श्री शिवछत्रपती क्रीडानगरी
(श्री शिव छत्रपती क्रीडा संकुल या पानावरून पुनर्निर्देशित)
श्री शिवछत्रपती क्रीडानगरी किंवा म्हाळुंगे- क्रीडा संकुल हे पुणे शहराच्या [मुळशी-हवेली तालुक्यांतील ]] ह्या उपनगरामधील एक मोठे क्रीडा संकुल आहे. १९९४ सालच्या राष्ट्रीय क्रीडा स्पर्धांसाठी बांधल्या गेलेल्या ह्या बहूपयोगी संकुलामध्ये २००८ सालच्या कॉमनवेल्थ युवा स्पर्धा खेळवण्यात आल्या होत्या. म्हाळुंगे संकुलात २०,००० आसनक्षमतेचे प्रमुख ॲथलेटिक्स स्टेडियम, जलतरण केंद्र, बॅडमिंटन हॉल, टेनिस कोर्ट, बास्केटबॉल व व्हॉलीबॉल कोर्ट, मुष्टियुद्ध व कुस्ती रिंगण इत्यादी अनेक खेळांच्या सुविधा आहेत.
८ ऑक्टोबर २०१० रोजी येथे भारत व व्हियेतनाम राष्ट्रीय संघांदरम्यान फुटबॉल सामना खेळवला गेला. पुण्यामधील अनेक व्यावसायिक क्लब हे संकुल वापरतात.