श्रीवर्धन विधानसभा मतदारसंघ
हा भारताच्या महाराष्ट्र राज्यातील एक विधानसभा मतदारसंघ आहे.
श्रीवर्धन विधानसभा मतदारसंघ - १९३ हा महाराष्ट्र राज्य विधानसभेच्या २८८ मतदारसंघांपैकी एक आहे. लोकसभा आणि विधानसभा मतदारसंघ परिसीमन आदेश, २००८ नुसार केलेल्या मतदारसंघांच्या रचनेनुसार, श्रीवर्धन मतदारसंघात रायगड जिल्ह्यातील १. श्रीवर्धन, २. म्हसळा ३. तळा ही तालुके आणि ४. रोहा तालुक्यातील रोहा महसूल मंडळ आणि रोहा अष्टमी नगरपालिका, ५. माणगांव तालुक्यातील माणगांव महसूल मंडळ यांचा समावेश होतो. श्रीवर्धन हा विधानसभा मतदारसंघ रायगड लोकसभा मतदारसंघात मोडतो.[१][२]
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या आदिती सुनिल तटकरे ह्या श्रीवर्धन विधानसभा मतदारसंघाच्या विद्यमान आमदार आहेत.[३]
आमदार
संपादनवर्ष | आमदार[४] | पक्ष | |
---|---|---|---|
२०१९ | आदिती सुनिल तटकरे | राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष | |
२०१४ | अवधूत अनिल तटकरे | राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष | |
२००९ | सुनील दत्तात्रेय तटकरे | राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष |
निवडणूक निकाल
संपादनमहाराष्ट्र विधानसभा निवडणुक २००९ | ||
---|---|---|
श्रीवर्धन | ||
उमेदवार | पक्ष | मत |
सुनिल दत्तात्रय ताटकरे | राष्ट्रवादी | ६६,१४१ |
तुकाराम सुर्वे | शिवसेना | ५५,२७० |
गुलाम पेशैमाम | अपक्ष | ७,२१० |
फैसल पोपेरे | अपक्ष | ३,८८२ |
फरीद फारुक उभारे | बसपा | २,२७३ |
श्रीपाल बालाजी कवडे | रिपाई (A) | १,४९७ |
अभिजीत दिपक साबळे | अपक्ष | १,४३३ |
डॉ. नरेन्द्र रामलक्ष्मण सिंग | भाबम | ९३७ |
संदर्भ
संपादन- ^ "भारत परिसीमन आयोग यांची अधिसूचना" (PDF). 2009-02-19 रोजी मूळ पानापासून संग्रहित (PDF). १२ October २००९ रोजी पाहिले.
- ^ "Delimitation of Parliamentary & Assembly Constituencies Order - 2008".
- ^ "१४ वी महाराष्ट्र विधानसभा २०१९ सदस्यांचा संक्षिप्त जीवन परिचय" (PDF).
- ^ "STATISTICAL REPORTS OF GENERAL ELECTION TO STATE LEGISLATIVE ASSEMBLY (VIDHANSABHA)".
बाह्य दुवे
संपादनहा लेख/विभाग स्वत:च्या शब्दात विस्तार करण्यास मदत करा. |