शिरवळ
शिरवळ | |
---|---|
गाव | |
देश | भारत |
राज्य_नाव | महाराष्ट्र |
जिल्हा_नाव | सातारा |
तालुका_नाव | खंडाळा |
क्षेत्रफळ | |
• एकूण | ५.४७ km२ (२.११ sq mi) |
Elevation | ५९३.७१ m (१,९४७.८७ ft) |
लोकसंख्या (२०११) | |
• एकूण | १६,०८० |
• लोकसंख्येची घनता | २,९३९/km२ (७,६१०/sq mi) |
वेळ क्षेत्र | UTC=+5:30 (भाप्रवे) |
पिन |
412801 |
नजीकचे गाव | भोर |
लिंग गुणोत्तर | 940 ♂/♀ |
साक्षरता | ७८.४३% |
२०११ जनगणना संकेत | ५६३१७३ |
भौगोलिक स्थान आणि लोकसंख्या
संपादनशिरवळ हे सातारा जिल्ह्यातल्या खंडाळा तालुक्यातील ५४७ हेक्टर क्षेत्राचे गाव असून २०११ च्या जनगणनेनुसार ह्या गावात ३७७३ कुटुंबे व एकूण लोकसंख्या १६०८० लोकसंख्या आहे. पैकी पुरुष ८२८५ पुरुष आणि स्त्रिया ७७९५ आहेत. यामध्ये अनुसूचित जातीचे लोक १४१९ असून अनुसूचित जमातीचे २२० लोक आहेत. ह्या गावाचा जनगणना स्थल निर्देशांक ५६३१७३ आहे. शिरवळच्या सर्वात जवळचे शहर भोर हे १७ किलोमीटर अंतरावर आहे.
शिरवळ हे सातारा जिल्ह्यातील गाव आहे. पुणे-सातारा-बंगलोर या महामार्गावर साताऱ्याच्या अलीकडे डाव्या हाताला हे गाव लागते. गाव छोटे असून गावात ग्रामपंचायत कार्यालय व तलाठी कार्यालय आहे.
साक्षरता
संपादन
- एकूण साक्षर लोकसंख्या: १२६१२ (७८.४३%)
- साक्षर पुरुष लोकसंख्या: ६७२६ (८१.१८%)
- साक्षर स्त्री लोकसंख्या: ५८८६ (७५.५१%)
हवामान
संपादनयेथील हवामान थंड व आल्हाददायक आहे. जून ते सप्टेंबर या कालावधीत नैर्ऋत्य मोसमी वाऱ्यांपासून वर्षातील सर्वाधिक पाऊस पडतो. येथे ऑक्टोबर ते मार्च हा हिवाळा हंगाम असतो. जून ते सप्टेंबर हा पावसाळा हंगाम असतो. एप्रिल ते जून हा उन्हाळा मोसम असतो.
जमिनीचा वापर
संपादनशिरवळ ह्या गावात जमिनीचा वापर खालीलप्रमाणे होतो (हेक्टरमध्ये क्षेत्रफळ) :
- वन: ०
- बिगरशेती वापरात असलेली जमीन : १२०
- ओसाड व लागवडीला अयोग्य जमीन : ९०
- कुरणे व इतर चराऊ जमीन : १५
- फुटकळ झाडीखालची जमीन : ४
- लागवडीयोग्य पडीक जमीन : १९०
- कायमस्वरूपी पडीक जमीन : ५
- सद्यस्थितीतील पडीक जमीन : ०
- पिकांखालची जमीन : १२३
- एकूण कोरडवाहू जमीन : ८२
- एकूण बागायती जमीन : ४१
धार्मिक ठिकाणे
संपादनअंबिका मंदिर
संपादनश्री अंबाबाई Archived 2019-09-12 at the Wayback Machine. ही शिरवळची ग्रामदेवता आहे. हे गावातले सगळ्यात महत्त्वाचे धार्मिक ठिकाण आहे. अंबिका माता हे ग्रामदैवत असून वैशाख महिन्यात अक्षय्य तृतीयेला गावात मोठी यात्रा भरते. मंदिरातील मूर्ती पुरातन काळातील आहे. इथे प्राचीन लेणी पण आहेत हे फारच थोड्या जणांना माहित आहे.दरवर्षी अक्षय तृतियेला देवीचा महोत्सव असतो.
