"रुक्मिणीदेवी अरुंडेल" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
इतरत्र सापडलेला मजकूर
वर्ग
ओळ १:
रुक्मिणीदेवी अ‍ॅरंडेल भरतनाट्यम् या प्रकारातील एक श्रेष्ठ भारतीय नर्तिका होत्या. दुराई येथे जन्म झाला होता. डॉ. जॉर्ज अ‍ॅरंडेल ह्या ब्रिटिश व्यक्तीशी त्यांनी १९२० मध्ये विवाह केला होता. त्यांनी १९२४ मध्ये पहिल्यांदाच परदेशगमन केले होते. रुक्मिणीदेवींना नृत्याची प्रेरणा आणि पाव्हलॉव्ह ह्या रशियन नर्तिकेकडून लाभली होती. तिच्याकडून त्यांनी पाश्चात्त्य बॅले नृत्याचे शिक्षण घेतले होते. नंतर मीनाक्षिसुंदरम् पिळ्ळै ह्यांच्या मार्गदर्शनाखाली भरतनाट्यम्‌चे अध्ययन केले होते. भरतनाट्यम्‌च्या पुनरुज्जीवनात रुक्मिणीदेवींचा मोठाच हातभार होता. त्यांनी खेडोपाडी जाऊन अनेक नृत्यशिक्षकांकडून या नृत्यप्रकारासंबंधी माहिती गोळा केली. ज्या काळी समाजात नृत्यास प्रतिष्ठा नव्हती त्या काळी त्यांच्यासारख्या सुसंस्कृत उच्च कुटुंबातील स्त्रीने त्या क्षेत्रात पदार्पण करावे, ही घटनाच अपूर्व होती.
 
{{DEFAULTSORT:अरुंडेल, रुक्मिणीदेवी}}
[[वर्ग:भरतनाट्यम नर्तक]]
[[वर्ग:स्त्री चरित्रलेख]]