व्हेनेसा रेडग्रेव्ह
डेम व्हेनेसा रेडग्रेव्ह (जन्म ३० जानेवारी १९३७) एक इंग्रजी अभिनेत्री आहे. तिच्या सहा दशकांहून अधिक काळ चाललेल्या कारकिर्दीत, रेडग्रेव्हने अकादमी पुरस्कार, एक टोनी पुरस्कार, दोन प्राइमटाइम एमी पुरस्कार आणि एक ऑलिव्हियर पुरस्कार यासह असंख्य प्रशंसा मिळवल्या आहेत. ती अभिनयाचा तिहेरी मुकुट प्राप्त करणाऱ्या काही कलाकारांपैकी एक आहे. तिला बाफ्टा फेलोशिप अवॉर्ड, गोल्डन लायन ऑनररी अवॉर्ड आणि अमेरिकन थिएटर हॉल ऑफ फेममध्ये समावेशासह विविध मानद पुरस्कार देखील मिळाले आहेत.[१][२]
British actress and activist (born 1937) | |
माध्यमे अपभारण करा | |
विकिपीडिया | |
स्थानिक भाषेतील नाव | Vanessa Redgrave |
---|---|
जन्म तारीख | जानेवारी ३०, इ.स. १९३७ Blackheath |
कार्य कालावधी (प्रारंभ) |
|
Floruit |
|
नागरिकत्व | |
शिक्षण घेतलेली संस्था |
|
व्यवसाय |
|
राजकीय पक्षाचा सभासद | |
पद |
|
मातृभाषा |
|
कुटुंब |
|
वडील |
|
आई |
|
भावंडे |
|
अपत्य |
|
वैवाहिक जोडीदार |
|
सहचर |
|
पुरस्कार |
|
रेडग्रेव्हने १९५८ मध्ये अ टच ऑफ सन या नाटकाद्वारे रंगमंचावर अभिनयाची सुरुवात केली. १९६१ मध्ये तिने रॉयल शेक्सपियर कंपनीसोबत शेक्सपियरच्या कॉमेडी ॲज यू लाइक इटमध्ये रोझलिंडची भूमिका साकारली आणि तेव्हापासून तिने वेस्ट एंड आणि ब्रॉडवेवर असंख्य निर्मितीमध्ये भूमिका केल्या आहेत. तिने द एस्पर्न पेपर्स (१९८४) साठी रिव्हायव्हलमधील सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीचा ऑलिव्हियर पुरस्कार जिंकला. तिने ए टच ऑफ द पोएट (१९८८), जॉन गॅब्रिएल बोर्कमन (१९९७), आणि द इनहेरिटन्स (२०१९) साठी ऑलिव्हियर नामांकन प्राप्त केले. लाँग डेज जर्नी टू नाईट (२००३) च्या पुनरुज्जीवनासाठी तिने नाटकातील सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीचा टोनी पुरस्कार जिंकला. तिला द यीअर ऑफ मॅजिकल थिंकिंग (२००७) आणि ड्रायव्हिंग मिस डेझी (२०११) साठी टोनी नामांकन मिळाले आहे.
रेडग्रेव्हने तिच्या वडिलांच्या सोबत वैद्यकीय नाटक बिहाइंड द मास्क (१९५८) मध्ये अभिनय करून तिच्या चित्रपटसृष्टीत पदार्पण केले आणि मॉर्गन: अ सुटेबल केस फॉर ट्रीटमेंट (१९६६) या व्यंगचित्रात्मक चित्रपटातून प्रसिद्धी मिळवली. ह्यासाठी तिला सहा अकादमी पुरस्कार नामांकनांपैकी पहिले नामांकन मिळवून दिले. ज्युलिया (१९७७) साठी सर्वोत्कृष्ट सहाय्यक अभिनेत्रीचा पुरस्कार तिला मिळाला. तिचे इतर नामांकन इसाडोरा (१९६८), मेरी, क्वीन ऑफ स्कॉट्स (१९७१), द बोस्टोनियन्स (१९८४), आणि हॉवर्ड्स एंड (१९९२) साठी होते. अ मॅन फॉर ऑल सीझन्स (१९६६), ब्लोअप (१९६६), कॅमलोट (१९६७), द डेव्हिल्स (१९७१), मर्डर ऑन द ओरिएंट एक्सप्रेस (१९७४), अगाथा (१९७९), प्रिक अप युअर इअर्स (१९८७), मिशन: इम्पॉसिबल (१९९६), व्हीनस (२००६), अटोनमेंट (२००७), कोरियोलनस (२०११), आणि फॉक्सकॅचर (२०१४).हे तिच्या इतर चित्रपटांपैकी आहेत.