भैरवनाथ मंदिर
संपादनहे गावातील दुसऱ्या क्रमाकांचे मंदिर आहे. मंदिराचे बांधकाम पुरातन असून यात्रा व इतर सर्व महोत्सवांमध्ये या मंदिरात मोठ्या प्रमाणावर गर्दी असते.
केदारेश्वर मंदिर
संपादनया पुरातन शिवायालयास ऐतिहासिक महत्त्व आहे. शिवाजी महाराजांच्या काळात या मंदिरातून शुभानमंगल किल्ल्यावर जायला भुयारी मार्ग होता. संकटाच्या वेळी या मार्गाचा उपयोग होत असे, असा उल्लेख सापडतो.
मंडाईदेवी मंदिर
संपादनहे मंदिर नदीकिनारी असून अतिशय पुरातन आहे. गावच्या यात्रेच्या वेळी या देवीलासुद्धा खूप महत्त्व येते.
मुदाई देवी मंदिर Archived 2022-06-26 at the Wayback Machine.
संपादनमुदाई मंदिर २५० ते ३०० वर्ष जुनं आहे. ते वर्षातले ८ ते १० महिने पाण्यामध्येच असते फक्त काही काळ उन्हाळ्यात ते पाण्याच्या बाहेर असते. त्याच वेळी भाविक या मंदिरात दर्शन घेऊ शकतात.अधिक माहितीसाठी डिजिटल शिरवळ वेबसाईटला भेट द्या
रामेश्वर मंदिर
संपादनहेही मंदिर नदीकिनारी असून बस स्थानक ते मंदिरापर्यंत जाणारा रस्ता गावाच्या मध्यभागातून व मुख्य बाजारपेठेतून जातो. मंदिराचा परिसर अतिशय सुंदर आणि निसर्गरम्य आहे. येथून शुभानमंगल किल्ल्याचे दर्शन घडते.
पर्यटन
संपादनशिरवळपासून वायव्य दिशेला जवळपास ५ कि. मी. अंतरावर पांडवदऱ्यामध्ये सुंदर पांडवलेणी पाहायला मिळतात. गावापासून १० किलोमीटर पूर्वेला भोर-पंढरपूर या राज्य महामार्गावर वीर धरण आहे. तसेच नसरापूर, नारायणपूर, प्रतिबालाजी मंदिर, महाबळेश्वर, वाई ही पाहण्यासारखी पर्यटनस्थळे काही तासांच्या अंतरावर आहेत.
शैक्षणिक
संपादनमराठी शाळा/कॉलेजे
संपादन- आदर्श विद्यालय (रयत शिक्षण संस्था, सातारा)
- ज्ञानसंवर्धिनी शाळा
- प्रगती हायस्कूल
- आंगणवाडी
- श्रीपतराव कदम महाविद्यालय
- क्रांतिसिंह नाना पाटील पशुवैद्यकीय महाविद्यालय
- M E S इंग्लिश मीडियम स्कूल शिरवळ.
- ग्लोरी इंग्लिश मीडियम स्कूल शिरवळ.
इतिहास
संपादनगावाच्या जवळच पुरातन लेणी आहेत. ही लेणी सातवाहन काळातील असावीत असा अंदाज आहे. पांडवदरा असे नाव आहे.
शिरवळच्या शुभानमंगल किल्ल्याची माहिती देणारा एक ग्रंथसुद्धा उपलब्ध आहे.
शिरवळचा बटाटेवडा
संपादनशिरवळ येथे मराठी शाळेशेजारी गेली ३५ वर्षे झाली आपल्या सेवेत खमंग आणि झंजाणित अशी चव श्रीराम बेस्ट वडापाव सेवेत आहे
संदर्भ
संपादन- ^ "Mudai Devi Mandir Shirwal / मुदाई देवी मंदिर शिरवळ". डिजिटल शिरवळ (marathi भाषेत). 2022-06-26 रोजी मूळ पान पासून संग्रहित. 2018-12-21 रोजी पाहिले.CS1 maint: unrecognized language (link)