वेटिंग फॉर अ व्हिझा
वेटिंग फॉर अ व्हिझा हे डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी इ.स. १९३५-३६ या कालावधी दरम्यान लिहिलेले २० पानी आत्मचरित्र आहे.[१] यात डॉ. आंबेडकरांनी अस्पृश्यतेसंबंधी त्यांना आलेल्या अनुभवांच्या आठवणींचा समावेश केला आहे.[२] कोलंबिया विद्यापीठात हे आत्मचरित्रपर पुस्तक ‘पाठ्यपुस्तक’ म्हणून वापरले जाते.[३][४]
वेटिंग फॉर अ व्हिझा | |
लेखक | डॉ. बाबासाहेब आंबेडकर |
भाषा | इंग्रजी |
देश | भारत |
साहित्य प्रकार | आत्मकथा, दलित साहित्य |
विषय | कोलंबिया विद्यापीठातील पाठ्यपुस्तक |
पृष्ठसंख्या | २० |
सामग्री
संपादनडॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्या बालपणापासून सुरू होणारे हे अस्पृश्यतेबद्दलचे अनुभव ह्या पुस्तकात संक्षिप्तपणे मांडलेले आहेत. विभाग १,२,३ आणि ४ मध्ये डॉ. आंबेडकरांच्या स्वतःच्या अनुभवांचा समावेश आहे, तर विभाग ५ आणि ६ मध्ये अस्पृश्यतेबाबत इतर लोकांच्या अनुभवांचा समावेश आहे.
थोडक्यात परिचय
संपादनएका परिच्छेद परिचयामध्ये डॉ. आंबेडकर, विशेषतः परदेशी आणि जे लोक अस्पृश्यतेच्या संकल्पनेशी परिचित नसतील त्यांना, आपल्या पुस्तकाच्या विषयाचा थोडक्यात परिचय करून देतात.
विभाग १: कोरेगांवला बालपणीचा प्रवास दुःस्वप्न झाला
संपादनपहिल्या विभागात इ.स. १९०१ मध्ये १० वर्षीय भीमराव आंबेडकरांनी आणि त्यांच्या भावंडांनी त्यांच्या निवासस्थानापासून सातारा ते कोरेगाव येथील त्यांच्या वडिलांना भेटण्यासाठी आणि मसूरला प्रवास करताना अनुभवलेल्या प्रवासाचे त्रासदायक आणि धोकादायक वर्णन केले आहे.
विभाग २ : पश्चिमेकडून परत पण बडोद्यामध्ये राहण्यास असमर्थ
संपादनया विभागात बडोद्यामध्ये त्यावेळेस अस्तित्वात असलेल्या न केवळ जातींमधील परंतु धर्मांमधील सखोल विभाजनांचे वर्णन केले आहे. इ.स. १९१८ मध्ये, भारतात परतल्यावर (अमेरिकेमध्ये ३ वर्षे आणि लंडनमध्ये एक वर्ष राहिल्यानंतर) डॉ. आंबेडकर अकाउंटंट जनरल ऑफिसमध्ये परिवीक्षाचे कार्य करण्यासाठी बडोदा राज्यात गेले. तथापि, बडोदाला पोहोचल्यावर, त्याला कळले की उच्च जातींच्या हिंदू हॉटेलांमध्ये त्यांना खालच्या अस्पृश्य जातीचे असल्यामुळे राहू दिले नाही. त्यांना पारशी सराई सापडली, पण इथे अपारशीला पारशी समाजात राहण्याची परवानगी नव्हती. ते आणि पारशीचे त्राणकर्ते एक तडजोडीपर्यंत पोहोचले, जिथे डॉ. आंबेडकरांनी दुप्पट भाडे देऊन त्यांचे नाव पारशी लिहिले आणि त्यांना राहण्याची परवानगी मिळाली. तथापि, ही फसवणूक (त्यांच्या मते) इतर पारशी लोकांनी शोधून काढली आणि आपल्या निवासस्थानाच्या अकराव्या दिवशी, चिडलेल्या पारशी लोकांनी, शस्त्रांच्या मदतीने त्यांना तेथून काढून टाकले. त्या दिवशी त्यांना ते हॉटेल सोडून जायचे होते, आणि राहण्यासाठी दुसरीकडे जागा नसल्यामुळे डॉ. आंबेडकरांना बडोदा सोडणे भाग पडले आणि दुसरीकडे नोकरी शोधण्यासाठी मुंबईला परत यावे लागले.
