सदस्य चर्चा:संतोष दहिवळ/विशेष चर्चा/२
(येथे हस्तक्षेप टाळावा)
मागील विशेष चर्चा | पुढील विशेष चर्चा |
चावडी प्रचालक निवेदन वरून स्थानांतरीत
संपादनकारवाईची मागणी
संपादनसर्व प्रचालक आणि प्रशासक,
माझ्यावर असभ्य भाषा आणि प्राणीवाचक उल्लेखाने व्यक्तिगत हल्ला करणार्या सदस्यांवर आपण काहितरी कारवाई कराल अशी अपेक्षा होती पण आजवर आपणाकडून कोणतीही कारवाई झाल्याचे दिसलेले नाही म्हणून माझ्यासाठी लांडगा हा प्राणीवाचक शब्द उपहासात्मक अर्थाने वापरणार्या सदस्य:Mahitgar यांच्यावर आपण प्रथमत: कारवाई करावी अशी नम्र मागणी मी आपणाकडे नोंदवित आहे. - संतोष दहिवळ (चर्चा) १६:०७, २० ऑगस्ट २०१३ (IST)
- अहो आदरणीय मान्यवर, असा अचानक आश्चर्याचा धक्का का देत आहात . आपण एकतर हि चर्चा चावडी/प्रचालकांचे मुल्यांकन वर करावी.निवेदनचा असा उपयोग या पुढे करू दिला जाणार नाही निश्चीत.
- >>माझ्यावर असभ्य भाषा आणि प्राणीवाचक उल्लेखाने व्यक्तिगत हल्ला करणार्या सदस्यांवर आपण काहितरी कारवाई कराल अशी अपेक्षा होती पण आजवर आपणाकडून कोणतीही कारवाई झाल्याचे दिसलेले नाही<<
- प्रत्येक गोष्ट आपणास दाखवून केली पाहिजे असे काही आहे का ? कदाचित आपणास कल्पना नसेल पण आपल्या माहिती करता संबंधीत सदस्य खात्यांवर संपादन गाळणीच्या माध्यमातून सुयोग्य निर्बंध घातले गेले होते.
- >>हा प्राणीवाचक शब्द उपहासात्मक अर्थाने वापरणार्या सदस्य:Mahitgar यांच्यावर आपण प्रथमत: कारवाई करावी अशी नम्र मागणी मी आपणाकडे नोंदवित आहे.<<
- हा कोणता नवा आरोप आहे. मी आपल्या चर्चा पानावर सुस्प्ष्ट शब्दात संवाद साधून माहिती दिली की मी प्रत्यक्ष अथवा अप्रत्यक्ष कोणत्याही मार्गाने कुणासही अपशब्द वापरलेला नाही आणि आपणा सारख्या चांगल्या व्यक्तीशी असे वर्तन माझ्याकडून स्वप्नातही व्हावयाचे नाही. या बद्दल मी आपल्या चर्चा पानावर स्वत:हून संवादही साधला. आपण तथाकथीत उपहासात्मक उपयोगाचा संदर्भ देऊ शकाल किंवा कसे ?
- आणि गोष्टी आपण मनात ठेवण्या पेक्षा वेळीच संवाद साधल्यास बरे,मनात अजूनही काही किल्मिषे समज मनात असतील तरतीही समजू द्यावीत. आपल्या सर्व चर्चा आणि आरोपांनतरही माझ्या मनात आपल्या बद्दल यत्किंचीतही किल्मीष नव्हते आणि नाही. आपल्या आरोपांनी मी दुख्खी होतो आहे पण तरीही आपले मन समजावून घेणे मला नश्चितच आवडेल.
- माहितगार (-खुलं खुलं आभाळ तसा.. मीही खुला खुला.. दारं, खिडक्या, भिंती यांची.. सवय झाली तुला..? ) (चर्चा) १७:२७, २० ऑगस्ट २०१३ (IST)
- आपण अभय नातूंच्या चर्चा पानावर संपर्क साधून दिलेल्या वाक्याचा मी शोध घेतला, तो विकिपीडिया चर्चा:चावडी/जुनी चर्चा १ येथे अर्काईव्ह मध्ये गेलेल्या जुन्या चर्चे बद्दल आपण बोलत असाल असा माझा कयास आहे.एवढा लांब काळ आपण हि गोष्ट मनात न ठेवता आपण पूर्ण संदर्भ देण्यात मागे पुढे का केले ते आपणासच ठाऊक,आपली मर्जी.एनी वे आपण समजूत करून घेतलीत तसा त्या शब्दांचा आणि वाक्याचा मुळीच अर्थ होत नाही,आणि काही अर्थ ताणून काढण्याचा प्रयत्न केला तरी तो शब्द मला स्वत:ला लागू होईल, आपल्याला होणार नाही, ते कसे ते खाली स्पष्टीकरण देतो.इतर सदस्यांना जुने काँटेक्स्ट शोधणे समजून घेणे जड जाणार असले तरीही मी इतर सदस्यांच्या अभ्यासा करता सदर वाक्य नमूद करून माझे स्पष्टीकरण मांडतो.
::>>अडथळे(गतिरोधक) ::सशाची गोष्ट आहे झाडाचे पान पडले कि आभाळ कोसळले म्हणावयाची आम्ही ही आपल्या या लांडगा आला मनोवृत्ती कडे दुर्ळक्ष करतो.
- सर्व सदस्य महोदय, उपरोक्त वाक्यात मराठी भाषेत लहान मुलांना सांगितल्या जाणाऱ्या दोन गोष्टींचे रूपक आले आहे.संबंधीत सदस्य महोदय,निष्कर्ष काढण्याची घाई करून आरोप करतात आणि आवश्यकते पलिकडे ओव्हर रिॲक्ट करण्याचा त्यांचा स्वभाव आहे, असा माझा समज होता आणि अद्यापही काही अंशी तसा तो आहे.या संबधाने दोन रुपक कथांचा उडता उल्लेख यात आला आहे.पहिल्या सशाच्या गोष्टीचे रूपक पुरेसे स्पष्ट आहेच, संकट एकदम लहान असतानाही त्याला मोठे म्हणावयाचे असा त्याचा अर्थ होतो.दुसऱ्या रूपकात संकट न येताच संकट आले म्हणावयाचे असा अर्थ होतो. दुसऱ्या रूपकात 'संकट आले', म्हणणारे माझे मित्रवर्य आहेत आणि संकट किंवा शब्दाचा अर्थ ताणावयाचाच झाला तर माझी कृती किंवा मी स्वत: 'लांडगा' ठरतो.मी मला स्वत:ला लांडगा म्हटले असेल तर माझ्या मित्रवर्यांना तत्वत: आक्षेप असण्याचे कारण मला समजलेले नाही. संकट न येताच 'संकट आले' असे आपण का म्हणू इच्छिता असा माझा रोख होता. संबंधीत विवादा बद्दल गैर समज दूर व्हावेत म्हणून मी स्वत: पुढाकार घेऊन मित्रवर्यांच्या चर्चा पानावर संपर्क करून आपणास हव्या असलेल्या 'जावा स्क्रिप्ट' सुविधांना माझा विरोध नाही. आणि मी अपशब्दांचाही विरोधक आहे हे मागेच स्पष्ट केले तरी सुद्धा त्यांनी हि बाब तेव्हाच माझ्याशी चर्चा का केली नाही एवढा काळ मनात का धरून ठेवली हे मला उमगलेले नाही.
