"मोहेंजोदडो" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
छो Mv jadhav (चर्चा) यांनी केलेले बदल अभय नातू यांच्या आवृत्तीकडे पूर...
No edit summary
खूणपताका: मोबाईल संपादन मोबाईल वेब संपादन
ओळ १:
'''मोहेंजोदडो''(मृतांचा डाेंगर)' हे [[पाकिस्तान|पाकिस्तानातील सिंध प्रांतातील]] गाव आहे. येथे केल्या गेलेल्या पुरातत्त्वीय उत्खननात एकावरएक ७ गावांचे थर आढळले आहेत.
 
मोहेंजोदडो येथे एका भव्य स्नानगृहाचे अवशेष सापडले. या स्नानगृहाची लांबी १२ मीटर, रुंदी ७ मीटर आणि खोली २.५ मीटर आहे. याच्या बाहेरच्या भिंती ७ ते ८ फूट रुंदीच्या असून कपडे बदलण्यासाठी स्वतंत्र खोल्यांची व्यवस्था होती. स्नानगृहात वापरलेले पाणी बाहेर सोडण्याची व शुद्ध पाणी आत आणण्याची व्यवस्था केलेली होती.