"महाराष्ट्र एज्युकेशन सोसायटी" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
दुवे, बांधणी
दुवे
ओळ १:
'''महाराष्ट्र एज्युकेशन सोसायटी''' (एमईएस) ही [[पुणे|पुण्यातील]] बालवर्गापासून ते पदव्युत्तरपर्यंतचे शिक्षण देणारी एक संस्था आहे. याची सुरुवात महागावकर नावाच्या पुण्यात खासगी शिक्षणवर्ग चालविणाऱ्या शिक्षकापासून झाली. त्यांच्या पश्चात बापू भाजेकर यांनी हे वर्ग चालविले. या खासगी वर्गांचे [[इ.स. १८६०]] साली [[वामन प्रभाकर भावे]], [[वासुदेव बळवंत फडके]] आणि [[लक्ष्मण नरहर इंदापूरकर]] यांनी ''पूना नेटिव्ह इन्स्टिट्यूशन''मध्ये रूपांतर केले. महान क्रांतिकारक [[वासुदेव बळवंत फडके]] हे संस्थेचे पहिले सचिव आणि खजिनदार होते. ''पूना नेटिव्ह इन्स्टिट्यूशन''चे रुपांतर पुढे महाराष्ट्र एज्युकेशन सोसायटीमध्ये झाले. ही संस्था पुण्यात मुलांचे [[भावे स्कूल]], मुलींचे भावे स्कूल ([[रेणुका स्वरूप मेमोरिअल हायस्कूल]]), बालशिक्षण मंदिर, इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेन्ट, आणि एमईएस कॉलेज ऊर्फ [[आबासाहेब गरवारे आर्ट्‌स-सायन्स कॉलेज]] आणि [[गरवारे कॉमर्स कॉलेज]] चालवते.
 
महाराष्ट्र एज्युकेशन सोसायटीच्या पुण्याव्यतिरिक्त [[अहमदनगर]], [[कळंबोली]], [[पनवेल]], [[बारामती]], [[सी.बी.डी. बेलापूर|बेलापूर]], [[रत्‍नागिरी]], [[सासवड]], [[शिरवळ]] आदी गावांमध्ये शाळा आहेत.