"य.ना. टिपणीस" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
इतरत्र सापडलेला मजकूर
दुवे
ओळ ७:
अप्पांचे जन्मस्थळ कोकणातळे महाड असून त्यांचे बालपण तेथेच गेले. विद्यार्थी असताना त्यांनी काही मित्रांसह हौसेखातर काही नाटके केली.
 
शालेय जीवनात नाटके करतांकरतां एक [[नाट्यसंस्था]]च उभारण्याचा प्रयत्न केला.. [[ज्ञानप्रकाश (वृत्तपत्र)|ज्ञानप्रकाश]]चे काही काळ संपादक असलेले, आणि पुढे [[एलफिन्स्टन काॅलेज]]मध्ये प्राध्यापक झालेले गोविंदराव टिपणीस आणि मामा सुळे यांची त्यांनी मदत घेतली. गोविंदराव टिपणीस [[पुणे|पुण्याला]] गेले आणि त्यांनी लागणाऱ्या सामानाची जुळवाजुळव केली. [[फर्गुसन काॅलेज|फर्ग्युसन काॅलेजात]] प्राध्यापक असलेले भानू यांचेही साहाय्य त्यांना मिळाले. या सर्वांनी सन १९०४मध्ये [[महाराष्ट्र नाटक कंपनी]]ची स्थापना केली. अप्पा टिपणीस या नाटक कंपनीचे चालक झाले.
 
या नाट्यसंस्थेने सुरुवातीलाच 'शाहू नगरवासींनी केलेले, आणि पुढे लेखकाशी मतभेद झाल्याने व अन्य काही कारणाने बंद केलेल्या, [[कृ.प. खाडिलकर]] यांच्या 'कांचनगडची मोहिनी' या नाटकाने सुरुवात केली. अप्पा टिपणीस नायकाच्या भूमिकेत होते आणि त्यांचे बंधू माधवराव मॊहिनेची भूमिका करत होते. या नाटकच्या तालमी चालू असताना [[गॊविंद बल्लाळ देवल]] तेथे आले, दोन अंकांपर्यंत ते कसेबसे तालीम पहायला बसले आणि उठून गेले. जाताना ते प्रा.भानूंना म्हणाले, 'उगाचच तुम्ही या मंडळींसाठी तुमचा वेळ फुकट दवडत आहांत. हे नाटक चालणे शक्य नाही.' त्यानंतर मुंबईला येऊन [[गोविंद बल्लाळ देवल|देवलांनी]] या नाटकाचा पूर्ण प्रयोग पाहिला आणि ते म्हणाले, 'मी माझे पहिले मत परत घेतो. नटमंडळींनी प्रयोग फारच छान वसवला आहे.'{{संदर्भ हवा}} संस्थेचे 'कांचनगडची मोहना' खूप छान चालले.