सज्जनपाडा
सज्जनपाडा हे भारतातील महाराष्ट्र राज्यातील पालघर जिल्ह्यातील पालघर तालुक्यातील गाव आहे. हे उत्तर कोकणचा भाग आहे.
भौगोलिक स्थान
संपादनपालघर रेल्वे स्थानकापासून मनोर राज्य महामार्गावर वाघोबा खिंड पार केल्यानंतर हे स्थित आहे. पालघर रेल्वे स्थानक ते सज्जनपाडा १० किमी अंतर आहे.हा डोंगराळ भाग असल्याने येथे साग,ऐन,पळस,कारवी, इत्यादी जंगली झाडे भरपूर प्रमाणात आहेत.
हवामान
संपादनउन्हाळ्यात येथे फार उष्ण हवामान असते. पावसाळ्यात भरपूर प्रमाणात पाऊस पडतो. हिवाळ्यात सुखद गारवा अनुभवायला मिळतो.
लोकजीवन
संपादनयेथे मुख्यतः आदिवासी समाजातील लोक पिढ्यानपिढ्या स्थायिक आहेत. बहुतेक लोक वनकामगार म्हणून आजूबाजूच्या जंगलात काम करतात. महाराष्ट्र सरकारच्या नवीन कायद्यामुळे बऱ्याच आदिवासींना कसत असलेली वनजमीन मिळाल्याने काही लोक त्या जमिनीत स्वतः नागलीशेती,भातशेती करतात.जंगलातील वेगवेगळ्या मोसमात होणारी फळे, फुले, भाज्या विकून काही लोक आपला उदरनिर्वाह करतात. येथील आदिवासींचे जीवन फारच खडतर, कष्टदायक, आणि जिकिरीचे आहे.अशिक्षित व अपुऱ्या साधनसामुग्रीमुळे कोणी आजारी पडला तर दवाखान्यात नेण्यासाठी फारच कुचंबणा होते. बाळंतपण वगैरे गावातील वडीलधाऱ्या बाई माणसाकडून घरीच केले जाते.येथील आदिवासी समाजात अद्यापही पाहिजे तसा शिक्षण प्रसार झालेला नाही. त्यामुळे समाजात अंधश्रद्धा,अज्ञान, अडाणीपणा, अवास्तव भीती सतत आढळून येते. आदिवासी बांधव प्रत्येक उत्सव व सणाच्या प्रसंगी पारंपरिक पद्धतीने पारंपरिक वेशभूषा करून तारपा नृत्य, ढोलनाच,सांबळ नाच,तुरनाच,गरभानाच,मादोळनाच,इत्यादी आदिवासी पारंपरिक नृत्य करतात.
नागरी सुविधा
संपादनपालघरवरून येथे येण्यासाठी मनोर, मासवण , काटाळे,बहाडोली,दुखटण कडे जाणाऱ्या सर्व एसटी बसेस चालतात.