विभाग 3: चाळीसगावमध्ये गर्व, अस्ताव्यस्तता आणि एक धोकादायक अपघात
संपादनया विभागात इ.स. १९२८ मध्ये चाळीसगाव (महाराष्ट्र) या खेड्यात घडलेली घटना बाबासाहेबांनी कथन केली आहे.अस्पृश्यता आणि दडपशाहीच्या तक्रारींचा तपास करण्यासाठी बॉम्बे सरकारने स्थापन केलेल्या समितीचा सदस्य म्हणून त्यांची नेमणूक करण्यात आली होती. खानदेश जिल्ह्यातील तपास पूर्ण झाल्यानंतर मुंबईकडे मार्गस्थ होताना चाळीसगाव येथे हिंदूनी अस्पृश्यांवर सामाजिक बहिष्कार टाकण्याच्या प्रकरणाचा तपास करण्यासाठी ते तेथे गेले. चाळीसगाव येथील अस्पृश्यांनी बाबासाहेबांना तेथे एक रात्र मुक्काम करण्याची विनंती केली, परंतु टांगेवाल्याने अस्पृश्य असलेल्या डॉ. आंबेडकरांना टांग्यात घेऊन जाणे नाकारले कारण ते त्याच्या प्रतिष्ठेविरोधी होते. मग त्या गावातील अस्पृश्यांनी तो टांगा भाड्याने घेतला. आणि स्वतः टांगा घेऊन जाऊ लागले. त्यांना टांगा चालवण्याचा अनुभव नसल्यामुळे नदीजवळ नाल्यावर अपघात झाला. नाल्याच्या दगडात टांग्याचे चाक अडकल्यामुळे बाबासाहेब टांग्यातून बाहेर फेकले गेले. आणि त्यामुळे डॉ. बाबासाहेबांना मोठी दुखापत आणि फ्रॅक्चर झाले. घोडागाडी नदीत पडली आणि बाबासाहेब थोडक्यात बचावले.
डॉ.आंबेडकरांना या घटनेमुळे अस्पृश्य बांधवांबद्दल अधिकच अभिमान वाटू लागला आणि त्यांची प्रतिष्ठा बाबासाहेबांच्या मनात आणखीच उंचावली. कारण गावात आलेल्या बाबासाहेबांना त्यांना पायी चालू द्यायचे नव्हते म्हणून त्यांनी स्वतःला धोका पत्करला होता. त्यांना याचीदेखील जाणीव झाली की, साध्या टांगेवाल्यापेक्षा बॅरिस्टर असलेल्या व्यक्तीचीही या समाजात कमी किंमत आहे.
विभाग ४ : दौलताबाद किल्यावरील पाण्याला विटाळ
संपादनहा विभाग इ.स. १९३४ मध्ये घडलेल्या घटनेशी निगडित आहे. यात मुस्लिम अस्पृश्यांना कशी वागणूक देतात याचा उल्लेख आहे.
डॉ. बाबासाहेब आंबेडकर आणि त्यांचे मित्र दौलताबाद किल्ला बघण्यासाठी गेले होते. औरंगाबाद (हैदराबाद निजाम राज्यातील)च्या भेटीदरम्यान. किल्यावर आगमन झाल्यानंतर, किल्ल्यावर आल्यावर डॉ. आंबेडकरांसह सर्वांनी किल्ल्यावरील प्रवेशद्वाराच्या टाकीत ठेवलेल्या पाणी वापरून हातपाय धुतले व पाणी प्यायले. तथापि, काही मिनिटांनंतर एक वृद्ध मुसलमान व्यक्ती त्यांच्या मागे धावू लागला, "धेड (अस्पृश्य) यांनी आपले पाणी दूषित केले आहे" अशी त्याने ओरड केली आणि लवकरच एक गोंधळ उडाला, त्यात आंबेडकरांचे गट आणि स्थानिक मोठा मुस्लिम गट तेथे ओरड करू लागला.
