"सूर्यमाला" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
(चर्चा | योगदान)
ओळ २६:
 
सूर्यमालेतील अंतरे मोजताना [[खगोलशास्त्रज्ञ]] साधारणपणे [[खगोलीय एकक]] (Astronomical Unit or AU) हे एकक वापरतात. एक खगोलीय एकक म्हणजे सूर्य व पृथ्वी यांच्यातील सरासरी अंतर. हे अंतर जवळ जवळ १४,९५,९८,००० कि.मी. (९,३०,००,००० मैल) इतके आहे. याप्रमाणे गुरु ग्रहाचे सूर्यापासून अंतर सुमारे ५.२ AU आहे तर प्लुटोचे सुमारे ३८ AU इतके आहे. अंतरे मोजण्याचे दुसरे परिमाण म्हणजे [[प्रकाशवर्ष]]. एक प्रकाशवर्ष म्हणजे सुमारे ६३,२४० खगोलीय एकके इतके अंतर.
 
==वारांची नावे==
आठवड्याच्या वार सात आहेत. जगात सर्वत्र वारांची नावे सारखीच आहेत आणि ती भारतातील प्राचीन भारतीय ज्योतिर्वैज्ञानिकांनी दिली आहेत. त्यासाठी त्यांनी सूर्य आणि चंद्र यांनाही ग्रह मानले आहे.
 
'''उदयात उदयं वारः !!'''
 
भारतीय ज्योतिर्वैज्ञानिकांच्या दृष्टीने एका सूर्योदयापासून दुसऱ्या सूर्यॊदयापर्यंतच्या काळाला वार म्हणतात.
 
आर्यभट्टांचे सूत्र आहे :
 
'''आ मंदात् शीघ्रपर्यंतम् होरेशा: !!'''
 
दिवसाचे होरे २४ असतात. होरा म्हणजे तास. प्रत्येक होरा एका एका ग्रहाचा असतो. सूर्योदयाच्या वेळेस ज्या ग्रहाचा होरा असतो त्याचे नाव त्या दिवशीच्या वारास दिलेले असते.
 
वरील सूत्राचा अर्थ असा की, आ मंदात्... म्हणजे मंदगतीच्या ग्रहापासून ....शीघ्रपर्यंतम्....शीघ्रगतीच्या ग्रहापर्यंत... होरेशा:... होरे सुरू असतात.
 
मंदग्रह ते शीघ्र ग्रह असे आहेत -- शनी, गुरू, मंगळ , रवि, शुक्र, बुध, चंद्र.
 
शनिवारी पहिला होरा (एक तास) शनीचा, दुसरा गुरूचा, तिसरा मंगळाचा, चवथा रविचा, पाचवा शुक्राचा, सहावा बुधाचा, सातवा चंद्राचा. याप्रमाणे तीन वेळा २१ होरे झाल्यावर २२वा पुन्हा शनीचा, २३वा गुरूचा, २४वा मंगळाचा.....
 
इथे २४ तास पूर्ण झाले.
 
आता दुसरा दिवस सुरू होतो तो पुढील म्हणजे रविच्या होऱ्याने. म्हणून शनिवारनंतर रविवार येतो.
 
थोडक्यात असे की, शनी, गुरू, मंगळ , रवि, शुक्र, बुध, चंद्र. या क्रमात कोणात्याही वाराच्या ग्रह नावापासून सुरुवात केल्यावर तिसरे नाव पुढच्या वाराचे असते. असे केले की, शनी-रवि-चंद्र(सोम)-मंगळ-बुध-गुरू-शुक्र हा क्रम येतो. यावरून हेही सिद्ध होते की भारतीय ज्योतिर्वैज्ञानिकांना ग्रहांना आकाशातील भ्रमणासाठी लागणाऱ्या काळाचे ज्ञान होते.
 
== रचना ==