"सरोजिनी बाबर" च्या विविध आवृत्यांमधील फरक

१३,१४५ बाइट्स वगळले ,  १ वर्षापूर्वी
छो
नंदकुमार माेरे (चर्चा) यांनी केलेले बदल TivenBot यांच्या आवृत्तीकडे पूर्वपदास नेले.
खूणपताका: संदर्भा विना भला मोठा मजकुर ! कृ. कॉपीराईट उल्लंघने शोधून वगळण्या करतासुद्धा तपासावा.
छो (नंदकुमार माेरे (चर्चा) यांनी केलेले बदल TivenBot यांच्या आवृत्तीकडे पूर्वपदास नेले.)
खूणपताका: उलटविले
 
महाराष्ट्र राज्याचे शिक्षणमंत्री बाळासाहेब देसाई यांनी यशवंतराव चव्हाणांच्या सल्ल्याने सुरू केलेल्या महाराष्ट्र राज्य लोकसाहित्य समितीवर सरोजिनी बाबर यांनी सभासद म्हणून काम केले. सुरुवातीला श्री [[चिं.ग. कर्वे]] अध्यक्ष होते. त्यानंतर डॉ.सरोजिनी बाबर यांची या समितीच्या अध्यक्षपदी नेमणूक झाली. हे काम त्यांच्या अतिशय आवडीचे आणि जबाबदारीचे होते. लोकसाहित्य, लोककला आणि एकूणच लोकजीवनाच्या अभ्यासाचे क्षितिज आणखी विस्तारले. समितीने महाराष्ट्राच्या निरनिराळ्या भागातल्या लोक वाङ्मयाचा खूप मोठा संग्रह केला. यात ओव्या, गीते, कथा, कहाण्या, म्हणी, खेळगाणी, उखाणे मोठ्या प्रमाणात समाविष्ट आहेत. महाराष्ट्रातील देवधर्माची, सण-उत्सवांची, रीतीरिवाजांची, अनेक कलांची माहिती आहे.
 
 
डॉ.सरोजिनी बाबर यांची ‘समाज शिक्षण माला'
 
 
 
लोकसाहित्याच्या संशोधिका व ज्येष्ठ साहित्यिक डॉ. सरोजिनी बाबर यांचे सध्या जन्मशताब्दी वर्ष सुरू आहे. या निमित्त त्यांनी 46 वर्षे मोठ्या ध्येयनिष्ठेने व एकहाती चालविलेल्या "समाजशिक्षणमाला' या मासिकाचा परिचय करून देणारा हा विशेष लेख...
 
कृ.भा.बाबर हे विसाव्या शतकातील एक समाजसुधारक, शिक्षक, शिक्षणतज्ज्ञ, लेखक, संपादक असे चतुरस्त्र व्यक्तिमत्व होते. त्यांच्या विद्यार्थ्यांनी भेट म्हणून दिलेले साडेचार हजार रूपये व पदरचे पाचशे रूपये अशा पाच हजार रूपयांच्या भांडवलावर त्यांनी ‘समाज शिक्षण माला’ हे मासिक 20 ऑक्टोंबर 1950 रोजी सुरू केले. सर्वसामान्यांना लेखनवाचनाची गोडी लागावी आणि सर्व प्रकारचे ज्ञान त्यांना सोप्या भाषेत उपलब्ध करून देता यावे, या हेतूने "माले'चा प्रारंभ झाला. ‘माले’च्या पहिल्या अंकापासून ते 550 व्या अंकापर्यंत डॉ.सरोजिनी बाबर यांनी संपादिका म्हणून काम केले. प्रत्येक महिन्याच्या 20 तारखेला अंक प्रकाशित होत असे. "माले'तील सर्वात छोटे पुस्तक 26 पानांचे आहे. तर सर्वाधिक पृष्ठांचा अंक 184 पानांचा आहे. प्रत्येक अंकामध्ये एका लेखकाने एका विषयावर लेखन केले आहे. प्रत्येक अंकामध्ये लेखाविषयी संपादकीय आहे. ‘इकडे तिकडे’ हे सदर बातम्यांच्या स्वरूपात आहे. 340 व्या अंकापासून ‘मननीय विचार’, ‘वाचण्याजोगे थोडेसे’ ही सदरे चालू झाली. मालेची वार्षिक वर्गणी प्रारंभी रू.3.50 होती. मुखपृष्ठावरील व आंतील चित्रे आकर्षक आहेत. ‘माले’च्या आर्थिक व्यवस्थापनाची परिस्थिती कठिण होत गेल्यामुळे 20 जुलै 1996 च्या अखेरच्या अंकानंतर "समाज शिक्षण माला' बंद करण्यात आली.
 
