शमिभा पाटील
या लेखातील मजकूर मराठी विकिपीडियाच्या विश्वकोशीय लेखनशैलीस अनुसरून नाही. आपण हा लेख तपासून याच्या पुनर्लेखनास मदत करू शकता.
नवीन सदस्यांना मार्गदर्शन हा साचा अशुद्धलेखन, अविश्वकोशीय मजकूर अथवा मजकुरात अविश्वकोशीय लेखनशैली व विना-संदर्भ लेखन आढळल्यास वापरला जातो. |
शमिभा भानुदास पाटील या एक मराठी पारलिंगी सामाजिक कार्यकर्त्या असून, तृतीयपंथी हक्क अधिकार समितीच्या राज्य समन्वयक संस्थापक आहेत. त्यांचे शिक्षण एम ए मराठी या विषयात झाले असून. कवी ग्रेस यांच्या साहित्याचा पूर्व अभ्यास त्या पीेचडी साठी करीत आहेत. कवयित्री, स्तंभलेखन , वक्ता तसेच आंबेडकरी विचारांच्या अभ्यासक आहेत.
महाराष्ट्र राज्याच्या राजकीय इतिहासात त्या वंचित बहुजन आघाडी या पक्षाचे वतीने महाराष्ट्र विधानसभा 2024 ला रावेर विधानसभा क्षेत्रातून निवडणूक लढणाऱ्या एकमेव व पहिल्या तृतीयपंथी उमेदवार होत्य. [१]
वंचित बहुजन युवा आघाडीच्या कार्यकारिणी सदस्य देखील आहेत. पाटील या २००८ सालापासून पूर्ण वेळ सामाजिक कार्यकर्ता म्हणून जळगावमध्ये काम करत आल्या आहेत. या अंतर्गत त्यांनी आदिवासींचे वनहक्क, आरोग्य, रचनात्मक संसाधनाविषयी अनेक संघर्ष मोर्चा. तर यावल /रावेर तालुक्यातील फैजपूर आणि ग्रामीण भागातील झोपडपट्टी पुनर्वसन, रेशन अधिकार कृती समिती, केळी कामगार संघटना गायरानधारकांचे अधिकार, बेघर हक्क निवारा या संदर्भात जनआंदोलनात्मक काम करतात. डाॅ. बाबासाहेब आंबेकरांनी सुरू केलेल्या प्रबूद्ध भारत या पाक्षिकांच्या लेखिका आहेत. तसेच प्रशांत दया पवार संपादक असलेल्या बाईमाणुस -भारत अब बोल रहा है। या महिला केंद्रित मिडिया समुहाच्याच्या पत्रकार म्हणून कार्यरत. कवियत्री, स्तंभलेखिका, आंबेडकरी विचारांच्या अभ्यासक व वक्ता
भारतात पुरुषसत्ताक पद्धतीत स्त्रीला आणि तृतीयपंथीयांना 'सेक्स ऑब्जेक्ट' म्हणून पाहिले जाते. या व्यवस्थेने तृतीयपंथीयांना वर्षानुवर्षे माणूसपण नाकारले. शोषणाची व्यवस्था निर्माण केली. देवाची माणसे म्हणत शतकानुशतके त्यांचे शोषण केले. समाजाने माणूस म्हणून तृतीयपंथीयांना स्वीकारले नाही. तृतीयपंथीयांच्या प्रतिनिधी व सामाजिक कार्यकर्त्या शमिभा पाटील या म्हणतात रेल्वे, बाजार, बारसे, दिवाळी, लग्न अशा ठिकाणी त्यांची जागा एका मर्यादेत निश्चित केली आहे. त्यांच्याकडे विविध चळवळींची परंपरा असली तरी या चळवळीही एका कोशात अडकून पडल्या आहेत. भांडवलशाही वृत्तीने देशाचे नुकसान केले, पण त्यापेक्षा कितीतरी अधिक तृतीयपंथीयांचेही नुकसान केले आहे. हिंदी सिनेमाने हिजड्यांचे बीभत्स चित्रण केले. सिनेमामध्ये दाखवलेले तृतीयपंथी लक्ष्मी त्रिपाठी, गौरी सावंत, शबनम मौसी, दिशा पिंकी शेख यांनी चौकट मोडून स्वतःचे स्थान निर्माण केले. त्यांच्याच पावलावर पाऊल ठेवून शमिभा भानुदास पाटील ह्या तृतीयपंथीय समाजासाठी निर्माण केलेले साचे मोडत आहेत. सध्या हात आणि त्या हाताने वाजणारी टाळी हेच त्यांचे जगण्याचे साधन आहे. समाज आजही त्यांना स्वीकारत नाही. शिक्षण व नोकरीच्या संधी देत नाही. आजही हिजड्यांच्या शिक्षणाचे प्रमाण केवळ ०.३ टक्के आहे. कायद्याने दिलेले हक्कही हा लोकशाही असलेला समाज मान्य करत नाही.
