सचिंद्र चौधरी
सचिंद्र चौधरी (२४ फेब्रुवारी १९०३[१] - ????) भारतीय वकील व राजकारणी होते. १९६५ पासून ते १३ मार्च १९६७ पर्यंत ते लालबहादूर शास्त्री आणि इंदिरा गांधी यांच्या नेतृत्वाखाली भारत सरकारचे अर्थमंत्री होते. ते अनेक कंपन्यांचे संचालक होते, सेंट्रल बोर्ड ऑफ स्टेट बँक ऑफ इंडियाचे सदस्य, लॉ कमिशनचे सदस्य आणि संयुक्त राष्ट्रसंघाच्या जनरल असेंब्लीमध्ये भारतीय प्रतिनिधी मंडळाचे सदस्य होते.[१]
राजकीय कारकीर्द
संपादनसचिंद्र चौधरी घाटळ मतदारसंघातून भारतीय संसदचे सदस्य होते. ते भारताचे अर्थमंत्री होते. स्वातंत्र्यानंतर पहिल्यांदाच भारतीय अर्थव्यवस्था दोन वर्षांच्या मंदीत गेली. वास्तविक जीडीपी वाढ १९६५ मध्ये २.६% आणि १९६६ मध्ये ०.०६% नी कमी झाली. परिणामी रुपया प्रथमच घटला गेला.
वैयक्तिक जीवन
संपादनसचिंद्र चौधरी यांचा जन्म २४ फेब्रुवारी १९०३ रोजी कोलकाता येथे झाला. त्यांचे वडील प्रमोद चंद्र चौधरी होते. त्यांनी कलकत्ता येथील रानी भांबानी विद्यालयात शिक्षण घेतले, नंतर ते कलकत्ता येथील प्रेसिडेन्सी कॉलेजमध्ये शिकले आणि त्यानंतर केंब्रिज येथील फित्झविल्यम कॉलेजमध्ये शिक्षण घेतले. ते लिंकन्स इन येथे देखील होते. ११ डिसेंबर १९३० रोजी त्यांनी सीता मित्तरशी विवाह केला. त्यांना एक मुलगा आणि दोन मुली होत्या.[१]
संदर्भ
संपादन- ^ a b c "Profile on Lok Sabha website". loksabha.nic.in. Lok Sabha/National Informatics Centre, New Delhi. 31 May 2013 रोजी पाहिले.