शिवाजी महाराजांचा जीवनक्रम
विकिपीडियातील इतिहासविषयक लेखात पाळावयाचे लेखनसंकेत
या लेखातील मजकूर मराठी विकिपीडियाच्या विश्वकोशीय लेखनशैलीस अनुसरून नाही. आपण हा लेख तपासून याच्या पुनर्लेखनास मदत करू शकता.
नवीन सदस्यांना मार्गदर्शन हा साचा अशुद्धलेखन, अविश्वकोशीय मजकूर अथवा मजकुरात अविश्वकोशीय लेखनशैली व विना-संदर्भ लेखन आढळल्यास वापरला जातो. |
हा लेख/विभाग स्वत:च्या शब्दात विस्तार करण्यास मदत करा. |
छत्रपती शिवाजी महाराज यांचा जीवनक्रम थोडक्यात खाली दिलेला आहे-
- शोध - सव॔प्रथम भारतीय नौदलाचा शोध.
- १९ फेब्रुवारी १६३० - शिवाजी महाराज यांचा जन्म.
- १९ मार्च १६३७ - जिजाऊंनी शिवाजींना पुणे येथे आणले.
- १६ मे १६४० - शिवाजी व सईबाई निंबाळकर यांचा विवाह.
- २७ एप्रिल १६४५ - किल्ले रायरेश्वर येथे स्वराज्य स्थापनेची शपथ.
- २८ जानेवारी १६४५ - स्त्रियांची अब्रू लुटणाऱ्या गुजर पाटलाला कडक शासन.
- ७ मार्च १६४७ - कानंद खोऱ्यातील तोरणा किल्ला जिंकुन स्वराज्याचे तोरण उभारले.
- इ.स. १६४७ - कोंढाण्यावर विजय.मुरुंबदेवाचा डोंगर जिंकुन त्याचे नाव राजगड ठेवले.
- इ.स. १६४८ - पुरंदर किल्ला जिंकला.
- इ.स. १६४९ - जिंजी येथून शहाजी रावांची व कान्होजी जेधेंची सुटका
- इ.स. १६५६ - त्यांचे जेष्ठ बंधू संभाजीराजे यांचे कनकगिरी येथे तोफेचा गोळा लागुन निधन.
- ३० एप्रिल १६५७ - जुन्नर या ठाण्यावर छापा.पुष्कळ मालमत्ता हस्तगत.
- १४ मे १६५७ - महाराणी सईबाईच्या पोटी शंभूराजांचा जन्म.
- २४ ऑक्टोबर १६५७ - दुर्गाडी किल्ल्याची पायाभरणी. अपार द्रव्यसाठा सापडला.पुरंदरचे किल्लेदार नेताजी पालकर यांना सरसेनापती पदावर बढती.
- ५ मार्च १६५९ - ३०० होनात पोर्तुगालची तलवार विकत घेतली.
- ५ सप्टेंबर १६५९ - पत्नी सईबाईंचे निधन
- १० नोव्हेंबर १६५९ - अफजलखान वध.
- २ मार्च १६६० - सिद्धीचा पन्हाळगडास वेढा
- ५ एपिल १६६३ - पुण्याच्या लालमहालावर छापा.
- २३ जानेवारी १६६४ - शहाजी महाराजांचे कर्नाटकात होदीगरे येथे निधन.
- १४ एप्रिल १६६५ - पुरंदरची लढाई
- १३ जून १६६५ - पुरंदरचा तह
- ४ फेब्रुवारी १६७० - गड आला पण सिंह गेला
- ६ मार्च १६७३ - कोंडाजी फर्जंदांनी पन्हाळा फत्ते केला.
- २४ फेब्रुवारी १६७० -सोयराबाईच्या पोटी राजाराम यांचा जन्म
- ६ जून १६७४ - शिवरायांचा राज्याभिषेक
- १७ जून १६७४ - जिजाऊंचे निधन वयाचे ७७व्या वर्षी
- २४ सप्टेंबर १६७४ - शाक्य पद्धतीने छत्रपती शिवाजी महाराजांचा दूसरा राज्याभिषेक
- ३ एप्रिल १६८० - शिवरायांचे निधन