"हरीश चंद्र" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
नवीन पान: (११ ऑक्टोबर १९२३–१६ ऑक्टोबर १९८३). भारतीय गणितज्ञ. संपूर्ण नाव हर...
खूणपताका: कृ. कॉपीराईट उल्लंघने शोधून वगळण्या करतासुद्धा तपासावा. दृश्य संपादन संदर्भा विना भला मोठा मजकुर !
 
प्रस्तावना
ओळ १:
'''हरीश-चंद्र चंद्रकिशोर मेहरोत्रा''' ([[११ ऑक्टोबर]], [[इ.स. १९२३|१९२३]]:कानपूर, उत्तर प्रदेश, भारत – [[१६ ऑक्टोबर]], [[इ.स. १९८३|१९८३]]:[[प्रिन्सटन, न्यू जर्सी]], [[अमेरिकेची संयुक्त संस्थाने|अमेरिका]]) हे भारतीय गणितज्ञ होते.
(११ ऑक्टोबर १९२३–१६ ऑक्टोबर १९८३). भारतीय गणितज्ञ. संपूर्ण नाव हरीश-चंद्र चंद्रकिशोर मेहरोत्रा.
 
गणित-शास्त्राच्या वाटचालीत  श्रीनिवास अय्यंगार रामानुजन यांच्यानंतर हरीश-चंद्र यांचेच नाव घेतले जाते. हरीश-चंद्र यांनी प्रथम भौतिकीत आपला भक्कम ठसा उमटविला आणि नंतर ते चांगले गणितज्ञ म्हणूनही प्रसिद्ध झाले. 
 
{{बदल}}
हरीश-चंद्र यांचा जन्म कानपूर येथे झाला. त्यांच्या प्राथमिक शिक्षणाची व्यवस्था घरी शिक्षक नेमून करण्यात आली होती. तसेच संगीतशिक्षक व नृत्यशिक्षकही  त्यांना शिकवायला घरी येत. कानपूर येथील ख्राइस्ट चर्च हायस्कूलमध्ये चौदाव्या वर्षी त्यांचे शालेय शिक्षण पूर्ण झाले. कानपूर येथेच वयाच्या सोळाव्या वर्षी त्यांनी इंटरमीजीएटचे शिक्षण पूर्ण केले. त्यानंतर त्यांनी अलाहाबाद विद्यापीठात प्रवेश घेतला. केंब्रिज (इंग्लंड) येथील सुविख्यात भौतिकीविज्ञ पॉल एड्रिएन मॉरिस डिरॅक यांचा विद्यापीठाच्या ग्रंथालयात असलेला प्रिन्सिपल्स ऑफ क्वाँटम मेकॅनिक्स हा ग्रंथ हरीश-चंद्र यांनी वाचला आणि सैद्धांतिक भौतिकीचा अभ्यास करण्याची स्फूर्ती त्यांना मिळाली. त्यांनी १९४१ मध्ये बी.एस्सी. व १९४३ मध्ये एम्.एस्सी या पदव्या प्राप्त केल्या. त्यानंतर १९४३–४५ या कालावधीत त्यांनी बंगळुरू येथील इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ सायन्स येथे पदव्युत्तर संशोधन सदस्य म्हणून होमी जहांगीरभाभा यांच्या मार्गदर्शनाखाली काम केले. या काळात भाभा व हरीश-चंद्र यांनी संयुक्तपणे डिरॅक यांच्या काही संशोधन काऱ्याचा विस्तार करून शोधनिबंध प्रसिद्ध केले. त्यावेळी हरीश-चंद्र यांचे स्वतःचे शोधनिबंधही प्रसिद्ध होत होतेच. अलाहाबाद विद्यापीठातील प्राध्यापक सर कार्यमाणिक्कम श्रीनिवास कृष्णन आणि भाभा यांनी हरीश-चंद्रांचीशिफारस डिरॅक यांच्याकडे केल्याने ते केंब्रिजला गेले (१९४५–४७). ‘इनफिनाइट इर्रिड्यूसिबल रिप्रेझेंटेशन ऑफ द लॉरेन्ट्स ग्रूप’ या शीर्षकाचा प्रबंध लिहून त्यांनी केंब्रिज विद्यापीठाची पीएच्.डी पदवी संपादन केली (१९४७).
 
Line १७ ⟶ १६:
हरिश-चंद्र यांचे हृदयविकाराच्या झटक्याने प्रिन्स्टन येथे निधन झाले. 
 
[[वर्ग:भारतीय गणितज्ञ]]
टिकेकर, व. ग.
[[वर्ग:इ.स. १९२३ मधील जन्म]]
[[वर्ग:इ.स. १९८३ मधील मृत्यू]]