दत्तजयंती
दत्तजयंती ही हिंदू पंचांगात असलेल्या मार्गशीर्ष पौर्णिमा या तिथीला साजरी केली जाते.[१][२]
हा दिवस म्हणजे भगवान दत्तात्रेय यांचा जन्मदिवस म्हणून साजरा केला जातो. देशभरातील आणि विशेषतः महाराष्ट्रात हिंदू दिनदर्शिकेनुसार (डिसेंबर/जानेवारी) मार्गशीर्ष (अग्रहायण) महिन्याच्या पौर्णिमेच्या दिवशी हा उत्सव साजरा केला जातो.
दत्त संंप्रदाय
संपादनदत्तात्रेयांनी दीनदलितांची सेवा करण्याचे व समाजातील दुःख व अज्ञान दूर करण्याचे कार्य चालू ठेवले. त्यांच्या पश्चात श्रीपाद श्रीवल्लभ, श्रीनृसिंह सरस्वती व वासुदेवानंद सरस्वती हे त्यांचे अवतार मानण्यात येतात.[३] दत्ताची स्थाने प्रयाग येथे, आणि महाराष्ट्रात औदुंबर, गाणगापूर, माहूर, नृसिंहवाडी, कुरवपूर, कर्दळीवन या ठिकाणी आहेत.[४][५][६] श्रीदत्तांच्या कार्यावर लिहिलेला गुरुचरित्र हा प्रसिद्ध ग्रंथ भक्तिभावाने वाचला जातो.[७]
देवता स्वरूप
संपादनदत्तात्रेय किंवा दत्त हे अत्री ऋषी व माता अनसूया यांचे पुत्र होत. तीन तोंडे, सहा हात, दोन पाय, चतुर्वेददर्शक चार श्वान व जवळ कामधेनू (गोमाता) असलेले दत्तात्रेय हे ब्रह्मा, विष्णू, महेश यांचे एकस्वरूप आहे[८]. दत्तात्रेय हे हिंदू धर्मातील पहिले गुरू समजले जातात. हिंदू धर्माचा प्रसार करण्याच्या उद्देशाने दत्तात्रेयांनी भारतभम्रण केले. ठिकठिकाणी त्यांची स्थाने (गादी) निर्माण करून आपली परंपरा चालू ठेवली.[९] महाभारताच्या अनुशासन पर्वात देखील दत्त जन्माचा उल्लेख सापडतो.[१०]
गुरुचरित्र वाचन सप्ताह
संपादनभगवान दत्तात्रेय यांच्याशी संबंधित दत्त संप्रदायाचा महत्त्वाचा ग्रंथ म्हणजे श्री गुरुचरित्र हा होय. दत्त जयंतीपूर्वी सात दिवस दत्त भक्त पुरुष या गुरुचरित्र ग्रंथाचे काटेकोर नियम पाळून वाचन करतात.[११][११] दत्त जयंतीला या वाचनाचे पारणे करतात.[१२]
उत्सवाचे स्वरूप
संपादनदत्त जयंतीच्या दिवशी, दत्ताच्या देवळात भजन, कीर्तन होते. संध्याकाळच्या वेळी दत्ताचा जन्म झाला असे मानतात, त्यामुळे त्या वेळी जन्माचे कीर्तन असते[१३]. देवळावर रोषणाई केली जाते.[१४] पालखीतून भगवान दत्तात्रेय यांची मिरवणूक निघते. भारताच्या विविध प्रांतात या उत्सवाचे आयोजन एक आठवडाही केले जाते.[१५] या उत्सवात संगीत तथा नृत्य क्षेत्रातील विविध कलाकार येऊन आपली कला सादर करतात.[१६] अशा कार्यक्रमांचेही विशेष आयोजन केले जाते.[१७] केवळ शहरातच नव्हे तर लहान लहान गावातही हा उत्सव उत्साहाने संपन्न केला जातो. आलेल्या भक्तांसाठी अन्नदान आणि प्रसादाची व्यवस्था केली जाते.[१८]
हे सुद्धा पहा
संपादनचित्रदालन
संपादन-
दत्त जयंती उत्सव पूजा तयारी
संदर्भ
संपादन- ^ Dube, Narasiṃha Prasāda (1996). Sakalamata sampradāya: siddhanta aura sāhitya (हिंदी भाषेत). Vikāsā Prakāśana.