"माले'मध्ये मराठीतील अनेक मान्यवर लेखक, संशोधक, कलावंत तसेच नवोदित अभ्यासकांनी लिहिले आहे. कृ.भा.बाबर(99 पुस्तके ), डॉ.सरोजिनी बाबर (87 पुस्तके ), कुमुदिनी पवार (18 पुस्तके ), शरदिनी मोहिते (51 पुस्तके) यांनी अखंड लेखन केले. ग.ल.ठोकळ, नामदेव व्हटकर, म.म.द.वा.पोतदार, डॉ.सुमती क्षेत्रमाडे, बा.भ.बोरकर, दुर्गा भागवत, डॉ.आप्पासाहेब पवार, रियासतकार गो.स.सरदेसाई, कुमुदिनी रांगणेकर, व्यंकटेश माडगूळकर, ताराबाई मोडक, डॉ.द.वि. केळकर, वि.द.घाटे, शंकर पाटील, शांताबाई जोशी, नरूभाऊ लिमये, ब.मो. पुरंदरे, सेतू माधवराव पगडी, कमलाबाई टिळक, इंदिरा संत, वामनराव चोरघडे, आनंदीबाई शिर्के, बापू वाटवे, शरश्चंद्र गोखले, द.म.सुतार यांसारख्या लेखकांनी लेखन केले आहे.
 
सण, उत्सव, चिंतन, धर्मकारण, राजकारण, पुरातत्व, लोकसंस्कृती, लोकपरंपरा, इतिहास, शेती, प्राणीजीवन, खगोलशास्त्र, अंतराळ विज्ञान, वैज्ञानिक प्रगती, भूगोल, वाङ्मय, आठवणी व अनुभव, कथन, प्रवास वर्णने, शिक्षण, भाषा, व्यक्तिविशेष, चित्रकला, अलंकार, वस्त्रोद्योग, खेळ, संगीत, कला, नागरी संरक्षण, मूलभूत हक्क, आरोग्य, आहार, औषधे, भूजल, निसर्ग, सृष्टी, पर्यावरण, पत्रकारिता, अपंग, अंध:श्रध्दा निर्मूलन, तत्वज्ञान, बालसंगोपन वगैरे विषयांवर "माले'मध्ये विपुल लेखन झालेले आहे. समाजातील सर्व स्तरांतील वाचकांचे मानसिक व बौध्दीक भरणपोषण "माले'ने केले. विषयांचे वैविध्य, मांडणीचे सूत्रबध्द स्वरूप, व्यासंग, आकलनसुलभता, कलात्मकता, भाषाशैली यांसारख्या गुणवैशिष्ट्यांमुळे मराठी साहित्यामध्ये "माले'ने मोठी भर घातलेली आहे.
 