- उपरोक्त स्पष्टीकरण पुरेसे आहे किंवा त्याबाबतही काही शंका असल्यास मान्यवर मित्रवर्यांनी स्पष्ट करून घ्याव्यात.इतरही काही किल्मिषे मनात असतील तर तीही स्पष्ट करावीत.
- २) माझ्या याच मान्यवर मित्र महोदयांनी जुने वावविवाद झाले तेव्हा विवादांमुळे संपादने कराविशी वाटत नाहीत असे सांगितले होते, जी मनस्थिती आपली होते तीच इतरांचीही होऊ शकते हे लक्षात घेऊन प्रचालक मुल्यांकना करता हि विशेष चावडी उपलब्ध आहे आणि प्रचालक मुल्यांकन चर्चा,प्रचालक मुल्यांकन चावडीवर कराव्यात अशी विनंती त्यांना मागे सुद्धा केली आहे. प्रचालक निवेदन हे साहाय्य पुर्ती उपलब्ध करण्याचे पान आहे ते न वापरता प्रचालक मुल्यांकना करता कृपया हे पान वापरावे जेणे करून सर्व संबंधीत चर्चा एकाच चावडीवर उपलब्ध राहतील आणि शक्य वाद विवादांमुळे चावडी/प्रचालक निवेदनवरील इतर साहाय्य मागण्या करता आलेल्या सदस्यांना अनावश्य वाद विवाद पडायचे नसल्यास विनाकारन त्यांचा हिरमोड होऊ नये असा साधा सरळ उद्देश आहे.मान्यवर मित्र महोदयांचे आणि इतर सदस्यांचेही या दृष्टीने सहकार्य मिळेल अशी आशा आहे.
- माहितगार (-खुलं खुलं आभाळ तसा.. मीही खुला खुला.. दारं, खिडक्या, भिंती यांची.. सवय झाली तुला..? ) (चर्चा) २०:३८, २० ऑगस्ट २०१३ (IST)
प्रचालकीय उत्तर
संपादनयेथे संवाद साधणाऱ्या संतोष दहिवळ व माहितगार या दोन्ही सदस्यांनी माझ्या चर्चापानावर थेट निरोप ठेवल्याने येथे प्रचालक या नात्याने माझे मत देत आहे.
- सं.द. -- काही दिवसांपूर्वी माझ्याविषयी एका सदस्याने लांडगा हा शब्द वापरला होता. (त्यांचे मूळ वाक्य: >>आम्ही ही आपल्या या लांडगा आला मनोवृत्ती कडे दुर्ळक्ष करतो.<<)
हे वाक्य जर जसेच्या तसे दहिवळांनी उद्धृत केले असले तर मला यात असभ्य भाषा, (दहिवळांचा) प्राणीवाचक उल्लेख किंवा व्यक्तिगत हल्ला यातील काहीही आढळत नाही. मराठी विकिपीडियाच्या चर्चा पानांवर आपल्या दुर्दैवाने या तिन्ही गोष्टींची मुबलक व ढळढळीत उदाहरणे इतस्ततः पडलेली आहेत. त्यांसारखे वरील वाक्यात काहीच नाही.
काल संदीप कुत्र्यागत धापा टाकत पळत आला होता. या वाक्याने संदीपने काल टाकलेल्या धापांचे वर्णन होते. या वाक्याने संदीपचे (कुत्रा असल्याचे) वर्णन किंवा संदीपची (कुत्रा असल्याची) व्याख्या होत नाही.
अभय नातू (चर्चा) ०७:२२, २२ ऑगस्ट २०१३ (IST)
- अभय,
- संदीप कुत्रा आहे या वाक्याला कुणाच्याही स्पष्टीकरणाची गरज नाही.
- >>संतोष दहीवळ हा कुत्रा आहे<< असे कुणाच्यातरी पाळीव खात्याने माझ्याविषयी लिहिलेले आहे. हे पाळीव खात्याने लिहिले आहे हे मी सिद्ध करुन दाखविले असतानाही या पाळीव खात्याला ब्लॉक न करण्यामागे प्रचालक-प्रशासकांचे गमक काय आहे? - संतोष दहिवळ (चर्चा) १०:३५, २२ ऑगस्ट २०१३ (IST)
- ता.क. येथे कुणाकडून संभाव्य विषयांतर झाकले आहे किंवा काही धमकीवजा? सूचना दिसल्यास कुणी आश्चर्य मानू नये. -संतोष दहिवळ (चर्चा) १०:३८, २२ ऑगस्ट २०१३ (IST)
- संतोषजी
- >>संदीप कुत्रा आहे या वाक्याला कुणाच्याही स्पष्टीकरणाची गरज नाही.<<
- संतोषजी ,हे वाक्य गैर आहे. मी आपल्याशी १०१ टक्के सहमत आहे. इतर प्रचालक संबंधीत खात्यावर सुयोग्य कारवाई करण्यास मुक्त आहेत.मी माझ्या परीने कारवाई गाळणी क्रमांक ७६ आणि गाळणी क्रमांक ७७ या संपादन गाळणीच्या माध्यमातून काही उत्पाती खात्यांना चर्चा पानावरून अटकाव करण्याची कारवाई मागेच केलेली आहे. गाळणी क्रमांक ७६ ने अटकाव होणाऱ्या सदस्यास हा संदेश दिसतो तर, गाळणी ७७ ने अटकाव होणाऱ्या सदस्यास हा संदेश दिसतो . त्यातील काही प्रतिबंध विशीष्ट स्वरूपाचे आहेत कि ज्यास जाहीर केले तर वळसा घालून अथवा वेगळ्या नावाने उत्पात केला जाऊ शकतो,तसे होऊ नये म्हणून गाळणी खासगी ठेवली एवढेच आणि या गाळण्यांचे परीक्षण इतर प्रचालक करू शकतातच.
- दुसरे सरळ सरळ असांसदीय उपयोग थांबवण्याकरता इतर गाळण्या लागू केल्या आहेत त्यांची सटीकता वाढवण्याकरता अक्षरश: दिवसरात्र एक करून हजारो संपादने तपासण्याचे काम केले आहे.काही अप्रत्यक्ष असांसदीयतांचाही अभ्यास चालू आहे त्या बद्दल काम पूर्ण होण्या पुर्वी माहिती देणे उचीत होणारे नाही.
- तिसरे जुन्या असंसदीयता वगळण्याचे काम अद्याप बाकी आहे त्यापण निश्चित पणे वगळल्या जातील त्या दृष्टीने प्रशासकिय सांगकाम्यावर काम चालू आहे.इंग्रजी शिवाय एका युरोपायी भाषेतील विकिपीडियावरील विषीष्ट सांगकाम्याचा आणि त्याच्या कार्य पद्धतीचा अभ्यास चालू आहे त्या बद्दल जाहीर चर्चा करणे उचीत नाही.त्या शिवाय वादविवाद टाळण्याच्या दृष्टीने संबंधीत विशेष प्रशासकीय सांगकाम्याला बॉटफ्लॅग देणे लांबवले होते.(बॉट फ्लॅग देण्याचे काम आज करून टाकतो).एकीकडे सांसदीय लेखनाच्या मर्यादा पाळून कठोर लेखन कसे करावे (पहा साचा:{{खुपते|मजकूर = .....|सदस्य = ~~~~}}तर, दुसरीकडे असांसदीयता कालांतराने वगळल्या जाणार आहेत तेव्हा अंसदीय शब्दप्रयोगांचा उपयोग नाही हे बिंबवण्याचा प्रयत्न करून असंसदीयतांचा उपयोगाचे आकर्षण संपवण्याचा प्रयत्नही चालू आहे.
