महिंद राजपक्ष (सिंहला: මහින්ද රාජපක්ෂ ; तमिळ: மகிந்த ராசபக்ச ; रोमन लिपी: Mahinda Rajapaksa ;) (नोव्हेंबर १८, इ.स. १९४५ - हयात) हा श्रीलंकेचा ६वा राष्ट्राध्यक्ष आहे. १९ नोव्हेंबर, इ.स. २००५ रोजी अध्यक्षपदाची शपथ घेतलेला राजपक्ष इ.स. २०१० सालांतील निवडणुकींमध्ये दुसऱ्यांदा अध्यक्षपदासाठी निवडला गेला. पेशाने वकील असलेल्या राजपक्षाने याआधी ६ एप्रिल, इ.स. २००४ ते १९ नोव्हेंबर, इ.स. २००५ या काळात श्रीलंकेचे पंतप्रधानपदही सांभाळले. त्याच्या अध्यक्षीय कारकिर्दीत श्रीलंकेच्या सैन्याने उत्तर श्रीलंकेतील तमिळ फुटीरतावादी गटांचा, विशेषकरून लिबरेशन टायगर्स ऑफ तमि़ळ ईलम या सशस्त्र बंडखोर संघटनेचा बिमोड करण्यात निर्णायक यश मिळवले.

महिंदा राजपक्षा

श्रीलंकेचे राष्ट्राध्यक्ष
कार्यकाळ
१९ नोव्हेंबर २००५ – ९ जानेवरी २०१५
पंतप्रधान रत्नश्री विक्रमनायके
डी.एम. जतरत्ने
मागील चंद्रिका कुमारतुंगा
पुढील मैत्रीपाला सिरिसेना

श्रीलंकेचे पंतप्रधान
कार्यकाळ
६ एप्रिल २००४ – १९ नोव्हेंबर २००५
राष्ट्राध्यक्ष चंद्रिका कुमारतुंगा
मागील रानिल विक्रमसिंघे
पुढील रत्नश्री विक्रमनायके

जन्म १८ नोव्हेंबर, १९४५ (1945-11-18) (वय: ७८)
दक्षिण प्रांत
राजकीय पक्ष श्रीलंका फ्रीडम पार्टी
धर्म थेरवाद

दोनवेळा राष्ट्राध्यक्ष्पदावर राहिलेला राजपक्ष ९ जानेवारी २०१५ रोजी सत्तेचा कार्यकाळ संपुष्टात आल्यामुळे पायउतार झाला.

बाह्य दुवे संपादन