छो
बदलांचा आढावा नाही
(हे सुद्धा पहा) |
छोNo edit summary खूणपताका: मोबाईल संपादन मोबाईल वेब संपादन प्रगत मोबाईल संपादन दृश्य संपादन |
||
{{बदल}}
बंजारा जमातीच्या समुदायासाठी गोरमाटी असाही एक शब्दप्रयोग केला जातो. अर्थातच गोरमाटी हा शब्दप्रयोग बंजारा बांधव आपल्या स्वकीयांसाठीच करताना दिसतात. तसेच बंजारा हा शब्द आपल्या भारतीयांना अपरिचित आहे असे मुळीच नाही. अनेक सिनेगीतातून, हिंदी काव्यरचना इत्यादींमधून 'बंजारा' या शब्दाचा उल्लेख विविध ठिकाणी आपणास सापडतो. 'बंजारा' लोकगणासाठी व्यापक अर्थाने गोरबंजारा असा शब्द प्रयोग होताना दिसतो .
आपल्या भारतात वेगवेगळ्या राज्यांत, भौगोलिक प्रदेशात बंजारा समाज हा 'बंजारा' 'गोर-बंजारा' 'गोरमाटी' 'लमाणी',
• बंजारा शब्दाचा अर्थ व उत्पत्ती :-
१. वाणिज्यकार :- ऋग्वेदात व्यापाराशी संबंध असणाऱ्या व्यक्तीस 'वाणिज्य' असे म्हटले आहे. इतिहासात डोकावून पाहिल्यास 'बंजारा' या शब्दाची उत्पत्ती 'वाणिज्य' या संस्कृत शब्दापासून झाली असल्याचे जाणकारांचे मत आहे.
गोर-बंजारा लोक पूर्वीच्या काळी कापडाचे तागे, अन्नधान्य, मीठ, मिरची व मसाल्यांचे पदार्थ, सैनिकांना रसद पुरविण्यासाठी अन्नधान्य इत्यादी पदार्थ पद्धतशीरपणे आपल्या बैलांच्या पाठीवर लादून भारतातील वेगवेगळ्या प्रांतात,वेगवेगळ्या ठिकाणी पोहोचवत असत व परत येताना नारळ, खजूर, केशर, यासारखा सुकामेवा व इतर जीवनावश्यक वस्तू आपल्या बैलांच्या पाठीवर लादून आणत असत. यालाच 'लदेणी' असे म्हणतात.
'वाणिज्य' या संस्कृत शब्दासाठी हिंदी भाषेत 'बनज' असा शब्द प्रयोग आढळतो. 'बनज' म्हणजे व्यापार करणाऱ्यांस 'बनिज' असे संबोधले जाई. पुढे 'बनिज' या शब्दावरून 'बंजारा' हा शब्द रूढ झाला असावा असा युक्तिवाद केला जातो.
२. बनचर :- 'बंजारा' हा लोकवाचक शब्द 'बनचर' या हिंदी शब्दावरून रूढ झाला असावा असाही तर्क वर्तविला जातो. व्यापाराच्या निमित्ताने 'रानोमाळ भटकंती करणारा' या अर्थाने बंजारा शब्दाचा उर्दू भाषेतील अर्थ सुद्धा विचारात घेण्यासारखा आहे, असे गोर- बंजारा संस्कृतीचे अभ्यासक आत्माराम राठोड, डॉ.सुभाष राठोड म्हणतात. '
बंजारा लोकगणाच्या संदर्भात एक बाब अशी दिसते की,
भारतीय गोर-बंजारा समाजगण हा एक आदिम समाजगण असून त्यांची लोकसंस्कृती ही तितकीच पुरातन व लौकिक असल्याचे दिसते. गोर बंजाराचा इतिहास हा त्याग, बलिदान, शौर्य व पराक्रम यांनी समृद्ध आहे. उपजतच कष्टाळू, मुलत:च सृजनशील असा हा समाजगण असून आपले सांस्कृतिक आविष्कार सण-उत्सव आदींच्या माध्यमातून व्यक्त करणारा, नाच-गाण्यात आनंद शोधणाऱ्या बंजारा समाजाने काशीदाकारी सारख्या अनेक कलाकुसरींची मनोभावे जपणूक केली आहे.
|