- " मराठी विकिपीडियाच्या दिर्घकालीन दर्जेदार विकासाच्या दृष्टीने विवीध विषयातील तज्ञ मंडळी जोडण्याची गरज आहे.शिक्षक प्राध्यापक प्राचार्य मंडळी मराठी विकिपीडियाशी सावकाशीने पण का होईना जोडली जात आहेत. केवळ वैचारीक मतभेदांवरून चारीत्र्यविषयक बेछूट आरोप करण्याची संस्कृती बळावण्याने आपल्याही नकळत आपल्या शिक्षक प्राध्यापक प्राचार्य मंडळी आणि तज्ञ मंडळींचा हकनाक अपमान होणे आपल्याला खरेच बरे वाटणारे आहे काय ? " अशा सुस्पष्ट भुमीकेचे प्रतिपादन मी आपल्या चर्चा पानावर करून सुद्धा विकिपीडिया संस्कृती इतरांवर विश्वास ठेवण्यास सांगणाऱ्या संस्कृतीशी आपण का बरे फारकत घेऊन आहात, हे मला अद्याप न उलगडलेले कोडे आहे.तसेच मी ज्यांच्यावर विश्वास ठेवतो ते अविश्वास दाखवतात हि मला खुपणाऱ्या गोष्टींपैकी एक गोष्ट आहे.
- भाबडी संवेदनशीलता आणि त्यातून होणारी आरोपबाजी सुद्धा समजता येते,पण अशी गोष्ट एखादे वेळेसच होते. गेले काही महिने कोणत्याही विवादात, प्रत्यक्ष अथवा अप्रत्यक्ष माहितगारांचे नाव कसे उपस्थीत करता येईल असे आपणाकडून जाणीवपुर्वक सातत्याने होते आहे किंवा कसे ? कोणत्याही प्रचालकाच्या कृतींबद्दलचे कोणतेही आक्षेपांची चर्चा प्रथम प्रचालकीय कामाचे मुल्यांकन येथे व्हावयास हवी हे वेगळे सांगण्याची गरज आहे का ? इतर सदस्यांवरच्या कारवाई बद्दल आपण प्रचालक निवेदनवर विचारलेत त्या बद्दल माझा काहीच आक्षेप नाही.पण इतर सदस्यांच्या उत्पाताचा मुद्दा प्रचालक निवेदनवर आणि प्रचालकांचे मुल्यांकन वेगळ्या चावडीवर वेगळ्या चर्चेने करणे आपल्या सारख्या जाणत्या सदस्यास खरेच अवघड आहे किंवा कसे.केवळ याच वेळी नाही आपण सुविधांबाबतची चर्चाही चुकीच्या चावडी पानावर केलीत तर ते ठिक परंतु त्यात आपण प्रचालकांवर टिपण्णीकरून मोकळे होता. प्रचालक नात्याने उत्तर दिलेतरीही विषयांतर होते उत्तर नाही दिले तर माझी टिपण्णी कशी स्मार्ट आहे याने प्रचालकांपुढे दुविधा निर्माण होते,विवाद वाढतात हे जाणते सदस्य म्हणून आपण लक्षात घेत आहात किंवा कसे. आपण एकीकडे वाद विवाद नको आहे म्हणत असता मात्र आपल्या कृती नेमक्या आपल्या बोलण्याशी सुसंगत आहेत किंवा कसे.हे आपण तपासून घ्यावे हि नम्र विनंती.
- माहितगार (-खुलं खुलं आभाळ तसा.. मीही खुला खुला.. दारं, खिडक्या, भिंती यांची.. सवय झाली तुला..? ) (चर्चा) १२:०९, २२ ऑगस्ट २०१३ (IST)
- Mahitgar
- >>आपण एकीकडे वाद विवाद नको आहे म्हणत असता मात्र आपल्या कृती नेमक्या आपल्या बोलण्याशी सुसंगत आहेत किंवा कसे.हे आपण तपासून घ्यावे<<
- तपासायची मला गरज नाही. माझ्या कृती माझ्या बोलण्याशी कशा सुसंगत आहेत याची अनेक उदाहरणे मला देता येतील. एकच देतो - तुमच्या चर्चा पानावर येथे मी संपादन गाळण्यात सुधारणा करण्यासाठी (आभा-समान दूर- ध्वन्य) गदारोळ आणि विवादपटूना आमंत्रित करणे योग्य नाही. असे कळविले होते. ही माझी कृती माझ्या बोलण्याशी सुसंगत आहे की नाही हे तुम्ही तपासून न पाहता इतरांवर सोडावे ही नम्र विनंती.
- >>गेले काही महिने कोणत्याही विवादात, प्रत्यक्ष अथवा अप्रत्यक्ष माहितगारांचे नाव कसे उपस्थीत करता येईल असे आपणाकडून जाणीवपुर्वक सातत्याने होते आहे किंवा कसे ?<<
- विवाद व्हावा असा माझा हेतू कधीच नसतो. गेले काही महिने म्हणजे किती महिन्यांचा काळ सांगता येणार नाही पण मला खुपणार्या, न पटणार्या गोष्टी मग त्या तुमच्या असोत किंवा अभय नातू, संकल्प द्रविड, अभिजीत साठे इत्यादींच्या असोत मी वेळोवेळी माझे म्हणणे उत्तराची अपेक्षा न ठेवता मांडलेले आहे.
- >>इतरांवर विश्वास ठेवण्यास सांगणाऱ्या संस्कृतीशी आपण का बरे फारकत घेऊन आहात, हे मला अद्याप न उलगडलेले कोडे आहे.<<
- इतरांचे जाऊ द्या तुमच्यावर तरी मी विश्वास का ठेवावा? तुम्हाला येथे विचारलेल्या प्रश्नाचे उत्तर मला अजूनपर्यंत न मिळणे हेही मला अद्याप न उलगडलेले कोडे आहे. वर म्हटल्याप्रमाणे तेथे विचारलेले प्रश्नही उत्तराची अपेक्षा न ठेवताच मांडलेले होते. पण उत्तर न मिळाल्यामुळे तुमच्यावर विश्वास ठेवणे माझ्या नैतिक संकेतांना धरुन नाही.
- >>कोणती चर्चा कोठे करावी<<
- चर्चेतील सुसुत्रता राखण्यासाठी कोणती चर्चा कोठे करावी यासाठी पाच-पन्नास वेगवेगळी ठिकाणे/चावड्या असतील पण माझा त्याविषयी अभ्यास नाही पण मी मांडलेले मुद्दे सुसुत्रता राखण्यातले जाणकार योग्य ठिकाणी स्थलांतरीत/स्थानांतरीत करतील यावर माझा विश्वास आहे. वर मांडलेला
- अभय,
- माहितगार (-खुलं खुलं आभाळ तसा.. मीही खुला खुला.. दारं, खिडक्या, भिंती यांची.. सवय झाली तुला..? ) (चर्चा) १२:०९, २२ ऑगस्ट २०१३ (IST)
- संदीप कुत्रा आहे या वाक्याला कुणाच्याही स्पष्टीकरणाची गरज नाही.