वैयक्तिक जीवन
संपादनअभिनेत्यांच्या रेडग्रेव्ह कुटुंबातील त्या एक सदस्य आहे. ती सर मायकेल रेडग्रेव्ह आणि लेडी रेडग्रेव्ह (राचेल केम्पसन) यांची मुलगी आहे, लिन रेडग्रेव्ह आणि कोरिन रेडग्रेव्ह यांची बहीण, इटालियन अभिनेता फ्रँको नीरोची पत्नी, अभिनेत्री जोली रिचर्डसन आणि नताशा यांची आई, रिचर्डसन आणि पटकथा लेखक आणि दिग्दर्शक कार्लो गॅब्रिएल नीरो, ब्रिटिश अभिनेत्री जेम्मा रेडग्रेव्हची मावशी, अभिनेता लियाम नीसन आणि चित्रपट निर्माता टिम बेव्हनची सासू आणि डेझी बेव्हन, मायकेल रिचर्डसन आणि डॅनियल नीसन यांची आजी.
रेडग्रेव्हने १९६२ ते १९६७ या काळात चित्रपट आणि नाटक दिग्दर्शक टोनी रिचर्डसनशी लग्न केले होते. या जोडप्याला दोन मुली होत्या: अभिनेत्री नताशा रिचर्डसन (१९६३-२००९) आणि जोली रिचर्डसन (जन्म १९६५). १९६७ मध्ये, रेडग्रेव्हने रिचर्डसनला घटस्फोट दिला, जो फ्रेंच अभिनेत्री जीन मोर्यू सोबत संबंधीत होता. जेव्हाच कॅमलोटच्या सेटवर रेडग्रेव्ह इटालियन अभिनेता फ्रँको नीरोच्या प्रेमात पडली. १९६९ मध्ये, त्यांना कार्लो गॅब्रिएल रेडग्रेव्ह स्पानेरो हा मुलगा झाला जो पटकथा लेखक आणि दिग्दर्शक आहे. १९७१ ते १९८६ पर्यंत, तिचे अभिनेता टिमोथी डाल्टन यांच्याशी दीर्घकालीन संबंध होते, ज्यांच्यासोबत ती मेरी, क्वीन ऑफ स्कॉट्स (१९७१) या चित्रपटात दिसली होती.[३] रेडग्रेव्ह आणि फ्रँको नीरो पुन्हा एकत्र आले आणि त्यांनी ३१ डिसेंबर २००६ रोजी लग्न केले. कार्लो नीरोने दिग्दर्शित केलेल्या द फिव्हर (२००४) मध्ये रेडग्रेव्ह होत्या.[४] रेडग्रेव्हला सहा नातवंडे आहेत.
२००९ आणि २०१० मध्ये १४ महिन्यांत, रेडग्रेव्हने एक मुलगी आणि तिची दोन लहान भावंडं गमावली. तिची मुलगी नताशा रिचर्डसन १८ मार्च २००९ रोजी स्कीइंग अपघातामुळे मेंदूला झालेल्या दुखापतीमुळे मरण पावली.[५] ६ एप्रिल २०१० रोजी तिचा भाऊ, कोरिन रेडग्रेव्ह, मरण पावला आणि २ मे २०१० रोजी तिची बहीण लिन रेडग्रेव्ह मरण पावली.
रेडग्रेव्हला एप्रिल २०१५ मध्ये हृदयविकाराचा झटका आला होता.[६] सप्टेंबर २०१५ मध्ये, तिने उघड केले की वर्षानुवर्षे धुम्रपान केल्यामुळे होणाऱ्या एम्फिसीमामुळे तिची फुफ्फुसे केवळ ३० टक्के क्षमतेने काम करत आहेत.[७]
संदर्भ
संपादन- ^ "Theater honours put women in the spotlight". Pittsburgh Post-Gazette. 4 March 2016 रोजी मूळ पान पासून संग्रहित. 5 February 2014 रोजी पाहिले.
- ^ "Vanessa Redgrave to receive Academy Fellowship". BAFTA. 21 February 2010. 2014-08-17 रोजी मूळ पान पासून संग्रहित. 26 August 2010 रोजी पाहिले.
- ^ "Excerpts from Vanessa Redgrave's Autobiography". Oocities.org. 13 June 2012 रोजी पाहिले.
- ^ Amy Goodman (13 June 2007). "Vanessa Redgrave Combines Lifelong Devotion to Acting and Political Involvement in New HBO Film The Fever" (.MP3). Democracy Now!. 14 May 2007 रोजी पाहिले.
- ^ "Natasha Richardson dies aged 45". BBC News. 19 March 2009. 27 May 2010 रोजी पाहिले.
- ^ Buchanan, Sarah (26 September 2015). "Vanessa Redgrave survives severe heart attack thanks to answer phone message". Daily Express.
- ^ Roberts, Alison (24 September 2015). "Vanessa Redgrave: 'Before I didn't care at all – now I find myself thinking what a miracle everything is'". London Evening Standard.