"दादा चांदेकर" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
बांधणी, दुवे
(चर्चा | योगदान)
No edit summary
ओळ १:
'''शंकर विष्णु''' उर्फ '''दादा चांदेकर''' ([[१९ मार्च]], [[इ.स. १८९७]]:[[कोल्हापूर]], [[महाराष्ट्र]] - [[२७ जानेवारी]], [[इ.स. १९७६]]:[[पुणे]], महाराष्ट्र) एक मराठी संगीत दिग्दर्शक होते.
 
त्यांचे वडील [[मिरज संस्थान|मिरजेच्या राजेसाहेबांकडे]] संगीतकार म्हणून नोकरीस होते. दादा चांदेदरचांदेकर वडिलांकडून पेटीवादन शिकले. पुढे त्यांनी मिरजेतील संगीतशिक्षक [[नीलकंठबुवा जंगम]] यांचेकडून संगीतशिक्षण घेतले. चांदेकर वयाच्या बाराव्या वर्षीच कीर्तनात साथ देऊ लागले. १९१४ मध्ये त्यांनी [[किर्लोस्कर संगीत मंडळी|किर्लोस्कर कंपनीत]] प्रवेश केला. त्यानंतर [[बलवंत संगीत मंडळी]], [[विश्वनाथ संगीत मंडळी]], इ. नाट्यसंस्थांत त्यांनी साथीदार म्हणून उत्कृष्ट कार्य केले. ते १५ वर्षे नाट्यसृष्टीत होते. त्यांनी चाळिसांहून अधिक चित्रपटांना संगीत दिले.
 
१९३१ नंतर चांदेकरांनी [[सातारा|सातार्‍याला]] संगीतशिक्षक म्हणून २-३ वर्षे शिकविण्या केल्या. नंतर कोल्हापूर सिनेटोनमध्ये त्यांची ऑर्गनिस्ट म्हणून नियुक्ती झाली. [[हंस पिक्चर्स]]च्या [[मास्टर विनायक|मा. विनायक]]दिग्दर्शित [[ब्रम्हचारी (मराठी चित्रपट)|ब्रम्हचारी]] या यशस्वी चित्रपटातील चांदेकरांची सर्व गाणी लोकप्रिय झाली. ''यमुना जळी खेळू खेळ कन्हैय्या'' हे मीनाक्षीने गायिलेले गाणे विशेष प्रसिद्ध झाले. [[जयमल्हार (मराठी चित्रपट)|जयमल्हार]] या मराठी चित्रपटसृष्टीतील पहिल्या लावणीप्रधान संगीत चांदेकरांचे होते.