- >>संतोष दहीवळ हा कुत्रा आहे<< असे कुणाच्यातरी पाळीव खात्याने माझ्याविषयी लिहिलेले आहे. हे पाळीव खात्याने लिहिले आहे हे मी सिद्ध करुन दाखविले असतानाही या पाळीव खात्याला ब्लॉक न करण्यामागे प्रचालक-प्रशासकांचे गमक काय आहे?
- हा प्रश्नही मी अभय या नावासह अभय नातू यांच्यासाठी विचारलेला आहे. तो त्यांच्या चर्चा पानावर विचारला जावा/स्थलांतरीत व्हावा असे माझेही मत आहे पण चर्चेच्या ओघात तो येथेच विचारला आहे. इतर प्रचालकांचे या प्रश्नाविषयी काय गमक आहे हे त्यांना माहित असेल तर ते सांगतील किंवा त्यांचे स्वत:चे गमक काय आहे याचे स्पष्टीकरण देतील. येथेही उत्तराची अपेक्षा आहे असे नाही. मी फक्त मला पडलेला प्रश्न मांडला. - संतोष दहिवळ (चर्चा) १५:२१, २२ ऑगस्ट २०१३ (IST)
- Mahitgar
- >>आपण एकीकडे वाद विवाद नको आहे म्हणत असता मात्र आपल्या कृती नेमक्या आपल्या बोलण्याशी सुसंगत आहेत किंवा कसे.हे आपण तपासून घ्यावे<<
- तपासायची मला गरज नाही. माझ्या कृती माझ्या बोलण्याशी कशा सुसंगत आहेत याची अनेक उदाहरणे मला देता येतील. एकच देतो - तुमच्या चर्चा पानावर येथे मी संपादन गाळण्यात सुधारणा करण्यासाठी (आभा-समान दूर- ध्वन्य) गदारोळ आणि विवादपटूना आमंत्रित करणे योग्य नाही. असे कळविले होते. ही माझी कृती माझ्या बोलण्याशी सुसंगत आहे की नाही हे तुम्ही तपासून न पाहता इतरांवर सोडावे ही नम्र विनंती.
- क्षमा करा,प्रत्येक मुद्याची वेगळी चिकित्सा करता यावी म्हणून इनलाईन उत्तरे देतो आहे.इतरांना त्यांची मते मांडू द्यात त्याच मी स्वागतच करतो.
- १) 'मी कॉमेंट करून मोकळ व्हाव आणि तुम्ही उत्तर देऊ नका', अशी अपेक्षा रास्त आहे का ?
- २) आपण आलात आणि मत मांडलत,मी आपल्यावर विश्वास ठेवत, मी माझ्या भुमीकेत सुयोग्य बदल करण्याचा ओपन माईंडेडनेस दाखवला.कोणताही दुराग्रह केला नाही. तुम्ही हे केलत किंवा हे केल नाहीत म्हणून मी तुमच्यावर विश्वास ठेवणार नाही किंवा तुमचा विचार मानणार नाही अशी कोणतीही नकारात्मकाता दाखवली नाही.
- ३) त्या वेळची असांसदीयता वगळण्याची कारवाई वस्तुत: संपादन गाळण्या एका विशीष्ट टप्प्यावर पोहोचल्या नंतर, स्टूअर्ड महोदयांशी चर्चा करून चालू केली होती.त्या वेळी आव्हान देण्याचा उद्देशच आपल्या संदर्भाने उत्पात करून गेलेल्या सदस्यांना संपादन गाळणी किती व्यवस्थीत थांबवू शकते हा होता. त्यांना झालेला अटकाव कदाचित आपणास मोकळ्या मनाने पाहता आला असता. एनीवे आपल्याला सदर कारवाई इतर प्रचालकांकडूनच हवी होती.जो जे वांछिल तो ते लाहो म्हणून शुभेच्छा. आणि इतर लोकांच मुल्यांकन येई पर्यंत पूर्ण विराम.-माहितगार
- >>गेले काही महिने कोणत्याही विवादात, प्रत्यक्ष अथवा अप्रत्यक्ष माहितगारांचे नाव कसे उपस्थीत करता येईल असे आपणाकडून जाणीवपुर्वक सातत्याने होते आहे किंवा कसे ?<<
- विवाद व्हावा असा माझा हेतू कधीच नसतो. गेले काही महिने म्हणजे किती महिन्यांचा काळ सांगता येणार नाही पण मला खुपणार्या, न पटणार्या गोष्टी मग त्या तुमच्या असोत किंवा अभय नातू, संकल्प द्रविड, अभिजीत साठे इत्यादींच्या असोत मी वेळोवेळी माझे म्हणणे उत्तराची अपेक्षा न ठेवता मांडलेले आहे.
- खुपणाऱ्या गोष्टी मांडण्याचे स्वागतच आहे.>>विवाद व्हावा असा माझा हेतू कधीच नसतो.<< याचेही स्वागत आहे.पण याच वेळी,अजूनही आपण मनात खुपणाऱ्या मुळगोष्टी मांडत नाही,त्या एवजी छोट्या छोट्या पेरीफरल गोष्टींवर आक्षेप नोंदवता;हे आक्षेप नोंदवले जात असताना एकुण मुद्दा छोटा आहे मग संतोषजी ओव्हर रीॲक्ट का होत आहेत असे समोरच्यांना (किमान पक्षी मला कदाचित इतरांना) वाटते किंवा भावनांना सिंपथी मिळते.इथ पर्यंतही ठिक पण भावनांमध्ये ओथंबलेल्या विचारांमध्ये बरेचसे संबंधीत पैलू आपल्या नजरेतून सुटून जातात,तार्कीकता बाजूला रहाते,विषयांची अनावश्यक सरमिसळ होते, निष्कर्ष घाई होते,आपण लेबल लावून मोकळे होता.प्रॉब्लेम संबंधीत पैलू आपल्या नजरेतून सुटून जातात,तार्कीकता बाजूला रहाते,विषयांची अनावश्यक सरमिसळ होते, निष्कर्ष घाई होते,आपण लेबल लावून मोकळे होता इथून सुरू होतात आणि विवादात भर पडते - लेखन चालू माहितगार
- >>इतरांवर विश्वास ठेवण्यास सांगणाऱ्या संस्कृतीशी आपण का बरे फारकत घेऊन आहात, हे मला अद्याप न उलगडलेले कोडे आहे.<<
- इतरांचे जाऊ द्या तुमच्यावर तरी मी विश्वास का ठेवावा? तुम्हाला येथे विचारलेल्या प्रश्नाचे उत्तर मला अजूनपर्यंत न मिळणे हेही मला अद्याप न उलगडलेले कोडे आहे. वर म्हटल्याप्रमाणे तेथे विचारलेले प्रश्नही उत्तराची अपेक्षा न ठेवताच मांडलेले होते. पण उत्तर न मिळाल्यामुळे तुमच्यावर विश्वास ठेवणे माझ्या नैतिक संकेतांना धरुन नाही.
- १अ) प्रश्नांना उत्तरे मिळाली नाहीत म्हणून विश्वास नाही की, विश्वास ठेवायचा नाही आणि इतरांचा विश्वास तोडता यावा म्हणून प्रश्न विचारले होते किंवा कसे.