- ^ Pandey, Rajbali (1978). Hindū dharmakośa (हिंदी भाषेत). Uttara Pradeśa Hindī Saṃsthāna, Hindī Samiti Prabhāga.
- ^ सय्यद, झियाऊद्दीन (१८.१२.२०१५). "श्रीदत्त संप्रदायातील परंपरा". ९.१२.२०१९ रोजी पाहिले.
|access-date=, |date=
मधील दिनांक मूल्ये तपासा (सहाय्य) - ^ Patukale, Pro Kshitij (2012-10-27). Kardaliwan : Ek Anubhuti. Kardaliwan Seva Sangh. ISBN 978-93-5087-609-1.
- ^ Marāṭhī viśvakośa. Mahārāshṭra Rājya Sāhitya Sāskr̥ti Maṇḍaḷa. 1973.
- ^ सय्यद, झियाऊद्दीन (१८.१२. २०१५). "अपरिचित दत्तस्थाने". ९.१२. २०१९ रोजी पाहिले.
|access-date=, |date=
मधील दिनांक मूल्ये तपासा (सहाय्य) - ^ Samarth, Shree Swami; Kendra, Vishwa Kalyan (2008-08-01). Guru Charitra (इंग्रजी भाषेत). Sterling Publishers Pvt. Ltd. ISBN 978-81-207-3348-0.
- ^ Kalelkar, Dattatraya Balakrishna (1972). Jivanta vratotsava. Rāshṭrīya Granthamālā.
- ^ Patukale, Kshitij (2013-01-01). Kardliban Eak Anubhuti (हिंदी भाषेत). Prabhat Prakashan. ISBN 978-93-82901-45-7.
- ^ Bivalakara, Raghunātha Vāsudeva (1990). Mahārāshṭra ke pramukha sādhanā sampradāya (हिंदी भाषेत). Kaustubha Prakāśana.
- ^ a b सय्यद, झियाउदीन (१६. १२. २०१५). "उपासना गुरुचरित्राची".
|date=
मधील दिनांक मूल्ये तपासा (सहाय्य) - ^ दैनिक भास्कर (१९. १२. २०१८). "22 को मनाएंगे श्री दत्त जन्मोत्सव".
|date=
मधील दिनांक मूल्ये तपासा (सहाय्य) - ^ Pāṭhaka, Yaśavanta (1980). Nacu kirtanace rangi : Marathi kirtanasastheca cikitsaka abhyasa. Kontinentala Prakasana.
- ^ Dube, Narasiṃha Prasāda (1996). Sakalamata sampradāya: siddhanta aura sāhitya (हिंदी भाषेत). Vikāsā Prakāśana.
- ^ दैनिक भास्कर (१५.१२. २०१८). "दत्त जयंती महोत्सव कल से".
|date=
मधील दिनांक मूल्ये तपासा (सहाय्य) - ^ दैनिक भास्कर (१०. १२. २०१८). "स्वराभिषेक में आएंगे मशहूर कलाकार, होगा गायन-वादन".
|date=
मधील दिनांक मूल्ये तपासा (सहाय्य) - ^ म. टा. प्रतिनिधी, पुणे (१८. १२. २०१८). "भक्तिगीतांची सुश्राव्य मैफल".
|date=
मधील दिनांक मूल्ये तपासा (सहाय्य)[permanent dead link] - ^ "दत्तजयंती उत्सव सुरू". १५.१२.२०१८. 2019-12-09 रोजी मूळ पान पासून संग्रहित. ९.१२.२०१९ रोजी पाहिले.
|access-date=, |date=
मधील दिनांक मूल्ये तपासा (सहाय्य)