वॉरन हेस्टिंग्स

(वॉरन हेस्टिंग्ज या पानावरून पुनर्निर्देशित)

वॉरन हेस्टिंग्स (६ डिसेंबर, इ.स. १७३२:चर्चिल, ऑक्सफर्डशायर, इंग्लंड - २२ ऑगस्ट, इ.स. १८१८:डेल्सफोर्ड, ग्लाउस्टरशायर, इंग्लंड) हा इंग्लिश राजकारणी आणि भारताचा पहिला गव्हर्नर जनरल होता. रॉबर्ट क्लाइव्हने पाया घातलेल्या भारतातील ब्रिटिश राजवटीला हेस्टिंग्सने बलाढ्य बनविले.

अलीपूर येथे वॉरन हेस्टिंग्स आणि त्याची पत्नी मेरियन.

हेस्टिंग्सचा जन्म व बालपण हलाखीच्या परिस्थितीतील होते.[] वेस्टमिन्स्टर स्कूलमध्ये शिकायला असताना हा युनायटेड किंग्डमचा भविष्यातील पंतप्रधान लॉर्ड शेल्बर्न आणि विल्यम हेन्री कॅव्हेंडिश-बेंटिंक तसेच कवी विल्यम काउपर यांचा समकालीन होता.[]

हेस्टिंग्स १७५०मध्ये ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनीमध्ये कारकून म्हणून नोकरीला लागला व त्यासाठी कोलकात्यास आला.[] हेस्टिंग्स कष्टाळू म्हणून प्रसिद्ध होता. त्याने भारतात आल्या आल्या येथील चालीरीती तसेच उर्दू आणि फारसी भाषा शिकून घेतल्या.[] त्याच्या कष्टाचे चीज म्हणून १७५२मध्ये त्याला कासीमबझार येथे बढतीसह पाठविण्यात आले. तेथे त्याने विल्यम वॉट्सच्या देखरेखीखाली पूर्व भारतातील राजकारणाचे धडे घेतले. याच सुमारास बंगालचा नवाब अलिवर्दी खान मृत्यूशय्येवर होता व त्याचा नातू सिराज उद दौला सत्तेवर येणे अपेक्षित होते. सिराज उद दौला युरोपीय लोकांच्या विरुद्ध होता व त्यांच्या राजकीय लुडबुडीस त्याचा सक्त विरोध होता. सत्तेवर आल्याआल्या बंगालच्या सैन्याने युरोपीय ठाण्यांवर हल्ले चढविले. त्यात कासीमबझारच्या इंग्लिश ठाण्यासही वेढा घातला गेला. आपल्यापेक्षा अनेकपटींनी मोठ्या असलेल्या शत्रूसैन्याविरुद्ध ब्रिटिशांनी शरणागती पत्करली.[] हेस्टिंग्ससह तेथील सगळ्या युरोपीय व्यक्तींना मुर्शिदाबादमध्ये कैदेत टाकण्यात आले. त्यानंतर नवाबाच्या सैन्याने थेट कोलकात्यावर चाल करून तेथील इंग्लिश शिबंदीचा पाडाव केला व मुर्शिदाबादसह इतर ठिकाणच्या युरोपीय कैद्यांना कोलकत्यातील कारावासात डांबण्यात आले.

1773 च्या रेग्युलटिंग ऍक्ट नुसार कलकत्याला सर्वोच्च न्यायालयाची स्थापना.

जिल्हा स्तरावर फोजदारी व दिवाणी न्यायालयाची स्थापना

कलकत्याला सदर दिवाणी व सदर निजामत अदालत

कर गोळा करण्यासाठी कलेक्टर या अधिकाऱ्याची तर वसुलीसाठी अमील या भारतीय कर्मचाऱ्यांची नियुक्ती.

रॉबर्ट क्लाइव्ह ची द्विदल प्रशासन व्यवस्था समाप्त.

प्रथम मराठा युद्ध (1775-82) सुरत, पुरंदर, वडगाव, सालबाई चा तह.

Code of gentoo लॉ नावाचे कायदेविषयक पुस्तक -हिंदू व मुस्लिम कायदेविषयक पुस्तक - हिंदू व मुस्लिम कायद्याचे संकलन

  1. ^ Lyall, Sir Alfred (1920). Warren Hastings. p. 1. Unknown parameter |स्थळ= ignored (सहाय्य)
  2. ^ Turnbull, Patrick. Warren Hastings. New English Library, 1975. p.17.
  3. ^ Turnbull p.17-18
  4. ^ Turnbull p.19-21
  5. ^ Turnbull p.23