"बेकारी" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
दुवा
No edit summary
ओळ १५:
 
== बेकारीचे प्रकार ==
==== १. ग्रामीण बेकारी ====
ही बेकारी प्रामुख्याने ग्रामीण भागात दिसून येते. ही एक गंभीर स्वरूपाची समस्या आहे. या मध्ये खालील प्रकार येतात. 
===== अ) हंगामी बेकारी =====
[[भारत|भारतात]] बहुतेक शेतकरी लागवडी साठी पावसावर अवलंबून असतात. त्यामुळे वर्षातून एकदाच पीक घेता येते . 
 
===== अ) हंगामी बेकारी =====
[[भारत|भारतात]] बहुतेक शेतकरी लागवडी साठी पावसावर अवलंबून असतात. त्यामुळे वर्षातून एकदाच पीक घेता येते.यामुळे ग्रामीण शेतमजुरांना केवळ ४ ते ५ महिनेच काम प्राप्त होते व उर्वरित काळ ते बेकार राहतात म्हणून या प्रकाराला हंगामी बेकारी म्हणतात. ही बेकारी शहरी भागात सुद्धा आढळते. उदा. पर्यटन क्षेत्रातील मार्गदर्शक , लग्नसमारंभातील वादक.
 
===== ब) प्रच्छन्न बेकारी (छुपी) =====
अति [[लोकसंख्या|लोकसंख्येच्या]] अविकसित आणि विकसनशील देशांमध्ये प्रच्छन्न बेकारी ही एक मूलभूत स्वरूपाची समस्या आहे. या प्रकारच्या बेकरीत ज्या ठिकाणी काम करण्यासाठी कमी लोकांची गरज आहे तिथे गरजेपेक्षा जास्त लोक काम करतात तेव्हा अतिरिक्त श्रमिकांची सीमान्त उत्पादकता शुन्य राहते म्हणजेच अतिरिक्त लोक उत्पादनात कोणतीही भर टाकत नाही व छुपी बेकारी निर्माण होते. उदा. एका कारखान्यात उत्पादन प्रकियेसाठी केवळ २० कामगारांची गरज असताना तेथे २५ कामगारांनी काम करणे . येथे अतिरिक्त ५ कामगार हे छुपे बेकार ठरतील व ते उत्पादनात कोणतीही भर टाकत नाही. 
 
=== २. शहरी बेकारी ===
जी बेकारी शहरी भागांमध्ये आढळून येते तिला शहरी बेकारी म्हणतात. याचे खालील प्रकार आहेत. 
 
==== अ) सुशिक्षित बेकारी ====
'ज्या व्यक्तीने शिक्षण घेतले आहे आणि त्याची काम करण्याची इच्छा व पात्रता असूनही काम मिळत नसेल, अशा स्थितीला सुशिक्षित बेकारी असे म्हणतात. ही बेकारी दहावी ,बारावी पास झालेले, पदवीपूर्व, पदवीधर, पदव्युत्तर शिक्षण घेतलेले या लोकांमध्ये आढळून येते
 
==== ब) तांत्रिक बेकारी ====
[[वर्ग:अर्थशास्त्र]]
"https://mr.wikipedia.org/wiki/बेकारी" पासून हुडकले