शेडनेट हाऊस म्हणजे शेतातील तापमान, आर्द्रताकार्बन डायॉक्साइडच्या प्रमाणावर काही प्रमाणात नियंत्रण ठेवण्यासाठी उभारलेला मांडव होय. याचा वापर हंगामी व बिगर हंगामी पिके घेण्यासाठी, उच्च मूल्यांची भाजीपाला पिके व फुलांच्या उत्पादनासाठी करण्यात येतो.[१]नव्या तंत्रज्ञानामुळे सर्वच क्षेत्रांमध्ये क्रांती झाली. शेती व्यवसायातही ती होणे क्रमप्राप्त आहे. नव्या आधुनिक पद्धतीने शेती केल्यास ती मोठय़ा फायद्याची नक्कीच होऊ शकते. ते नवे तंत्र म्हणजे पॉलीहाऊस, शेडनेटहाऊस सौरऊर्जा वगैरेसाठी लाखो रुपयांची गुंतवणूक करावी लागते. प्रथम ते तंत्र शिकावे लागते. सध्या तरी ते शिकण्याची योग्य सोय नाही. नंतर कर्ज उभारणी करावी लागते. कर्ज माफीच्या सरकारी विचित्र धोरणांमुळे सध्या कुठेही शेतकऱ्यांना कर्ज मिळणे अत्यंत कठीण झाले आहे. हे सर्व जमले नाही तर सर्वस्व पणाला लागण्याची शक्यता असते. असे असले तरी नव्या तंत्रामधील काही उपतंत्रे सर्वानाच वापरणे शक्य असून त्यामुळे आपल्या पारंपरिक शेती व्यवसायात अमुलाग्र बदल होऊ शकतो. शेतकऱ्यांचे मुख्य शत्रू म्हणजे तण व रोगराई. त्यांचे उच्चाटण केल्यास उत्पादन खर्चात प्रचंड बचत होऊ शकते. म्हणजेच फायद्यात तेवढीच वाढ होते. म्हणूनच नव्या तंत्रांमधील आपल्या सोयीची व सोपी तंत्रे आत्मसात करून वापरणे नक्कीच फायदेशीर ठरू शकते.अलीकडे खूप शेतकरी मल्चिंग पेपरचा उपयोग करतात. त्याचे अनेक फायदे आहेत. मल्चिंग पेपरमुळे पिकामध्ये अजिबात तण वाढत नाहीत. त्यामुळे खुरपणीचा प्रचंड खर्च पूर्णतः वाचतो. मजुरांची टंचाई व मजुरीचे वाढलेले दर यामुळे खुरपणीचा खर्च अवास्तव वाढला असून तणांच्या प्रमाणातही वाढ झाली आहे. एक एकरातील मिरची, टोमॅटो इत्यादी पिकांच्या चार खुरपण्या कराव्याच लागतात. प्रत्येक खुरपणी सरासरी दोनच हजार रुपयांत झाली तर एकरी ८ हजार रुपये खर्च कमीत कमी येतोच. मल्चिंग पेपरसाठी एकरी ३ बंडल लागतात. त्यासाठी बाजारात ४ फूट रुंदीचा मल्चिंग पेपर उपलब्ध आहे. त्याचे दोन फूट रुंदीचे दोन भाग करून वापरल्यास मल्चिंग पेपर निम्माच लागतो. १२०० फुटाचा प्रत्येक बंडल २ हजार रुपयांना बाजारात मिळतो. म्हणजेच एकरी सहा हजार रुपये खर्च येतो. म्हणजेच खुरपणीपेक्षा येथेच २ हजार रुपये वाचतात.

पॉलीहाऊस

शेडनेट हाऊस उभारणी संपादन

शेडनेट हाऊसचा उपयोग प्रामुख्याने हंगामी व बिगर हंगामी पिके घेण्यासाठी, उच्च मूल्यांची भाजीपाला पिके व फुलांच्या उत्पादनासाठी करण्यात येतो. शेडनेट हाऊसमध्ये आपणास तापमान, आर्द्रता व कार्बन-डाय- ऑक्‍साईडच्या प्रमाणावर काही प्रमाणात नियंत्रण ठेवता येते.

हवामानातील फरक संपादन

समशीतोष्ण प्रदेश संपादन

पॉलिहाऊसचा वापर प्रामुख्याने समशीतोष्ण भागात केला जातो आणि ग्रीन हाऊस आणि क्लॉच सारख्याच पद्धतीने वापरले जातात. आधुनिक रचनांनुसार, लागवड आणि कापणी यंत्र या रचनांच्या आतून उत्पादन स्वयंचलित करण्यासाठी तयार होतात. युनायटेड किंग्डममध्ये स्ट्रॉबेरीच्या उत्पादनावर पॉलिहाऊसचा लक्षणीय परिणाम झाला आहे. रासबेरी आणि ब्लॅकबेरी सारख्या इतर मऊ फळांचीही याच प्रकारे लागवड केली जाते.

इतर प्रदेश संपादन

उष्णकटिबंधातील हवामानात तापमान सामान्य पातळीपेक्षा जास्त असण्याची शक्यता असते. अशा वेळी तापमान कमी करण्यासाठी फॉगर्स/मिस्टरचा वापर केला जातो. यामुळे पॉली हाऊसमधील आर्द्रतेची पातळी वाढत नाही. कारण बाष्पीभवन झालेले थेंब जवळजवळ हवेतल्या हवेत वाफेवर उडतात. उच्च तंत्रज्ञानाच्या पॉली हाऊसेसमध्ये अवकाश-उष्णता प्रणाली तसेच माती-उष्णता प्रणाली देखील आहे. नको असलेले विषाणू, जीवाणू आणि इतर सजीवांची माती शुद्ध करण्यासाठी मदत होते.कर्नालजवळील घारुंडा येथे अलीकडेच झालेल्या इंडो-इस्रायल सहकार्यातून एका विकसनशील देशात होत असलेल्या पॉलीहाऊस शेतीचे उत्तम उदाहरण आहे.

विकसनशील देशांनी केवळ फळ-भाजीपाला शेतक-यांसाठी, विशेषतः भारतासारख्या मोठ्या देशांमध्ये, ग्रामीण भागातून शहरी भागात स्थलांतर करण्याचे प्रमाण (तसेच बागायती आणि फळ/भाजीपाला शेतक-यांचे नुकसान) कमी केले जाऊ शकते यामुळे शेती क्षेत्रात सुधारणा होण्याची मोठी क्षमता आहे, जी दीर्घकालीन आर्थिक स्थैर्याची गुरुकिल्ली आहे. प्रत्येक गावात प्रत्येक शेतकऱ्याने वापरलेले लहान पॉलिहाऊस भाजीपाला ऑन-सीझन आणि ऑफ सीझन या दोन्हीच्या लागवडीला प्रोत्साहन देतात आणि खरे तर फळे आणि भाज्यांचे दर वर्षभरात स्थिर ठेवण्यासाठी मदत करतील आणि स्थानिक बाजारपेठेच्या गरजा पूर्ण करण्यास मदत करतील.

संदर्भ संपादन