"समुद्री प्रवाह" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
ओळ १३:
 
==प्रवाहांबद्दलची माहिती व परिणाम==
समुद्री प्रवाह हे अनंत काळापासून वाहत आलेले आहेत. या प्रवाहांतून त्याच दिशेने प्रवास करणार्‍या जहाजांना इंधन व वेळ कमी लागतात तर विरुद्ध दिशेने जाणार्‍या जहाजांना जास्त. म्हणून खलाशांनी समुद्री प्रवाहांचे ज्ञान पूर्वीपासून आत्मसात केलेले आहे. उलट दिशेने प्रवास करायचा झाल्यास खलाशी थोडेशी वाट बदलून एखादा प्रवाह पकडतात व वेळ वाचवतात. शिडाची गलबते असताना हे जास्त महत्वाचे होते. उदा. [[पोर्तुगाल|पोर्तुगीझ]] शोधकांना [[आफ्रिका|आफ्रिकेच्या]] किनार्‍यालगत सोसाट्याने दक्षिेणेकडेदक्षिणेकडे वाहणार्‍या [[अगुल्हास प्रवाह|अगुल्हास प्रवाहामुळे]] आफ्रिकेच्या पूर्व किनार्‍यालगत उत्तरेस येणे अवघड झाले व त्यामुळे त्यांचे भारतात आगमन होण्यास अनेक वर्षे जास्त लागली. हाच प्रवास आफ्रिकेचा किनारा सोडून किंचित पूर्वेकडून केला असता, किंवा अरबी समुद्राला काट मारून थेट पूर्वेकडे आले असता अनेक आठवड्यांचे वेळ वाचतो. [[डीझेल]] किंवा [[अणुशक्ती]]वर चालणारी जहाजे व पाणबुड्याही अशा प्रवाहांचा आजही उपयोग करतात.
 
समुद्री प्रवाहांमुळे पृथ्वीच्या विविध भागातील प्रजातींचे आवागमन होत राहते. [[समुद्री ईल]] व [[सामन]] माश्यांचे जीवन याचे उदाहरण आहेत.