"तुमसर तालुका" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
छोNo edit summary
इतरत्र सापडलेला मजकूर
ओळ १:
'''तुमसर''' हा [[भारत|भारताच्या]] [[महाराष्ट्र]] राज्यातील [[भंडारा जिल्हा|भंडारा जिल्ह्याचा]] एक तालुका आहे.
तुमसर हे नाव "तुम" या मासोळी वरून पडले आहे. ही मासोळी आधी इथे आढळत होती. हे शहर आधी "कुबेर नगरी" म्हणुन ओळखले जायचे. तुमसर ही [[तांदुळ|तांदळाची]] मोठी बाजारपेठ आहे आणि सुगंधीत तांदुळासाठी प्रसिद्ध आहे. या गावात एकूण २१ [[राइस मिल]] आहेत.त्यात धानापासुन तांदुळ तयार करतात."[[तुमसर रोड जंक्शन रेल्वे स्थानक|तुमसर रोड]]" हे [[नागपूर]] - [[कोलकाता]] या रेल्वे मार्गावर असलेले मुख्य [[रेल्वे स्थानक]] या शहरापासुन सुमारे ५ कि.मि. अंतरावर आहे.त्याशेजारीच असलेल्या "तुमसर टाऊन" रेल्वे स्थानकावरून रेल्वेमार्गाची शाखा [[तिरोडी]]स गेली आहे. या रेल्वेमार्गावरून तिरोडी, डोंगरी,चिखला मार्गे [[मध्यप्रदेश|मध्य प्रदेशातील]] [[कटंगी]] जवळ असलेल्या [[मॅंगेनिझ ओर ऑफ इंडिया]]च्या [[खाण|खाणींमधुन]] [[मॅंगेनिझ]] वाहतुक होते.
 
== गणपती ==
{{बदल}}
[[चित्र:तुमसरेश्वर गणपती.jpg|इवलेसे|'''तुमसरेश्वर महागणपती, तुमसर''']]
[[भंडारा जिल्हा|भंडारा जिल्ह्यातील]] [[तुमसर तालुका|तुमसर]] शहराचे भूषण असलेला तुमसरेश्वर महागणपती [[श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती|दगडूशेठ गणपती पुणे]] येथील पूर्णाकृती आहे. हा मंदिर मनोकामना पूर्ण करणारा आणि नवसाला पावणारा गणपती म्हणून प्रसिद्ध आहे. तुमसर शहरात सर्व देवी देवतांची मंदिरे आहेत. मात्र गणपतीचे स्वतंत्र असे मंदिर नव्हते ही उणीव भरून काढण्यासाठी गणेशाने बऱ्याचे लोकांना प्रेरणा दिली. पण ही प्रेरणा प्रत्यक्षात कुणाला साकार करता आली नाही. शेवटी तुमसर शहरातील धान्य व्यापारी स्व. श्यामकुमार अग्रवाल व काही धान्य व्यापारी आणि गणेश भक्तांकडून या मंदिराचे बांधकाम करण्यात आले. शहराच्या मध्यवर्ती भागात असलेली बारदारी म्हणजे जुना गंज बाजार, इंग्रज काळातील जुनी इमारत तत्कालीन नगर पालिकेने गणेश मंदिरासाठी दिली. व्यापारी एकत्र आले आणि २००० या वर्षी मंदिराला मूर्त स्वरूप प्राप्त झाले. पुण्याच्या दगडूशेठ गणपतीची प्रतिकृती असलेली संगमरवरी महागणपतीची प्रसन्न अशी महाकाय मुर्ती अंदाजे सव्वालाख रुपये खर्च करून जयपूरवरून आणण्यात आली. २६ फेब्रुवारी २००० मध्ये भगवान गणेशाच्या ५१ इंच उंच असलेल्या मुर्तीची विधीवत पूजापाठाने व मंत्रोपचाराने प्राणप्रतिष्ठा करण्यात आली. पुण्याच्या दगडूशेठ गणपती मंदिराचे प्रमुख पुजारी वसंतराव गाडगीळ आणि त्यांच्यासह मोठ्या संख्येने भक्तांच्या उपस्थितीत गणेशाची स्थापना करण्यात आली होती.  सिंहासनाधिष्ठित महागणपतीचा मुकुट सोन्याचा मुलामा चढवलेला आहे. मंदिर इमारतीवर कळस बांधण्यात आले. मंदिराची व्यवस्था सध्या काही व्यापारी मंडळी पाहत आहे. गेल्या २२ वर्षात जुन्या गंज बाजारातील महागणपतीची ख्याती एवढी वाढली की रोज दर्शनाला गर्दी असते. एक प्रकारे जत्रेचे स्वरूप असते. आता तर नवसाला पावणारा आणि मनोकामना पूर्ण करणारा म्हणून सदर मंदिर प्रसिद्ध आहे. [[गणेश चतुर्थी|गणेशोत्सव]] काळात दर्शनासाठी लांब रांगा लागत असतात. तुमसर, [[तिरोडा तालुका|तिरोडा]] व [[मोहाडी तालुका|मोहाडी]] तालुक्याचे ते आराध्य दैवत आहे.<ref>{{संकेतस्थळ स्रोत|url=https://hi-in.facebook.com/digitalbhandara|title=Digital Bhandara|website=hi-in.facebook.com|language=hi|access-date=2022-12-25}}</ref>
 
== बाह्य दुवे ==
* [https://www.lokmat.com/bhandara/historical-52-dari-vastu-bhuiyan-patta/ लोकमत]
 
{{भंडारा जिल्ह्यातील तालुके}}