शमिभा पाटील ह्या वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर वंचित बहुजन युवा आघाडी व वंचित बहुजन महिला आघाडी महा. प्रदेश कार्यकारिणी सदस्य आहेत.
जळगाव तालुक्यातील भादली बुद्रुक येथील ग्रामपंचायत निवडणुकीत तृतीयपंथी उमेदवार अंजली पाटील यांना उमेदवारी मिळाली होती. अंजली पाटील यांच्या उमेदवारीवरून गोंधळ देखील झाला होता. मात्र, हायकोर्टाने त्यांच्या उमेदवारीला मान्यता दिली होती. अंजली पाटील निवडणूक जिंकल्याने त्या आता जळगाव महाराष्ट्रातील पहिल्या व देशातील अधिकृत लिंग ओळखीसहीत तृतीयपंथी लोकप्रतिनिधी ठरल्या आहेत. भादली बुद्रुक येथील वॉर्ड क्रमांक चारमधून तृतीयपंथी अंजली पटेल यांनी महिला राखीवमधून अर्ज भरला होता. मात्र, इतर उमेदवारांनी हरकत घेतल्याने तहसिलदारांनी महिला प्रवर्गातून त्यांना उमेदवारी नाकारली होती. त्या विरोधात त्यांनी न्यायालयात धाव घेतली होती. तेथून त्यांना महिला प्रवर्गातून अर्ज भरण्याची परवानगी मिळाली होती. यानंतर त्यांनी अतिशय जोमाने प्रचार केला. वंचित बहुजन युवा आघाडी व महिला आघडीच्याच्या महा.प्रदेश कार्यकारिणी सदस्य शमिभा पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली त्यांनी केलेल्या प्रचारला जनमताचा कौल मिळाला. जाहीर झालेल्या निकालात त्या विजयी झाल्या.. त्या जिल्ह्यातील पहिल्या ग्रामपंचायत सदस्य ठरल्या आहेत. अंजली पाटील यांचा मागील पंचवार्षिक निवडणुकीत ११ मतांनी पराभव झाला होता. यंदाच्या निवडणुकीतही त्यांनी अर्ज भरल्यानंतर ‘लिंग’प्रकारापुढे ‘इतर’असे नमूद केल्याने त्यांचा उमेदवारी अर्ज नाकारला गेला. खंडपीठात धाव घेतल्यानंतर स्त्री संवर्गातून निवडणूक लढविण्यास त्यांना परवानगी मिळाली होती. भादली ग्रामपंचायतीचा निकाल जाहीर होताना सर्वांनाच याबाबत उत्सुकता हेाती. अखेर त्या विजयी झाल्या. लोकांनी दाखविलेल्या प्रेमामुळेच त्या निवडून आल्या.
तृतीयपंथी हक्क व कल्याण संरक्षण मंडळ (महाराष्ट्र शासन) याच्या त्या नाशिक विभागीय आयुक्तालय येथे सहअध्यक्ष म्हणून जबाबदारी पाहतात.
अंमळनेर येथे झालेल्या ९७ व्या अखिल भारतील मराठी साहित्य संमेलनात 'पारलिंगी (तृतीयपंथी) मराठी साहित्यातील चित्रण व स्थान' या विशेष परिसंवादात त्या वक्ता म्हणून आमंत्रित होत्या.
सर्वोच्च न्यायालयाच्या एका निर्णयाने केंद्र व राज्य सरकारने तृतीयपंथी समुदायाला कायदेशीररीत्या तृतीयपंथी म्हणून मान्यता दिली आहे. कुठल्याही माणसाच्या अस्मितेला ठेच पोहोचविणे व सामाजिक क्षती पोहोचविण्याच्या उद्देशाने लिंग-जातिधर्माचा उपरोधिक वा अवमानकारक पद्धतीने उल्लेख करणे हा अपराधच आहे.
संदर्भ
संपादन
- ^ "Anjali Patil: तृतीयपंथी अंजली पाटील यांची ग्रामपंचायत निवडणुकीत बाजी". Maharashtra Times. 2021-03-08 रोजी पाहिले.
- ^ Pawar, Gokul. "आम्ही सारे नागवंशीय संस्थेतर्फे शमीभा पाटील यांना नांगेली रत्न पुरस्कार". Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live (इंग्रजी भाषेत). 2020-08-11 रोजी मूळ पान पासून संग्रहित. 2021-03-08 रोजी पाहिले.
- ^ "तृतीयपंथी धीरज उर्फ शामिभा मीना भानुदास पाटील यांची वंचित बहुजन आघाडीकडून उमेदवारीसाठी मुलाखत - BahujanNama". Dailyhunt (इंग्रजी भाषेत). 2021-03-08 रोजी पाहिले.