परंतु आंबेडकरांनी त्या समुदायाला सुनावले की, जर एखाद्या अस्पृश्याने इस्लाम धर्म स्वीकारला असता आणि त्याने हे पाणी वापरले असते तर त्याच्याशी तुम्ही असेच वागले असता काय?
विभाग ५ : डॉक्टरांचा उपचारास नकार आणि महिलेचा मृत्यू
संपादन१२ डिसेंबर इ.स. १९२९ रोजी एम.के. गांधी यांनी प्रकाशित केलेल्या यंग इंडिया जर्नलमध्ये प्रकाशित केलेले एक पत्र आहे. त्यात काठेवाडमधील हरिजनच्या दुःखद अनुभवाचे वर्णन केले आहे, ज्याची पत्नी मुलास जन्म दिल्यानंतर लवकरच आजारी पडली. हिंदू (ब्राह्मण) डॉक्टरांनी तिला थेट उपचार करण्यास नकार दिला, किंवा घरात त्यांना पाहण्यास नकार दिला. रुग्ण स्त्रीला हरिजन कॉलनीच्या बाहेर आणल्यावर तिला तपासण्यास डॉक्टर तयार झाले. मुस्लिम व्यक्तीद्वारा थर्मोमीटर तपासले असता डॉक्टरांना ती आजारी असल्याचे दिसून आले. काही औषधे तिला देण्यात आली, आणि जेव्हा तिची स्थिती बिघडली तेव्हा डॉक्टरांनी त्या स्त्रीवर उपचार करण्यास नकार दिला. त्यानंतर ती मरण पावली.
Section 6: तरुण कारकुनाला शिवीगाळ व धमकी दिल्यानंतर आपली नोकरी सोडावी लागली
संपादन
This section recounts the narrated experience of a Bhangi boy, recounted on 6 March 1938 at a Bhangi meeting in Dadar, Bombay. The educated boy got employment as a Talati in the government district offices of Borsad, Kheda, in what is now Gujarat. However, he was refused accommodation there, being an untouchable. Neither did the untouchables of the village accommodate him, fearing the wrath of Hindus who felt that the bhangi boy was aiming for a job which was beyond him.
At the government office, his colleagues discriminated against him, treated him badly and did not allow him to drink water when thirsty for fear of the water getting polluted by his touch. Ultimately, matters only got worse, with a large crown of locals threatening to kill him.
He left this job and returned home.
प्रथम प्रकाशन आणि नंतरचे संस्करण
संपादनइ.स. १९९० साली पीपल्स एज्युकेशन सोसायटीने बाबासाहेबांचे हे लेखन पुस्तिका म्हणून प्रकाशित केले. त्यानंतर इ.स. १९९३ मध्ये महाराष्ट्र सरकारच्या शैक्षणिक विभागाने यातील काही भाग डॉ. बाबासाहेब आंबेडकर: लेखन आणि भाषणे, खंड १२, भाग १ मध्ये प्रकाशित केला.
हे सुद्धा पहा
संपादनसंदर्भ आणि नोंदी
संपादन- ^ Ambedkar, Dr. B.R. "Waiting for a Visa". http://www.columbia.edu. Columbia University. 15 April 2015 रोजी पाहिले. External link in
|website=
(सहाय्य) - ^ Moon, Vasant (1993). Dr. Babasaheb Ambedkar: Writings and Speeches, Vol. 12. Mumbai: Bombay: Education Department, Government of Maharashtra.
|access-date=
requires|url=
(सहाय्य) - ^ https://hindi.theprint.in/opinion/ambedkars-autobiography-is-not-taught-in-india-but-columbia-university/55760/
- ^ Pritchett, Frances. "Waiting for a Visa, by Dr. B. R. Ambedkar". www.columbia.edu. 2018-03-26 रोजी पाहिले.