- २) पालक/शिक्षकांनी उत्तरे दिली नाहीत किंवा विलंब केल्यास (याची वेगवेगळी ग्राह्य कारणे सुद्धा असु शकतात किंवा कसे ) म्हणून विद्यार्थी उत्तर न मिळाल्यामुळे तुमच्यावर विश्वास ठेवणे माझ्या नैतिक संकेतांना धरुन नाही असे म्हणावयास लागल्यास कसे.( याचा (सकारात्मक) संबंध असू शकतो आपल्याला लगेच लक्षात येइल किंवा घ्याल, असे सध्या मलाच विश्वास उरला नाही हि वेगळी गोष्ट)
- ३) जसे व्यक्त होणे हा अभिव्यक्ती स्वातंत्र्याचा भाग असते तसे, मौन आणि निष्क्रीयता केव्हा पर्यंत बाळगावी याचाही अभिव्यक्ती स्वातंत्र्यात समावेश होतो.खास करून स्वयंसेवी काम करणाऱ्यांवर कोणती क्रिया करावी आणि केव्हा करावी याची सक्ती केली जाऊ शकत नाही.(याला तुमच्या भाषेत कदाचित नौकर असणे नौकर नसणे अशा शब्दात वाचल्याचे आठवते.) तरी सुद्धा मी माझ्या सवडीनुसार मला असलेल्या योग्यवेळी सुयोग्य उत्तर देणार आहे,त्याच वेळी केलेल्या कालापव्ययाची जस्टीफीकेशन सुद्धा सांगेन.
- ४) आपल्याच तथाकथीत प्रश्नांची रदबदली करण्याकरता आलेल्या एका सदस्यास मी मागेच स्पष्ट केले आहे की प्रश्न विचारण्याचे अभिव्यक्ती स्वातंत्र्य जसे आपल्याला आहे तसे माझ्या उत्तरांची लांबी आणि तेही किती टप्प्यात द्यावयाचे ठरवण्याचे माझे स्वत:चे अभिव्यक्ती स्वातंत्र्य आहे.माझ्या उत्तराची लांबी काय असावी हे अटी लादण्याचा प्रश्नकर्त्यास कोणताही नैतीक अधिकार नाही. आणि संबंधीत विषयावर उत्तराच्या लांबीचा बाऊ न करता संवाद साधण्या बद्दल मी मागेही आपणास लिहिले होते त्या अर्थाने होणाऱ्या कालापव्ययास आपणही जबाबदार आहात हे आपणही लक्षात घेतले असते तर बरे झाले असते.
- ५)/१ब) विश्वास न ठेवणे आणि न ठेऊ देणे हे आपण आधीच ठरवलेले असण्याची शक्यता,आणि आपल्या सातत्याच्या व्यक्तीहनन प्रयास अद्यापही चालू असण्याचे मूळ कारण, माझ्या सोबतीचे आधी इतर कुणी प्रचालक कसे झाले,याने दुखावलेल्या अहंकाराने मी इतर व्यक्तीस प्रचालक बनवण्याकरता पुढाकार घेतो अशा पुढाकाराचे स्वागतच आहे,त्यातील नवीन प्रचालकाच्या चुकीस मी आक्षेप घेतो हे ठिकच आहे.पण बॉटफ्लॅग मिळाल्याच्या नंतर मी वादविवादा बद्दल उद्वीग्नता जाहीर करतो,आता बॉटफ्लॅग मिळाला आहे आता विषय संपवू असे,प्रचालकांच्या कच्छपी लागलेल्या सदस्यांना मी म्हणत नाही हेही ठिक आहे.() खरच मी ओव्हर रीॲक्ट होत नाहीए ? का मी एवढा ओव्हर-रीॲक्ट होतो आहे ?
- ६)/१क) काही प्रचालकांची तात्वीक कारणांकरता बाजू घेतो,खूपच छान गोष्ट आहे;पण त्याची चर्चेत तार्कीक मांडणी करण्यापेक्षा माझ्या आवडीच्या प्रचालकांवर टिका करणाऱ्यांवर आणि त्यांना आशिर्वाद असल्याचा आभास झाल्यामुळे डूख धरल्यागत दिसेल त्याच्यावर संशयाच हत्यार उपसतो,कोणतेही नियम न मोडता वेठीस धरून दाखवण्याचा पण केल्यागत वागत रहातो,स्वत:च्या चष्म्यावरचे डाग पुसण्यापुर्वीच हा कलंकीत का तो कलंकीत करत बॅंडबाजा बडवण्याचा सवंगपणा करतो , मी ओव्हर रीॲक्ट होत नाहीए ?
- ७)/१ड) प्रचालकांच्या कच्छपी लागलेल्या सदस्यांची समजूत काढण्यात, सहकार्य मागू इच्छित आलेल्या दुसऱ्या प्रचालकाला बेशालक स्वत:चा खोचकपणा स्विकारत हेतुपरस्सर प्रश्न अवेळी उपस्थीत करतो,वाद वाढतील असा प्रत्येक प्रयत्न सातत्याने करतो आणि मला वाद वाढवायचे नाहीत असा जपही करतो.उक्ती आणि कृतीततील सुसंगतता तपासून पाहाण्याची मला गरज नाही असेही वर म्हणतो.
- ८)/१इ)ब्लॉक करण्यापूर्वी सदस्यांना किमान सूचना करण्याच्या उपदेशाचा प्रशासकांना डोस पाजतो, पण मी असांसदीयता टाळण्याच्या संकेतांना सोडून वागणाऱ्या सदस्यांना एकदाही विनंती करून पहाणे हे माझे काम नाही कारण प्रचालक नसतो.माझ्यापेक्षा विरूद्ध विचारांच्या व्यक्तींच्याही काही बाजू आहेत का हे समजून घेण्याचे कोणत्याही प्रयत्नात मला रस नसतो.केवळ आमचीच बाजू कशी बरोबर हे सांगणे इतरांप्रमाणे मलाही प्रीय असते हेही ठिक आहे.
- ९) १ई) मी बॅंडबाजा लावून, इतरांना प्रश्न विचारताना,मी सर्व विकिसंकेतात केवळ माझीच Phd असल्या प्रमाणे प्रश्न तयार करतो आणि विचारून मोकळा होतो :) आपल्या प्रश्नात भयानक तार्कीक उणीवा असू शकतात याचे भान राखण्याची मला गरज नसते.पण आपल्या जाणत्या सदस्यांची माहिती अर्धवट राहून जाऊ नये,भावनेच्या गर्तेत आपल्या सदस्यांची तार्कीक बैठक कच्ची राहू नये ,तर्कसंगत विचारसरणीत मराठी लोक आणि मराठी विकिपीडिया मागे राहू नये म्हणून जाणकारांना मात्र तर्कपूर्ण कठोर टिका कशी करावी,मनाचा खुले पणा कसा जोपासावा इत्यादी विवीध लेख लिहावे लागतात.तार्कीक उणीवा लक्षात आणून देण्याकरता प्रकल्प उभे करावे लागतात.माझ्या दृष्टीने त्यांनी काय करावे याच्याशी मला काही सोयर सुतक नाही असे म्हणू शकतोच,प्रचालकांच्या आणि इतर सदस्यांच्या उत्तरांची लांबी मीच ठरवणे गरजे असते नाहीतर मी कन्फ्यूज वगैरे होऊ शकतो,मी कन्फ्यूज होऊनये याची काळजी इतरांनी घ्यावी नाहीतर अवेळी फ्यूज वगैरे उडवण्याचा बार पण मी लावू शकतो.नंतर मला स्वत:ला मात्र आरोपबाजी करण्याशिवाय काहीच करावे लागत नाही.
