गोव्यामधील पार्से येथे जन्मलेले श्रीधर पार्सेकर नामवंत भारतीय व्हायोलीनवादक होते. सप्टेंबर १०, १९६४ रोजी त्यांचे निधन झाले.

श्रीधर पार्सेकर यांनी १९४८ मध्ये, व्हायोलीन हे वाद्य शिकू इच्छिणाऱ्यांसाठी 'स्वरनिनाद' ही पुस्तिका लिहिली होती. पार्सेकरांच्या जीवनावर सुजाता दीक्षित यांनी 'पार्सेकर नावाचे व्हायोलीन' हे पुस्तक लिहिले आहे. 'व्हायोलीन ॲकेडेमी'ने ते प्रकाशित केले आहे.(इ.स. २००६)

'पार्सेकर आणि व्हायोलीन' यात अभेदच होता, असे 'पुलं'म्हणत असत. इतकेच नव्हे तर 'बालगंधर्वांचे आमच्या मनात जे स्थान आहे, तेच वादनात पार्सेकर यांचे आहे' असेही ते म्हणत. पार्सेकर हे गोव्यातील पार्से या भूमीने भारतीय संगीत विश्वाला दिलेली एक अमोल देणगीच आहे', असे पंडित अतुलकुमार यांनी लिहिले आहे.

श्रीधर पार्सेकर हे संगीत दिग्दर्शकही होते. श्रीधर पार्सेकर यांचे चुलतभाऊ बाबा पार्सेकर हे नाटकांचे नेपथ्यकार आहेत. दरवर्षी ते गोव्यामध्ये श्रीधर पार्सेकरांचा स्मृतिदिन संगीताच्या कार्यक्रमांनी साजरा करतात.

श्रीधर पार्सेकर यांचे संगीत असलेली काही गीते

संपादन