संयोगभूमी[][श १] म्हणजे दोन विशाल भूखंडांना जोडणारा व दोन बाजूंना समुद्र किंवा अन्य जलाशय असलेला जमिनीचा चिंचोळा पट्टा होय. आशिया खंडातील अरबी द्वीपकल्पआफ्रिका यांना जोडणारी सुएझ संयोगभूमी, उत्तरदक्षिण अमेरिका या खंडांना जोडणारी पनामा संयोगभूमी, मलय द्वीपकल्पाला उर्वरित आग्नेय आशियाशी जोडणारी क्रा संयोगभूमी या जगातील महत्त्वाच्या संयोगभूमी आहेत.

ऑस्ट्रेलियातील टास्मानिया प्रांतातील उत्तर व दक्षिण ब्रूनी बेटांना जोडणारी संयोगभूमी

पारिभाषिक शब्दसूची

संपादन
  1. ^ संयोगभूमी (इंग्लिश: Isthmus, इस्थमस)

संदर्भ

संपादन
  1. ^ कुलकर्णी, एल.के. भूगोलकोश.