वर्ग:इस्लाम धर्माचे पाच स्तंभ संपादन

वर्ग:इस्लाम धर्माचे पाच स्तंभ येथे जा आणि तेथे [[वर्ग:इस्लाम धर्म]] जतन करा , म्हणजे आपणाजसे अपेक्षीत आहे ते मिळेल असे वाटते .पुढील विकि संपादनांन्करीता शुभेच्छा माहितगार ०६:०७, १२ ऑगस्ट २०१० (UTC)

आता नमाज हा लेख बघा व मी त्यात केलेले बदल बघा.जोहर इशा वगैरे ला मी दुवे दिलेले आहेत. कसे? हे 'संपादन' वर क्लिक करुन बघा.आपल्या पुढील लेखनास शुभेच्छा.बढे चलो. वि. नरसीकर (चर्चा) १३:३७, १२ ऑगस्ट २०१० (UTC)

नुक्ता संपादन

मराठीत फ़ सारखी नुक्ता असलेली अक्षरे वापरू नयेत असा प्रमाण लेखन संकेत मराठी विकिपीडिया स्विकारते, नुक्ता शिवाय 'फ' असेच लेखन अभिप्रेत आहे. गरजे नुसार पहिल्या परिच्छेदात अरेबिक पार्सी उर्दू हिंदी इत्यादीत त्या शब्दाचे होणारे लेखन आणि मराठी उच्चारण नमुद करण्यास हरकत नाही . मराठी विकिपीडियातील लेखन संकेतात कुठे अपवाद करून हवा असेल तर तशी सुचना चावडीवर मांडावी माहितगार १४:१७, १२ ऑगस्ट २०१० (UTC)

विकिपीडिया:वर्ग सुसूत्रीकरण संपादन

  • आपण वर्गीकरण पानांच्या संबधाने थोडे गोंधळलेले दिसता आहात, विकिपीडिया:वर्ग सुसूत्रीकरण पानास भेट दिल्यास आपल्या काही शंकाम्चे निरसन होईल. आपल्या पुढील संपादनांकरीता शुभेच्छा ! माहितगार ०६:३८, १३ ऑगस्ट २०१० (UTC)

विश्वकोशीय माहिती भरणे अपेक्षित आहे संपादन

नमस्कार!

आपण कोल्हापूर लेखात स्वाद या विभागात व अन्य ठिकाणी भरलेली माहिती पाहिली. 'आईसक्रीम-पेरिना,सोळंकी कोल्ड्रिंक हाऊस, पद्मा लॉज, ओपल, परख, रसिका गार्डन, हॉटेल शेतकरी' ही नावे सध्या प्रसिद्ध आहेत, हे कबूल, पण नंतर या विक्रेत्यांची/दुकानांची नावे बदलली तर? किंवा या नावांपेक्षा अन्य नावे पुढे आली तर? सांगायचा मुद्दा हा की, प्रसिद्ध दुकानांची नावे ही नित्य बदलत जाणारी गोष्ट आहे. अश्या गोष्टी विश्वकोशात मांडताना त्यांच्या अशाश्वत स्वरूपाचा विचार जरूर करावा.

शिवाय अशी नावे विश्वकोशात नोंदवण्याचा अजून एक तोटा असतो : काही नावे दिसली, की मग अन्य नावे का नकोत अशी विरुद्ध पार्ट्यांच्या मनात तक्रार उद्भवून त्यांच्याकडून त्या लेखात प्रतिस्पर्धी नावांची जंत्री जोडण्याचे, जाहिरातबाजी चालू करण्याचे प्रकार संभवतात. म्हणून लेखात शक्यतो जाहिरातबाजी नसणारी, शाश्वत अश्या स्वरूपाचीच माहिती भरावी ही विनंती.

धन्यवाद!

--संकल्प द्रविड (चर्चा | योगदान) १०:३७, १८ ऑगस्ट २०१० (UTC)

नमस्कार Samirshekh.2008, आपण मराठी विकिपीडियावर लेखनाच्या केलेल्या प्रयत्नांकरिता अभिनंदन आणि धन्यवादही. आपली मराठी विकिपीडिया वर १० पेक्षा जास्त संपादने झाली आहेत. विकिपीडिया इतर वेबसाईट पासून भिन्न असून तो एक वस्तुनिष्ठ ज्ञानकोश आहे. आपण विकिपीडिया:नवीन सदस्यांना मार्गदर्शन का लेख पाहिलाच असेल. लेखनास जमेल तेवढे संदर्भ देणे अभिप्रेत असते. विकिपीडिया:हवे होते अपेक्षा, विकिपीडिया परीघ, आवाका आणि मर्यादा आणि विकिपीडिया:नवीन सदस्यांकडून होणाऱ्या सर्वसाधारण संपादन त्रुटी लेखांचा अभ्यास करावा. आपणास इतरही सहलेखक मार्गदर्शन करतीलच. आपल्या आवडीच्या विषयात असेच लेखन घडत राहो ही शुभेच्छा.