संजय वाघ
या लेखातील मजकूर मराठी विकिपीडियाच्या विश्वकोशीय लेखनशैलीस अनुसरून नाही. आपण हा लेख तपासून याच्या पुनर्लेखनास मदत करू शकता.
नवीन सदस्यांना मार्गदर्शन हा साचा अशुद्धलेखन, अविश्वकोशीय मजकूर अथवा मजकुरात अविश्वकोशीय लेखनशैली व विना-संदर्भ लेखन आढळल्यास वापरला जातो. |
संजय वाघ हे एक मराठी लेखक, कवी, बालसाहित्यिक आणि पत्रकार आहेत. त्यांच्या 'जोकर बनला किंगमेकर' या किशोर कादंबरीला २०२१ साली साहित्य अकादमीचा बालसाहित्य पुरस्कार प्राप्त झाला आहे.[१]
हा लेख/विभाग स्वत:च्या शब्दात विस्तार करण्यास मदत करा. |
कारकीर्द
संपादनसंजय वाघ हे गेल्या ३३ वर्षांपासून पत्रकारितेत कार्यरत आहेत. धुळे येथील दै. आपला महाराष्ट्र, सायं खान्देश तसेच लोकमतचे वार्ताहर व उपसंपादक म्हणून ६ वर्षे तर लोकमत वृत्तपत्रसमूहामध्ये नाशिक येथे उपसंपादक, वरिष्ठ उपसंपादक, मुख्य उपसंपादक व उप वृत्तसंपादक म्हणून त्यांनी २७ वर्षेंसेवा बजावली आहे. मार्च २०२४ पासून ते ‘सकाळ’ वृत्तपत्रसमूहाच्या उत्तर महाराष्ट्र आवृत्तीत वृत्तसंपादक म्हणून कार्यरत आहेत.[ संदर्भ हवा ]
साहित्यसंपदा[ संदर्भ हवा ]
संपादन- जोकर बनला किंगमेकर
- गाव मामाचं हरवलं
- बेडकाची फजिती
- गोष्ट बोलक्या पोपटाची
- २६/११ चे अमर हुतात्मे
- गंध माणसांचा
- डॉ. श्रीपाल सबनीस प्रणीत प्रतिभा संगम
- ऊन सावल्या
पुरस्कार [ संदर्भ हवा ]
संपादन- 'जोकर बनला किंगमेकर' या किशोर कादंबरीसाठी साहित्य अकादमी, नवी दिल्लीचा २०२१ सालचा बालसाहित्य पुरस्कार प्राप्त.
- सार्वजनिक वाचनालय, नाशिकचा लक्ष्मीबाई टिळक राज्यस्तरीय बालवाङमय पुरस्कार. (जोकर बनला किंगमेकर)
- शिवचरण फाऊंडेशन, मुक्ताईनगरचा, तापी पूर्णा उत्कृष्ट बालकादंबरी पुरस्कार (जोकर बनला किंगमेकर)
- कादवा प्रतिष्ठान पालखेड बंधाराचा स्व. माणिकराव जाधव उत्कृष्ट साहित्यनिर्मिती पुरस्कार (जोकर बनला किंगमेकर)
- सत्यशोधक मुकुंदराव पाटील स्मारक समिती नेवासाचा ‘दीनमित्र’कार मुकुंदराव पाटील उत्कृष्ट बालकादंबरी पुरस्कार (जोकर बनला किंगमेकर)
- सूर्योदय सर्वसमावेशक मंडळ जळगावचा सूर्योदय साहित्य पुरस्कार (जोकर बनला किंगमेकर)
- सार्वजनिक वाचनालयाच्या बालभवन, नाशिकचा उत्कृष्ट बालसाहित्यिक पुरस्कार (जोकर बनला किंगमेकर)
- पार्वतीबाई आव्हाड राज्यस्तरीय उत्कृष्ट काव्यसंग्रह पुरस्कार (गाव मामाचं हरवलं)
- अ. भा. मराठी बालकुमार साहित्य संस्था उदगीरचा कै. लक्ष्मीबाई विठ्ठल केदार स्मृती बालवाङमय पुरस्कार (गाव मामाचं हरवलं)
- अंकुर साहित्य संघ, अकोलाचा हेमंत करकरे स्मृती पुरस्कार (२६/११ चे अमर हुतात्मे)
उल्लेखनीय
संपादन- जळगावच्या बहिणाबाई चौधरी उत्तण महाराष्ट्र विद्यापीठाच्या एम. ए. द्वितीय वर्षाच्या अभ्यासक्रमात ‘डॉ. श्रीपाल सबनीस प्रणीत प्रतिभा संगम’ या पुस्तकाचा संदर्भ ग्रंथ म्हणून समावेश.[ संदर्भ हवा ]
- नांदेडच्या स्वामी रामानंद तीर्थ विद्यापीठाच्या प्रथम वर्ष कला या वर्गाच्या अभ्यासक्रमात ‘गाव मामाचं हरवलं’ या बालकिशोर काव्यसंग्रहातील ‘झाडबाबा’ या कवितेचा समावेश.[ संदर्भ हवा ]
कोल्हापूर येथील छत्रपती शिवाजी विद्यापीठाच्या एम. ए. प्रथम वर्षाच्या अभ्यासक्रमात 'जोकर बनला किंगमेकर' या किशोर कादंबरीचा समावेश.[ संदर्भ हवा ]