना कधीच उत्तरे दिली नाहीत. शिवाय अनेक खाती उघडून गोंधळ केलात. हे आरोप नाहीत आपला इतिहास सांगतोय. त्यामुळे आपण आरोप करणे आणि इतरांवर चिखलफेक बंद करून स्वत:चे अज्ञान स्वीकारा. आपण इथेही मला जाहिरातबाजीचा अर्थ विचारलात आपण जाऊन पाहिले नाही. कोणत्याही धोरणांचा आपण स्वत:हून अभ्यास केला नाही. त्याचे खापर आपण कार्यशाळांवर फोडू शकत नाही.
  • तुमच्या ह्या परिस्थीतीला सर्वस्वी तुम्हीच जबाबदार आहात.
  • जे काही पुरावे असतील ते इंग्रजीवर पाठवा आणि आपले खाते परत चालू करून घ्या.
  • या उप्पर, तुम्हांला जसे जमेल तसे, तसेही आपण केलेल्या उत्पाताबद्दल आणि योगदानाबद्दल धन्यवाद. सुरेश खोले "संदर्भ द्या! अगदी भांडतानासुध्दा"!!! १२:११, २० ऑक्टोबर २०१८ (IST)Reply

तडीपार करणे विनंती मागे संपादन

@अभय नातू, V.narsikar, आणि Tiven2240:

झालेल्या वैचारिक मतभेदांमुळे, भावनेच्या भरात तडीपार करण्याची विनंती माझ्याकडून केली गेली, यापुढे विचारपूर्वक संपादन करण्याचा प्रयत्न असेल.

धन्यवाद ! Shrinivaskulkarni1388 ०७:५७, २३ ऑक्टोबर २०१८ (IST)

चुकीचा आरोप, पुरावा संपादन

@अभय नातू, V.narsikar, सुबोध कुलकर्णी, संदेश हिवाळे, आणि Tiven2240:

  • जाहिरातबाजी हा आरोप माझ्या बाजूने (मराठीमद्धे) सिद्ध होण्यापूर्वीच आपण ते वास्तव आहे हे सांगून मोकळे झालात,कृपया प्रचालाकांनी याची नोंद घ्यावी.
  • जाहिरातबाजी हा आरोप चुकीचा आहे असे सांगणारे पुरावे मी सुबोध कुलकर्णी, टिटो सर यांना मेल करत आहे, टायविन यांना देखील मेल करत आहे, वास्तव सिद्ध होयील लवकरच. आणि त्यामुळे विकिपीडियाच्या होणार्या बदनामीस केवळ आपण जबाबदार असाल.
  • कार्यशाळांवर खापर यासाठी फोडले कि प्रश्न विचारल्यानंतर देखील त्याचे उत्तर मिळत नसेल तर त्याचा उपयोग काय ? माझे अज्ञान मी पूर्वीच स्वीकारले आहे. आणि इंग्रजी विकिपिडीयावर अज्ञानामुळे मुळे उत्तर देऊ शकलो नाही आता इथे मी सक्षम आहे.
  • मराठी विकिपीडिया वर इतर असे अनेक लेख उपलब्ध आहेत त्याच्या लिंक आपल्या चर्चा पानावर लवकरच टाकीन, त्याला देखील काढून टाकण्याचा साचा लावा, आपण देखील असे चुकीचे साचे लावल्यामुळे एकदा तडीपार झाला आहात.
  • माझ्या योगदानाला / उत्पाताला धन्यवाद दिल्याबद्दल आपले आभार.

Shrinivaskulkarni1388 १७:५९, २० ऑक्टोबर २०१८ (IST)


@Shrinivaskulkarni1388:

  • सुबोध, टिटो किंवा टायविन यांना नाही तुम्हांला इंग्रजीवर अवरुध्द करणारे लोक आहेत त्यांना करा. फुकट ह्या तिघांना पुरावे पाठवून यांचे डोके नका खाऊ आपण आतापर्यंत चिक्कार वेळ वाया घालवला आहे सर्वांचा.
  • मराठीत वेगळं काय सिध्द व्हायचय, जे तिकडे केलं तेच इकडे केलेत तुम्ही. उगाच आगपाखड करुन काय फायदा?
  • तुम्ही समोर आलेल्या कुठल्याच मेसेजेस न वाचता संपादने करायची आणि निष्कारण खापर कार्यशाळेवर? काय संबंध? कार्यशाळा काही तुमच्या उद्योगांची जबाबदारी घ्यायची बांधिलकी घेते काय? सुरेश खोले "संदर्भ द्या! अगदी भांडतानासुध्दा"!!! २०:२८, २० ऑक्टोबर २०१८ (IST)Reply

पैसे घेऊन संपादन पुराव्याबाबत आपले मत संपादन

@अभय नातू, V.narsikar, आणि सुबोध कुलकर्णी:

माझ्यावर पैसे घेऊन संपादन केल्याच्या आरोपाचा पुरावा सुबोध कुलकर्णी सर यांना पाठवला आहे, कृपया इतर प्रचालकांना हवा असल्यास मी पाठवेन, त्या पुराव्या बाबतचे मत इथे मांडण्याची विनंती सुबोध कुलकर्णी सर यांना मी करतो. धन्यवाद !

Shrinivaskulkarni1388 ०७:२०, २१ ऑक्टोबर २०१८ (IST)

Return to the user page of "Shrinivaskulkarni1388/श्रीनिवास गोविंदराव कुलकर्णी".