बहाडोली हे भारताच्या महाराष्ट्र राज्यातील पालघर जिल्ह्यातील पालघर तालुक्यातील गाव आहे.हा भाग उत्तर कोकणात मोडतो.

  ?बहाडोली

महाराष्ट्र • भारत

गुणक: गुणक: Unknown argument format

प्रमाणवेळ भाप्रवे (यूटीसी+५:३०)
जिल्हा पालघर
कोड
पिन कोड
आरटीओ कोड

• 401404
• महा४८

भौगोलिक स्थान संपादन

हे गाव पालघर रेल्वे स्थानकापासून १९ किमी अंतरावर स्थित आहे. पालघर-मनोर राज्य महामार्गाने मासवण गावानंतर उजवीकडे जाणाऱ्या फाट्याने गेल्यास धुकटण गावानंतर ते वसलेले आहे.बहाडोली गावाच्या बाजूने सूर्यानदी बारमाही वाहत असते.

लोकजीवन संपादन

येथे मुख्यतः कुणबी,आदिवासी, वंजारी समाजातील लोक पूर्वीपासून स्थायिक आहेत. येथील लोकांचा मुख्य व्यवसाय भातशेती आहे. भातशेती बरोबर भाजीपाला, फळभाज्या, फुलभाज्या ह्यांचे रब्बी हंगामात पिक घेतले जाते.येथील काळी जांभूळ पालघर जिल्ह्यात प्रसिद्ध आहेत.

नागरी सुविधा संपादन

पालघर रेल्वे स्थानकातून बहाडोली एसटी बस सेवा उपलब्ध आहे. तसेच पालघरहून बहाडोलीला डमडम,जीप,रिक्षासुद्धा येतात.ग्रामपंचायतीमार्फत सार्वजनिक स्वच्छता, पाणीपुरवठा, आरोग्य, रस्तावीजपुरवठा केला जातो.महाविद्यालय,हॉस्पिटल,करमणूक केंद्र,रेल्वेप्रवास,कोर्ट इत्यादी सुविधासाठी पालघर ह्या तालुका/जिल्ह्याठिकाणी यावे लागते.

संदर्भ संपादन

https://www.census2011.co.in/data/subdistrict/4163-palghar-thane-maharashtra.html

२.

http://tourism.gov.in/india-tourism-development-corporation-itdc