- >>कोणती चर्चा कोठे करावी<<
- चर्चेतील सुसुत्रता राखण्यासाठी कोणती चर्चा कोठे करावी यासाठी पाच-पन्नास वेगवेगळी ठिकाणे/चावड्या असतील पण माझा त्याविषयी अभ्यास नाही पण मी मांडलेले मुद्दे सुसुत्रता राखण्यातले जाणकार योग्य ठिकाणी स्थलांतरीत/स्थानांतरीत करतील यावर माझा विश्वास आहे. वर मांडलेला
- कि एखादी गोष्ट माझ्या मर्जीप्रमाणे नाही म्हणून मी सहकार्य करण्याचे अप्रत्यक्षपणे नाकारू इच्छितो ? आपण मांडता तशीच भूमीका इतर सदस्यांणी चावड्यांच्या बाबतीत घेत राहीले आणि मुख्य नामविश्वातही अशाच भूमीका इतर काही सदस्यांनी घेतल्या आणि उद्द्या प्रचालक प्रशासकांना उलट विचारले कि दहिवळांना वेगळा न्याय आणि आम्हाला पक्षपात असे का ? तर प्रचालकांनी काय उत्तर द्यावे अशी आपली अपेक्षा आहे ? लेखन चालू माहितगार
- अभय,
- संदीप कुत्रा आहे या वाक्याला कुणाच्याही स्पष्टीकरणाची गरज नाही.
- >>संतोष दहीवळ हा कुत्रा आहे<< असे कुणाच्यातरी पाळीव खात्याने माझ्याविषयी लिहिलेले आहे. हे पाळीव खात्याने लिहिले आहे हे मी सिद्ध करुन दाखविले असतानाही या पाळीव खात्याला ब्लॉक न करण्यामागे प्रचालक-प्रशासकांचे गमक काय आहे?
- हा प्रश्नही मी अभय या नावासह अभय नातू यांच्यासाठी विचारलेला आहे. तो त्यांच्या चर्चा पानावर विचारला जावा/स्थलांतरीत व्हावा असे माझेही मत आहे पण चर्चेच्या ओघात तो येथेच विचारला आहे. इतर प्रचालकांचे या प्रश्नाविषयी काय गमक आहे हे त्यांना माहित असेल तर ते सांगतील किंवा त्यांचे स्वत:चे गमक काय आहे याचे स्पष्टीकरण देतील. येथेही उत्तराची अपेक्षा आहे असे नाही. मी फक्त मला पडलेला प्रश्न मांडला. - संतोष दहिवळ (चर्चा) १५:२१, २२ ऑगस्ट २०१३ (IST)
- Mahitgar,
- >>१) 'मी कॉमेंट करून मोकळ व्हाव आणि तुम्ही उत्तर देऊ नका', अशी अपेक्षा रास्त आहे का ?<<
- आपल्या कृती नेमक्या आपल्या बोलण्याशी सुसंगत आहेत किंवा कसे.हे आपण तपासून घ्यावे - मी उत्तर देण्यापूर्वी तुम्ही ही कॉमेंट करुन मी माझ्या बोलण्याशी सुसंगत नाही हे तुम्ही आधीच ध्वनीत करुन दिलेले आहे त्यामुळे तुम्हाला माझे बोलणे आणि कृती तपासण्याची परत गरज नाही ते इतरांना तपासू द्यावे अशी पुन्हा एकदा नम्र विनंती. - संतोष दहिवळ
- Mahitgar,
- >>२) आपण आलात आणि...........<<
- मूळ मुद्दा माझे बोलणे आणि कृतीशी आहे. माझ्या कृतीनंतर तुम्ही काय केले याचा प्रश्नच उद्भवत नाही. - संतोष दहिवळ
सदस्य:Mahitgar महोदय,
()
सदस्य:Mahitgar महोदय,
तुम्हाला तुमच्या मागच्या (कारस्थाना?) वेळीच
या संपर्कात झालेल्या विषयासंबंधीचे इत्यंभूत तपशीलही मी येथे देऊ इच्छित आहे तरीही ज्यांच्याशी माझा संपर्क झाला आहे त्यांना मी अशी विनंती करतो की त्यांनी मला त्यांच्याशी झालेल्या संपर्काचे इत्यंभूत तपशील मला जाहीर करण्याची परवानगी द्यावी. किंवा स्वत:हून जर ते जाहीर करत असतील तर माझ्याशी झालेल्या संपर्काविषयीची संपूर्ण माहिती त्यांनी जाहीर करण्यास मी पूर्ण परवानगी त्यांना देत आहे.
असे कळविलेले आहे. पण न झालेले संवाद जाहीर करावेत असा थोडाच त्याचा अर्थ आहे.
- महोदय दोन व्यक्तीं मधल संभाषण नाकारण्याचा अधिकार त्या दोन पैकी प्रत्येकाला असू शकतो,आपला आधिकार मी ग्राह्य धरतो ."ज्या व्यक्तीमुळे मराठी विकिपीडियावर वादविवाद चालू आहेत त्यांनी राजीनामा दिल्यास विवाद कमी होतील" अशा अर्थाचे वाक्य मला कुणी म्हणालेच नाही. मला केवळ भास झाले हे मी नाईलाजास्तव मान्य करतो.आणि माझे शब्द मागे घेतो.() हे प्रशासकांच्या मनाचे खेळ होते हे ही मला मान्य आहे.प्रशासक म्हणून प्रशासक निष्पक्षपणे वागलेच नाहीत,उलटपक्षी आम्हाला राजकारणातल अक्षर पण येत नसताना, प्रशासकांनी राजकारण केले म्हणून आम्ही दोघे एकत्र येऊन प्रशासकांना सरळ करू इच्छितो.मी प्रशासक या नात्याने आपल्या दोन्ही बाजूंच्या लोकांचा अत्यंत आभारी आहे.मला केवळ सदस्य:मनोज यांची आठवण झाली. त्यांनीच केवळ फिल्डवर्क करू नका म्हणून सुजाण सल्ला दिला होता तेव्हा तो पटला नव्हता.पण सदस्य मनोज यांना मी कळवू इच्छितो की सदस्य मनोज तुम्ही बरोबर होता , मी फिल्ड मध्ये काय काय होऊ शकते कसे दबाव दिले जाऊ शकतात ह्याचे सर्व पैलू समजू शकलो नव्हतो.
सदस्य:Mahitgar महोदय,
()
- मी आपल्या इच्छेप्रमाणे वरच्या प्रतिसादात दुरूस्ती प्रतिसाद जोडला आहे.बदनामीची मोहीम आपण उघडलीच नव्हती माहितगारांचे तर नाव पण काढले नव्हते बरोबर ना ? हो आपण बरोबरच आहात.संकल्प द्रविडांना चौकट विषयावरून छळायचे तर छळू द्या असा विचार न करता , मोकळेपणाने जबाबदारी मानण्याचा माहितगारांचा स्वभाव म्हणजे नुसते नाटक नाटक आणखी काय ?