"माले'ने लोकशिक्षणाचा वसा घेऊन वाटचाल केली. सामान्य वाचक डोळ्यांसमोर ठेवून दरवेळी एका विषयावर त्या क्षेत्रातील जाणत्या लेखकांकडून साध्या सोप्या भाषेमध्ये जाणीवपूर्वक लिहून घेतले. सामान्य लोकांच्या बोलीशी संवादी अशी घरगुती वळणाची सर्वजनसुलभ भाषा हे मालेचे वैशिष्ठ्य होते. "माले'ने बहुजन समाजामध्ये वाङ्मयीन अभिरूची निर्माण करण्याचे मोलाचे कार्य केले. "माले'नेकेवळ प्रौढांचेच नाही तर सर्व अबाल वृध्द, नवशिक्षित, सुशिक्षितांचे ज्ञानसंवर्धन केले. ग्रामीण जीवनाची साहित्यिक अभिरूची घडविणे, वाढविणे, टिकविणे आणि सांस्कृतिक जीवनाला आधार प्राप्त करून देणे या उद्दिष्टांची पूर्ती या "माले'तून झाली. मालेचे ध्येयधोरण लोकांच्या पसंतीला उतरले. मालेच्या पुस्तकांनी सामान्य शेतकर्‍यांपासून विद्यापीठाच्या पदवीधरांपर्यंत सर्वांना मोहवून टाकले. मालेची पुस्तके वाचून अनेकजण लेखनास प्रवृत्त झाले, ही "माले'ची मोठी उपलब्धी आहे.
 
एका निखळ उद्देशाने चालविलेली आणि सातत्य टिकविलेली ही एकमेव माला म्हणता येईल. खेड्यापाड्यातील सामान्य माणसांच्या दारात मालेने ज्ञानाची पाणपोई उघडली. ज्ञानाची तहान भागवत आणि खुलवत नेण्याची किमया "माले'ने जनसामान्यांसाठी करून दाखविली. मालेची खूप वैशिष्ट्ये सांगता येतील. त्यात मुख्य आहे दीर्घकाळ चालविलेला ध्येयवाद. त्यासाठीचे कष्ट. डॉ. यु. म. पठाण ‘माले’संदर्भात म्हणतात, “समाजशिक्षणमालेची शेकडो छोटी छोटी पुस्तके प्रसिद्ध झाली आहेत. त्यातले विविध विषय अनेकविध आहेत. इतिहास, विज्ञान, धर्म, अर्थ, राजकारण, साहित्य, कला इत्यादी जीवनाच्या किती तरी अंगांना स्पर्शून जाणारे विषय समाजशिक्षणमालेने निवडले. मालेचा वाचकवर्ग सर्वसाधारण समाज आहे. त्याला साक्षर करायचं, त्याला सुसंस्कृत करायचं, त्याचं उद्बोधन करायचं, जीवनाच्या अनेक पैलूंचा परिचय त्याला करून द्यायचा, सुविचारांचा त्यावर ठसा उमटवायचा आणि अशा प्रकारे जनसामान्यांच्या उन्नतीसाठी झटायचं हा समाजशिक्षणमालेचा निर्मितीहेतू. यासाठी अण्णा नि अक्काताई यांनी आपली हयात वेचली. आपलं आयुष्य समर्पित केलं. याबद्दल मराठी मन त्यांचेबद्दल कृतज्ञताच प्रकट करील.”
 
"माले' ने प्रौढ व ग्रामीण वाचक डोळ्यांसमोर ठेवून, अत्यंत सुबोध भाषेत वाङ्मयीन अभिरूची निर्माण करण्याचे कार्य करून आपले ‘समाज शिक्षण माला’ हे नाव सार्थ केले. मराठी वाचकांची वाङ्मयीन अभिरूची विकसित करण्यात व मराठी संस्कृतीची अभिवृध्दी करण्यात मालेचे अनन्यसाधारण योगदान आहे. स्वातंत्र्यानंतरच्या पहिल्या अर्धशतकामध्ये महाराष्ट्राची सामाजिक, सांस्कृतिक, वैचारिक व वाङ्मयीन जडणघडण होत गेली. यामध्ये "समाज शिक्षण माले'चाही मोठा हातभार लागला आहे.
 
==सरोजिनी बाबर यांचे स्नेहीमंडळ==