श्रीरामपूर विधानसभा मतदारसंघ

हा भारताच्या महाराष्ट्र राज्यातील एक विधानसभा मतदारसंघ आहे.

श्रीरामपूर विधानसभा मतदारसंघ - २२० हा महाराष्ट्र राज्य विधानसभेच्या २८८ मतदारसंघांपैकी एक आहे. लोकसभा आणि विधानसभा मतदारसंघ परिसीमन आदेश, २००८ नुसार, केलेल्या मतदारसंघाच्या रचणेनुसार, श्रीरामपूर मतदारसंघात अहमदनगर जिल्ह्यातील १. श्रीरामपूर तालुका आणि २. राहुरी तालुक्यातील देवळाली महसूल मंडळ आणि देवळाली प्रवरा नगरपालिका क्षेत्राचा समावेश होतो. श्रीरामपूर हा विधानसभा मतदारसंघ शिर्डी लोकसभा मतदारसंघात मोडतो आणि हा मतदारसंघ अनुसूचित जाती - SC च्या उमेदवारांसाठी राखीव आहे.[१][२]

भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्षाचे लहु नाथा कानडे हे श्रीरामपूर विधानसभा मतदारसंघाचे विद्यमान आमदार आहेत.[३]

श्रीरामपूर विधानसभा मतदारसंघ.jpg

आमदारसंपादन करा

वर्ष आमदार[४] पक्ष
२०१९ लहु नाथा कानडे भारतीय राष्ट्रीय काँग्रेस
२०१४ भाऊसाहेब मल्हारी कांबळे भारतीय राष्ट्रीय काँग्रेस
२००९ भाऊसाहेब मल्हारी कांबळे भारतीय राष्ट्रीय काँग्रेस

निवडणूक निकालसंपादन करा


संदर्भसंपादन करा

  1. ^ "भारत परिसीमन आयोग यांची अधिसूचना" (PDF). Archived (PDF) from the original on 2009-02-19. १२ October २००९ रोजी पाहिले.
  2. ^ "Delimitation of Parliamentary & Assembly Constituencies Order - 2008".
  3. ^ "१४ वी महाराष्ट्र विधानसभा २०१९ सदस्यांचा संक्षिप्त जीवन परिचय" (PDF).
  4. ^ "STATISTICAL REPORTS OF GENERAL ELECTION TO STATE LEGISLATIVE ASSEMBLY (VIDHANSABHA)".

बाह्य दुवेसंपादन करा