सदस्य:Mahitgar महोदय,
तुमच्या प्रत्येक मुद्द्याची वेगळी चिकित्सा करता येईल एवढे मी अथक लिहू शकतो पण मूळ मुद्द्याला (पाळीव खात्याला ब्लॉक न करण्यामागे प्रचालक-प्रशासकांचे गमक काय आहे?) याला बगल देऊन चर्चा करण्यात मला कुठलेही स्वारस्य नाही तरीही तुम्ही मुद्दा सोडून लिहिलेल्या काही मुद्द्यांना नाईलाजाने या चर्चेत त्रोटक उत्तरे दिली आहेत. - संतोष दहिवळ (चर्चा) १९:४८, २३ ऑगस्ट २०१३ (IST)
- बरोबर हो शांत तलावात मला तर फक्त मासेच पकडावयाचे होते पण जाताजाता तलावाचा प्रशासक जागा आहे का पहाण्याकरता म्हणून त्याच्यावर जरा चिख्खल उडवता येतो का पाहावयाचे होते म्हणून एक दगड मारून पाहीला होता बस बाकी काही नाही.मुद्दांची चिकित्सा म्हणून मी सुद्धा माझ समर्थन करत राहू शकतोच की,पण प्रत्यक्षात तर्कसंगत चर्चेला तर्कसंगत उत्तरे देण्या पेक्षा माझा भर हा कोण तो कोण च्या नसत्या चौकशा करण्यावर अधिक असतो किंवा कसे.
Matitgarchalejao,
आपण माझ्या चर्चा पानावर येऊन काय लिहिले याच्याशी माझे देणे-घेणे नाही मात्र त्यातील माझा व्यवसाय एखाद्याने जाहीर करणे हे मी गोपनीय संकेतांचे उल्लंघन मानतो जे सदस्य:Mahitgar यांनी केलेले आहे आणि याबाबतीत मी आपणाशी सहमत आहे. () आणखीही मी दूरध्वन्य होऊन (दूरध्वनीवर बोलणे?) कुणाशी काय बोललो हे दुसर्याने जाहीर करणे हे गोपनीय संकेतांचे उल्लंघन आहे हे प्रशासक असलेल्या या मान्यवरांच्या खिजगणतीत नसावे. पाळीव खात्याला ब्लॉक न करण्यामागे प्रचालक-प्रशासकांचे गमक काय आहे? या अभय नातूंसाठी असलेल्या माझ्या प्रश्नाला उत्तर सोडून एकंदरीत मला बदनाम करण्यासाठी सदस्य:Mahitgar यांनी चालवलेले हे कुटील कारस्थान आहे असे दिसते. मांडलेल्या प्रश्नाला उत्तर सोडून एखाद्याची बदनामी करणे हा प्रकार अत्यंत निंदनीय आहे. - संतोष दहिवळ (चर्चा) १९:४८, २३ ऑगस्ट २०१३ (IST)
- संतोषजी >> मला बदनाम करण्यासाठी सदस्य:Mahitgar यांनी चालवलेले हे कुटील कारस्थान आहे असे दिसते<< माहीतगारचे नाव नाहक चर्चांमध्ये घसीटणार तुम्हीच आणि उत्तर दिल्यास वापस आरोप करणार तुम्हीच आणि तरीही आपल्या वर्तनात अजिबात आक्षेपार्ह काहीही नाही माहितगारांनी तर्कसंगत मांडलेल्या विचारांना निंदनीयच ठरवले पाहीजे,त्यांनी केलेल्या कोणत्याही कृतीत चांगले मला कधीही दिसणारच नाही याची मी या जन्माकरता तरी खूण गाठ बांधली आहे.संतोषजी, आपण भारी भारी विनोदही करू शकता हे ह्या विधानाच्या निमीत्ताने समजले, ते बरे झाले.जसे आमचे आपल्याशी गत सात जन्मांचे हाडवैर असावे, म्हणून का आम्ही आपणास बदनाम करण्यासाठी कुटील कारस्थान वगैरे करतो? :संतोषजी आपले विधान जरासे राजकारणी लोकांच्या तोंडी शोभणारे नाही ना,माझ्या जागी इतर कुणी असते तर ह्या परीस्थितीत (....उलट्या.... अथवा उलटा...कोतवाल को डाटे असा एखादा) चपखल वाक्प्रचार बिनदिक्कत वापरला असता.उलटपक्षी आपणाशी सुसंवाद घडावा म्हणून पुन्हा पुन्हा स्वत:हून पुढाकार घेत राहीलो हि वस्तुस्थिती आपण खुबीने दडवू पाहता .
- त) संतोषजी विवादातील आपल्या द्वेषदोषयूक्त प्रचार,आरोपबाजीमुळे आणि मतांतरांमुळे का होईना,आपण आपल्याही नकळत दोन मुद्यांचे महत्व मान्य केलेत यातले पहीले गोपनीयते गरज आपण मान्य केलीत याचा मला आनंदच आहे.२० ऑगस्टला नरेंद्र दाभोलकरां बद्दलची बातमी ऐकुन मन सुन्न झालेल्या मन:स्थितीत असताना,वेगळ्याच विषयावरचा आपला चर्चा प्रस्ताव आलेला पाहून मी आश्चर्यचकीत झालो होतो.आम्ही महाराष्ट्रीयन लोक स्वत:ला वैचारीक पुरोगामीत्वाचे प्रमाणपत्र देऊन स्वत:च्या पाठीवर शाब्बासकी मारून घेतो.पण प्रत्यक्षात महाराष्ट्रातील वैचारीक स्वातंत्र्यावरील मर्यादांचे भिषण वास्तव २० ऑगस्टला नरेंद्र दाभोलकरांवर आलेल्या प्रसंगाच्या निमीत्ताने प्रकट झाले.सार्वजनिक जीवनात काम करणाऱ्या व्यक्तींना आंतरजालावर काम करताना आपली गोपनीयता जपण्याची गरज असू शकते.आपल्यातील बरेचसे जण इंग्रजी विकिपीडियातील नियमांचे भोक्ते आहेत आपण तेथील एका पेक्षा अधिका खाती असण्याबद्दलचे वेगवेगळे निकष बघीतले असतीलच त्यात म्हणूनच सार्वजनिक जीवनात काम करणाऱ्या व्यक्तींना विकिवर वेगळी गोपनीय खाती बाळगण्याचा अधिकार आहे ढळढळीतपणे नमूद केलेला आहे.आपण आधीच निष्कर्षकाढून स्वमर्जीने निकालाचे स्वत:च्या पुर्वग्रहदोषांच्या बाजूने प्रीफिक्सींग केलेल्या तथाकथीत प्रश्नांची यादी माझ्याकडे पाठवताना ढळढळीत वास्तवाकडे आपले दुर्लक्ष झाले किंवा कसे.या निकषाखालील खात्यांबद्दल कुणीही कुणालाही कोणतीही माहिती देणे लागत नाही.
