"सुसान लँगर" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
103.21.125.77 (चर्चा)यांची आवृत्ती 1574636 परतवली.
खूणपताका: उलटविले
No edit summary
ओळ १:
'''सुसान लँगर''' ह्यांचा जन्म २० डिसेंबर १८९५ रोजी झाला. आणि त्यांचा मृत्यू १७ जुलै १९८५ रोजी झाला. त्या अमेरिकन तत्त्वज्ञ लेखिका होत्या.त्यांनी भाषिक विश्लेषण व सौंदर्यशास्त्र या विषयांत मौलिक विचारांची भर घातली होती.त्यांचा जन्म न्यूयॉर्क शहरातला होता. .त्यांचं बी.ए च शिक्षण रॅडक्लिफ कॉलेजमध्ये १९२० साली झाले आणि हार्व्हर्ड विद्यापीठातून तत्त्वज्ञानामध्ये त्यांची  पीएच्.डी १९२६ साली झाली.त्या १९२७ ते १९४२ साली  रॅडक्लिफ कॉलेजमध्ये तत्त्वज्ञान विषयाच्या पाठनिर्देशिका होत्या.आणि १९४५ ते १९५० साली कोलंबिया विद्यापीठात तत्त्वज्ञानाच्या अधिव्याख्यात्या होत्या.ते १९५४ ते १९६१ तसेय कनेक्टिकट कॉलेजात तत्त्वज्ञानाच्या प्राध्यापिका होत्या आणि १९६१ साली  नंतर  ते गुणश्री प्राध्यापिका होत्या. १९६२ साली मध्ये ते  सेवानिवृत्ती होत्या.त्यांचा विवाह १९२१ मध्ये विल्यम एल्. लँगर या इतिहासकाराशी झाला   आणि १९४२ मध्ये त्यांचा  घटस्फोट झाला . आणि  ओल्ड लाइम, कनेक्टिकट येथे  त्यांचे निधन झाले .फिलॉसफी इन अ न्यू की (१९४२), फीलिंग अँड फॉर्म (१९५३), प्रॉब्लेम्स ऑफ आर्ट (१९५०) ही त्यांची महत्त्वाची पुस्तके आहेत.ब्रिटिश तत्त्वज्ञ ॲल्फ्रेड नॉर्थ व्हाइटहेड व जर्मन तत्त्वज्ञ एर्न्स्ट कासीरर यांचा त्यांच्यावर प्रभाव होता.माइंड : ॲन एसे ऑन ह्यूमन फीलिंग, तीन खंड (१९६७, १९७२ व १९८२) या ग्रंथात मानवी मनाचा उगम व विकास यासंबंधीचे विवेचन आहे.लँगर यांचे तत्त्वज्ञानात्मक लिखाण मुख्यतः प्रतीकांविषयी (सिंबल्स) आहे.सुसान लँगर म्हणतात आपण आपले विचार मांडण्यासाठी किंवा भावना व्यक्त करण्यासाठी जी नेहमीची भाषा वापरतो, ती प्रतीकांची बनलेली असते.प्रतीक (सिंबल) आणि खूण (साइन) ह्यांत लँगर भेद करतात.ते म्हणतात जेथे धूर असतो तेथे विस्तव असतो असे मला वारंवार आढळून आले,तर माझ्यासाठी धूर ही विस्तवाची खूण बनते. येथे धूर आहे तेव्हा येथे विस्तव असला पाहिजे, असा तर्क मी करतो. पण ‘धूर’ हा शब्द आणि धूर ही वस्तू यांच्यामधील संबंध असा कार्यकारणात्मक किंवा भौतिक साहचर्याचा नाही.
 
[[वर्ग:इंग्लिश लेखक]]