श्रीलंकन यादवी युद्ध

श्रीलंकन यादवी युद्ध
दिनांक २३ जुलै १९८३ ते १८ मे २००९
स्थान श्रीलंका
परिणती श्रीलंकेच्या सरकारचा विजय
युद्धमान पक्ष
श्रीलंका ध्वज श्रीलंका
भारत भारतीय शांती सेना (१९८७-९०)
लिबरेशन टायगर्स ऑफ तमि़ळ ईलम
सेनापती
श्रीलंका ध्वज श्रीलंका

भारत ध्वज भारत

वेलुपिल्लई प्रभाकरन



श्रीलंकन यादवी युद्ध हे श्रीलंकेच्या द्वीपावर लढले गेलेले युद्ध होते. २३ जुलै १९८३ रोजी या संघर्षाची सुरुवात झाली. लिबरेशन टायगर्स ऑफ तमि़ळ ईलम (एल.टी.टी.ई.) ही फुटीरवादी संघटना व श्रीलंकेचे सरकार यांच्यामध्ये हे युद्ध झाले. एल.टी.टी.ई.ला श्रीलंकेच्या उत्तर व पूर्व भागात तमिळ लोकांसाठी तमिळ ईलम नावाचे स्वतंत्र राष्ट्र हवे होते. शेवटी २६ वर्षांनंतर श्रीलंकन सरकारला १८ मे २००९ रोजी यश मिळाले.

८०,००० ते १,००,००० लोक या युद्धात मृत्युमुखी पडले. लिबरेशन टायगर्स ऑफ तमि़ळ ईलमला अमेरिका, भारत, ऑस्ट्रेलिया, कॅनडायुरोपियन संघासह ३२ देशांनी दहशतवादी संघटना म्हणून मान्यता दिली.