संयुक्त राष्ट्रांचे निर्वासितांसाठीचे उच्चायुक्त

संयुक्त राष्ट्रे निर्वासित उच्चायुक्त (United Nations High Commissioner for Refugees, संक्षेप: UNHCR) ही संयुक्त राष्ट्रसंघाची एक समिती आहे. ही समिती जगभरातील निर्वासितांचे रक्षण करते. जगात चालणाऱ्या विविध युद्ध, लढाया, संघर्ष इत्यादींमध्ये स्थानिक जनतेला निर्वासित व्हावे लागते. अशा वेळी यजमान देशाच्या अथवा संयुक्त राष्ट्रांच्या विनंतीवरून ही समिती ह्या निर्वासितांसाठी तात्पुरत्या सोयी करते व त्यांना संरक्षण पुरवते. आजवर पॅलेस्टाइन, इराक, अफगाणिस्तान, सीरिया, सुदान, काँगो इत्यादी देशांमध्ये यू.एन.एच.सी.आर.ने कार्य केले आहे. संयुक्त राष्ट्रे निर्वासित उच्चायुक्त कार्यालयाला आजवर १९५४ व १९८१ ह्या दोन वेळा नोबेल शांतता पुरस्कार मिळाला आहे.


संयुक्त राष्ट्रे निर्वासित उच्चायुक्त
United Nations High Commissioner for Refugees
प्रकार समिती
मुख्य अँतोनियो गुतेरेस
स्थिती कार्यरत
स्थापना १४ डिसेंबर १९५०
मुख्यालय जिनिव्हा
संकेतस्थळ संकेतस्थळ
पालक संस्था संयुक्त राष्ट्रे
ह्या समितीच्या ५०व्या वाढदिवसाप्रित्यर्थ ताजिकिस्तानने काढलेले पोस्टाचे तिकिट

पोर्तुगालचा माजी पंतप्रधान अँतोनियो गुतेरेस २००५ सालापासून संयुक्त राष्ट्रे निर्वासित उच्चायुक्त पदावर आहे. प्रसिद्ध अमेरिकन अभिनेत्री अँजेलिना जोली संयुक्त राष्ट्रे निर्वासित उच्चायुक्त समितीची सदिच्छा राजदूत (Goodwill ambassador) आहे.

बाह्य दुवेसंपादन करा

हा लेख अपूर्ण आहे. तुम्ही अपूर्ण पानांविषयीचे हे पान वापरून हा लेख पूर्ण करण्यात विकिपीडियाला सहाय्य करू शकता.
  • "संयुक्त राष्ट्रांचे निर्वासितांसाठीचे उच्चायुक्त - अधिकृत संकेतस्थळ" (इंग्लिश भाषेत).CS1 maint: unrecognized language (link)