संदेश गुल्हाने (१९८२ - ) हे एक डॉक्टर आणि स्कॉटिश कन्झर्व्हेटिव्ह पक्षातील राजकारणी आहेत. मे २०२१ पासून ग्लासगो प्रांतातील स्कॉटिश संसदेचे (एमएसपी) सदस्य आहेत. स्कॉटिश संसदेवर निवडून गेलेले हे भारतीय वंशाचे पहिले पुरुष आहे.

स्कॉटिश संसद सदस्य संदेश गुल्हाने

स्कॉटिश संसद सदस्य
ग्लासगो (स्कॉटिश संसद निवडणूक क्षेत्र) साठी
(एकूण ७ प्रादेशिक एमएसपी पैकी एक)
विद्यमान
पदग्रहण
८ मे २०२१

जन्म c. १९८२ []
लंडन, इंग्लंड
राजकीय पक्ष स्कॉटिश कन्झर्व्हेटिव्ह
व्यवसाय सामान्य चिकित्सक

पार्श्वभूमी

संपादन

गुल्हाने यांचा जन्म लंडन, इंग्लंडमध्ये झाला होता. त्याला दोन मुले आहेत. व्यवसायाने ते एक डॉक्टर आहेत. २०११ च्या सुमारास स्कॉटलंडला गेल्यानंतरच्या काळात ग्लासगो येथे सामान्य प्रॅक्टिशनर म्हणून काम करत होते. यापूर्वी त्यांनी शहरातील व पूर्व किल्ब्राइड मधील रुग्णालयात ऑर्थोपेडिक रजिस्ट्रार म्हणून काम केले होते. [] त्याआधी ते न्यूकॅसल आणि बर्मिंघॅम येथे रहात होते. [] २०१७ पासून ते एसपीएफएल फुटबॉल क्लब क्वीन्स पार्क एफसीच्या वैद्यकीय कर्मचाऱ्यांचा म्हणून क्लब डॉक्टर होते []

राजकीय कारकीर्द

संपादन

२०२१ च्या स्कॉटिश संसदेच्या निवडणुकीत ग्लासगो पोलॉक मतदारसंघ [] आणि ग्लासगो प्रादेशिक यादीसाठी गुल्हाने हे पुराणमतवादी उमेदवार म्हणून उभे राहिले आणि ते ग्लासगो प्रांतासाठी निवडून आले. [] []

हे सुद्धा पहा

संपादन
  • ब्रिटिश भारतीयांची यादी
  • युनायटेड किंग्डममधील वांशिक अल्पसंख्याक राजकारण्यांची यादी

संदर्भ

संपादन

 

  1. ^ a b c Sandelands, Drew (22 April 2021). "Scottish Election 2021: Doctor standing for Tories in Glasgow Pollok". Glasgow Times. 8 May 2021 रोजी पाहिले.
  2. ^ "I wanted to be that person – Sandesh Gulhane". BMA Scotland. 25 June 2019.
  3. ^ "Medical Staff". Queens Park F.C. 2021-05-09 रोजी मूळ पान पासून संग्रहित. 2021-05-20 रोजी पाहिले.
  4. ^ "Scotland Election 2021 > Glasgow Pollok". BBC News. 8 May 2021 रोजी पाहिले.
  5. ^ "Scotland Election 2021 > Glasgow". BBC News. 8 May 2021 रोजी पाहिले.

बाह्य दुवे

संपादन