"लवंग" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
बांधणी
इतरत्र सापडलेला मजकूर
ओळ १:
[[चित्र:ClovesDried.jpg|right|thumb|180px|लवंग]]
'''लवंग''' ही भारतात तसेच आग्नेय [[आशिया]]त उगवणारी एक आयुर्वेदीक औषधी वनस्पती आहे. याचे बी [[विडयाचे पान|विडयाचे पानातील]] एक घटक आहे.
 
==वर्णन==
लवंगाचे झाड नेहमी हिरव्यागार पानांनी भरलेले सदाहरित असते. उंची १२-१३ मीटर असते. खोडाची साल पिवळट, धुरकट, तसेच कोवळी असते. या झाडाचे बुंध्याला चारही बाजूला कोवळ्या व खाली वाकणाऱ्या फांद्या असतात. याची पाने मोठी व अंडाकार असतात. लवंगाचे फुल निळसर तांबडे असते. तेच वाळून लवंग म्हणून बाजारात आणतात. याला साधारण नऊ वर्षांनी फुले येतात.
 
==औषधी उपयोग==
डोके दुखत असल्यास लवंगाचा लेप लावतात. मुखरोगात लवंग तोंडात धरून चघळावी. दम, खोकला, आम्लपित्त यांवर लवंगाचा उपयोग होतो. खोकला व सर्दी यांवर लवंगाचा काढा करून त्यात मध घालून दयावा. कप मोकळा होतो. लवंगापासून लवंगादी वटी , लवंगोदक, लवंगादी चूर्ण, अविपत्तिकर चूर्ण ही औषधे बनवतात.
 
{{विस्तार}}
"https://mr.wikipedia.org/wiki/लवंग" पासून हुडकले