- थ) संतोषजी,उद्या तुम्ही मला सांगितलेत की मी पूर्व दिशेस फिरावयास गेलो याचा अर्थ मी फक्त आपण पूर्व दिशेस फिरावयास गेला होता एवढाच घेतो. आपण पुर्व दिशेस गेला होता म्हणून पुर्व दिशेस झालेल्या सगळ्या चांगल्या वाईट गोष्टीचे खापर आपल्या माथी फोडणे जसे रास्त नाही त्या प्रमाणे प्रचालकीय खात्याव्यतरीक्त खात्यातून तांत्रिक आणि इतर गोष्टी तपासून पहाण्याची गरज असू शकते म्हणून खाते आहे म्हटले तर त्या बद्दल अवास्तव शेरेबाजी अस्थानी आणि पुर्वग्रह दोषाचीचतर असते. नवीन सदस्य नोंदीत येथे केवळ mahitgar नावाने सर्च दिला असतात तर MahitgarsTest AC 1 , Mahitgar test ac 2 Mahitgar trainer हि खाती सर्वांना ढळढळीत पणे पहाण्यास उपलब्ध आहेत.यातील MahitgarsTest AC 1 , Mahitgar test ac 2 या खात्यांचे एकही योगदान नाही.Mahitgar trainer हे खाते खाते कसे उघडावे याचे विकि अकॅडेमीत ट्रेनींग देण्याकरता उघडले त्यावर एकच योगदान आहे. सहकार्य मागण्याकरता आलेल्या व्यक्तीवर कसे हेतुपूर्वक आरोप केले जात राहू शकतात हे सगळ्यांना व्यवस्थीत पाहता यावे आपल्या डिवचल्या गेलेल्य अहंकाराने कशातही चांगले पहाण्याचे सोडून दिल्याचे लक्षात आल्याने, आपल्याशी संवाद साधून आपल्या तार्कीक उणीवा आपणास दाखवून देई पर्यंत मी आपल्या उत्तर देण्यास जाणीव पुर्वक विलंब केला.
- द) आपल्या तथाकथीत प्रश्नावलीतील काही तार्कीक उणीवा दाखवून देणे अजूनही बाकी आहे ते या आधी म्हटल्या प्रमाणे माझ्या सवडीने आवडीने जमेल तेव्हा करेन.
- ध) वस्तुत: आपल्याबद्दल मी आदर का आणि कसा (सकारात्मक अर्थाने) ठेवू इछितो या बद्दल चांगल्याच उद्देशाने लिहिताना झालेला आणि आपल्याला (इतरांनी सांगीतल्यानंतर?) खटकलेला शब्द प्रयोग अजून एका चांगल्या विशेषणाने बदलला आहे.मी आपल्या गोपनीयता राखण्याच्या इच्छेचा पूर्णत: आदर करतो.वस्तुत: माझ्या व्यक्तीगत गोपनीयतेच्या महत्वा पेक्षा इतर व्यक्तींच्या व्यक्तींच्या व्यक्तीगत माहिती बद्दल गोपनीयतेचे संकेत मराठी विकिपीडियन समुदायाने जोपासण्याच्या महत्वा बद्दल सजगता यावी याच दृष्टीने मी गोपनीयतेच्या प्रश्नास महत्व देतो होतो. प्रशासक या नात्याने गोपनीय माहिती काही कारणाने कळत न कळत उघडी झाल्यास अशी संपादने झाकता येतात .आपणास माहिती झाकून नको असल्याचे न कळवल्यास ती झाकली जाईल
- त्याच वेळी ()
- विकिपीडियाच्या संदर्भाने (आपल्या शब्दात चौकटी बाहेर ) केलेली चर्चेची कालौघात माहिती देणे, ट्रासंपरंसी आणि सदस्य मार्गदर्शनाच्या दृष्टीने सयूक्तीक असू शकते. प्रचालक अथवा प्रशासकावर अनाठायी दबाव आणले गेले असल्यास त्याबद्दल सुयोग्य पद्धतीने नाराजी व्यक्त करणे हा संबधित प्रचालकाचा प्रिरॉगेटीव्ह असू शकतो.
- संतोषजी एक सहसदस्य काही गोष्टी लक्षात आणून देण्याकरीता म्हणून, स्वत:च्या मनावर दगड ठेऊन कोठे कोठे थोडे कठोरतेने लिहावे लागले. काही उणे दुणे लिहिले गेले असल्यास मोठ्या मनाने क्षमा करावी. त्यात कुठे संकेतास सोडून लेखन असेल तर प्रशासकीय साफसफाई कारवाईच्या वेळी ते काळाच्या ओघात वगळण्याचा प्रयास असेल.
- माहितगार (-खुलं खुलं आभाळ तसा.. मीही खुला खुला.. दारं, खिडक्या, भिंती यांची.. सवय झाली तुला..? ) (चर्चा) १४:१२, २४ ऑगस्ट २०१३ (IST)
- सदस्य:Mahitgar,
- ()विकिपीडियाबाहेरही माझी सार्वजनिक बदनामी कशी होईल असेच तुम्ही पाहिले() हे तुम्ही गोपनीयतेचा कितीही आव आणत असला तरी जाणीवपूर्वक तुम्ही विसरला हे अक्षम्य आहे.
- धन्यवाद. -संतोष दहिवळ (चर्चा) १५:१२, २४ ऑगस्ट २०१३ (IST)
- माहितगार (-खुलं खुलं आभाळ तसा.. मीही खुला खुला.. दारं, खिडक्या, भिंती यांची.. सवय झाली तुला..? ) (चर्चा) १४:१२, २४ ऑगस्ट २०१३ (IST)
वितंडवाद?
संपादनमाहितगार आणि संतोष,
येथे चाललेल्या चर्चेत अनेक मुद्दे उपस्थित केले गेलेले आहेत. मुद्द्यांचे खंडन, प्रतिखंडन, त्याचे खंडन, पुन्हा प्रतिखंडन सुद्धा झालेले दिसत आहे. या सगळ्यात मूळ प्रश्न (मला तरी) पार हरविलेला दिसतो. वादाच्या ओघात असे होऊ शकते हे अगदी मान्य. तरी तूर्तास यात अधिक वेळ व उर्जा न घालविता आपण दोघांनीही थोडे दमाने घ्यावे ही कळकळीची विनंती. या पानाकडे लक्ष न देता आपली मराठी विकिपीडियावरील इतर कामगिरी चालू ठेवावी ही सुद्धा अपेक्षा.
या सगळ्यातून मला दहिवळांचा मला कोणा पाळीव खात्याने कुत्रा म्हणले त्यावर कारवाई का नाही? हा एक प्रश्न दिसत आहे. यास उत्तर देण्यासाठी दहिवळांनी (शक्यतो माझ्या चर्चा पानावर) दुवे द्यावेत म्हणजे हा आरोप निर्विवाद आहे किंवा कसे यावर माझे मत देता येईल. निर्विवाद असल्यास पुढे काय करावे हे सुद्धा ठरवता येईल. यासाठी सदर हल्ला कोठे झाला याचा दुवा, हल्ला करणारा सदस्य पाळीव खातेसदस्य होता हे सिद्ध करणारा दुवा कृपया द्यावा. कदाचित तुम्ही हे दुवे पूर्वी दिले असतीलही पण स्पष्ट आणि पारदर्शक मत देण्यासाठी हे दुवे असणे गरजेचे आहे तरी ते पुन्हा एकदा द्यावे ही विनंती.
यादरम्यान Matitgarchalejao या सदस्यमहाशयांनी या चर्चेत ढवळाढवळ करणे त्वरित थांबवावे ही आग्रहवजा विनंती करतो. इतरांनीही या अखाड्यात (इतक्यात तरी) उतरू नये ही रास्त अपेक्षा.
धन्यवाद.