मासवण
मासवण हे भारतातील महाराष्ट्र राज्याच्या पालघर जिल्ह्यातील पालघर तालुक्यातील गाव आहे.हा भाग गुजरात राज्याला लागून आहे व उत्तर कोकणपट्टीत मोडतो.
हे गाव पालघर रेल्वे स्थानकापासून पूर्वेला माहीम-मनोर राज्यमार्गावर १३ किमीवर सूर्या नदीवर वसलेले आहे. सूर्यानदीवरील पूल ओलांडल्यावर लगेच मासवण गावाची हद्द चालू होते. गावाच्या पश्चिमेकडून वर्षभर सूर्यानदी वाहत असते. मुसळधार पावसाळ्यात कोकणातील नद्याप्रमाणे ती दुथडी भरून वाहत असते आणि काही वेळा वाहतूकसेवा बंद होऊन लोकांचा संपर्क तुटतो.
?मासवण महाराष्ट्र • भारत | |
प्रमाणवेळ | भाप्रवे (यूटीसी+५:३०) |
जिल्हा | पालघर |
भाषा | मराठी |
कोड • पिन कोड • दूरध्वनी • आरटीओ कोड |
• ४०१४०४ • +०२५२५ • एमएच४८ |
संकेतस्थळ: http://villagemap.in/maharashtra/thane/palghar/2726400.html |
जनजीवन
संपादनमुख्यतः वंजारी,कुणबी,व आदिवासी समाजाच्या लोकांची ह्या भागात वस्ती आहे.शेती व बागायती हा परंपरागत व्यवसाय असून जोडधंदा म्हणून दुग्धव्यवसाय आणि घरगुती स्तरावर कुक्कुटपालन केले जाते. सूर्यानदीवर अगदी छोट्या प्रमाणात लहान जाळी वापरून मासेमारी केली जाते.नवीन पिढी सरकारी,खाजगी नोकरीसाठी पालघर तसेच विरार मुंबई येथे स्थायिक झालेली आहे.काही लोक व्यवसायानिमित्ताने पालघर, मुंबई येथे रोज ये-जा करीत असतात. हे मध्यम आकाराचे गाव आहे.२०११ च्या भारतीय जनगणनेनुसार गावात ४०२ कुटुंबे राहतात. एकूण १६६७ लोकसंख्येपैकी ८२५ पुरुष तर ८४२ महिला आहेत. गावाची साक्षरता ७५.१२ टक्के आहे.पुरुष साक्षरता ७९.९२ आहे तर स्त्री साक्षरता ७०.४६ आहे. गावातील वय वर्ष शून्य ते सहा वर्षे लहान मुलांची संख्या २१२ आहे. ती एकूण लोकसंख्येच्या १२.७२ टक्के आहे.
नागरी सुविधा
संपादनग्रामपंचायतीमार्फत सार्वजनिक स्वच्छता,पाणीपुरवठा, वीजपुरवठा,आरोग्यसेवा उपलब्ध केलेली आहे.पालघरहून मनोरकडे जाणाऱ्या सर्व एसटी बसेस मासवणला थांबतात. पालघरहून रिक्षाची सुविधासुद्धा उपलब्ध आहे.
संदर्भ
संपादनhttps://www.census2011.co.in/data/subdistrict/4163-palghar-thane-maharashtra.html
२. http://tourism.gov.in/india-tourism-development-corporation-itdc