"दिवाळी अंक" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
खूणपताका: अविश्वकोशीय वर्णनात्मकता ?
बदल
खूणपताका: कृ. कॉपीराईट उल्लंघने शोधून वगळण्या करतासुद्धा तपासावा. संदर्भा विना भला मोठा मजकुर !
ओळ १:
{{दिवाळी अंक मथळासंपादनसूचना साचा}}
दिवाळीअंक हे [[मराठी साहित्य|मराठी वाङमयीन]] संस्कृतीचे वैशीष्ट्यपूर्ण अंग आहे. [[दिवाळी]] सणाच्या सुमारास निघणाऱ्या विशेष अथवा वार्षिक [[नियतकालिक|नियतकालिकांना]] दिवाळी अंक असे म्हणतात.
 
{{बदल}}
 
 
दिवाळीअंक हे [[मराठी साहित्य|मराठी वाङमयीन]] संस्कृतीचे वैशीष्ट्यपूर्ण अंग आहे. [[दिवाळी]] सणाच्या सुमारास निघणाऱ्या विशेष अथवा वार्षिक [[नियतकालिक|नियतकालिकांना]] दिवाळी अंक असे म्हणतात.
 
''मनोरंजन'' हा सन १९०९ साली छापला गेलेला मराठीतला प्रथम दिवाळी अंक होता.<ref>http://www.tarunbharat.net/news.detail/news_id/47747</ref> सन २००९ मध्ये दिवाळी अंकांचे शतक पूर्ण झाले आहे.दिवाळीचा फराळ, फटाके, मिठाया या समवेतच ''दिवाळी अंक'' ही सुशिक्षित व साहित्यप्रेमी घरांसाठी एक आवश्यक घटक आहे. पूर्वीचे दिवाळी अंकात मनोरंजनासमवेतच परंपरा,संस्कृती याची माहिती असे. काळानुरूप त्यात बदल झाला आहे.
Line ८३ ⟶ ८२:
 
स्पर्धेत भाग घेण्यासाठी प्रवेश फी नसून या स्पर्धेत सहभागी होऊ इच्छिणा-यानी आपल्या दिवाळी अंकाच्या सहा (6) प्रती नोंदणीकृत टपाल किंवा कुरिअर मार्फत या संस्थेकडे दिनांक 31 डिसेंबर 2014 पर्यंत किवा तत्पूर्वी पोहोचतील अशा बेताने डॉ. सुनिल पाटील, कार्यकारी संचालक - आंतरराष्ट्रीय दिवाळी अंक संघटना, सुदर्शन पॅलेस, प्लॉट # 16, पद्मावती सोसायटी, बायपास रोड, नांदणी नाक्याजवळ, माय स्कूलच्या पाठिमागे, जयसिंगपूर - 416101, तालुका - शिरोळ, जिल्हा - कोल्हापूर, महाराष्ट्र sunildadapatil@gmail.com, sunil77p@rediffmail.com, या पत्यावर पाठवाव्यात किंवा 02322 - 225500, 09975873569 या क्रमांकावर संपर्क साधावा. या स्पर्धेचा निकाल विजेत्या दिवाळी अंकाच्या नावासकट बातमीच्या माध्यमातून सर्व मान्यवर मराठी दैनिके, साप्ताहिके, आकाशवाणी केंद्रे, दूरदर्शन तसेच खासगी दुरचित्रवाहिन्याकडे प्रसिद्धीसाठी पाठवले जातील. तसेच या दरम्यान दिवाळी अंकांचे प्रदर्शनहि भरवण्यात येणार असून प्रदर्शनात मांडण्यासाठी दोन अंक पाठवावे. ज्यांनी स्पर्धेसाठी अंक पाठवलेले असतील त्यांनी प्रदर्शनासाठी वेगळे अंक पाठविण्याची आवश्यकता नाही. प्रदर्शनास कोणत्याही प्रकारचे प्रवेश शुल्क आकारण्यात येणार नाही. मागील वर्षी सर्व स्तरातून 500 पेक्षा अधिक दिवाळी अंक सहभागी झाले होते, प्रतिवर्षी दिवाळी अंकांची स्पर्धा वाढते आहे व स्पर्धकांचीही संख्या वाढते आहे. मागील स्पर्धेचा निकाल व संक्षिप्त अहवाल एखाद्या स्पर्धकाने लेखी मागणी केल्यास त्यास तो टपालाने पाठविला जाईल.
 
==पहिला दिवाळी अंक==
इ.स. १८८५ मध्ये सुरू झालेल्या आणि [[काशीनाथ रघुनाथ मित्र|का.र. मित्र]] हे संपादक आणि मालक असलेल्या ’मनोरंजन’ मासिकाने मराठीतला पहिला दिवाळी अंक काढला होता.
 
हल्ली मराठी नियतकालिकांच्या सृष्टीत प्रतिवर्षी दिवाळी अंकांची पर्वणी असते. लेखक, प्रकाशक, संपादक व वाचक, सर्वांचाच उत्साह तेव्हा जणू शिगेला पोचतो; ललित वाङ्मयाच्या अनेक
शाखांमधील प्रतिवर्षाच्या स्थितिगतीचे स्वरूप एकदम लक्षात येण्याला वाव मिळतो. ह्या योजनेला ‘मनोरंजन’ने चालना दिली.
 
‘मनोरंजन’ने आपल्या १९०१ च्या नोव्हेंबरच्या अंकात दिवाळीसंबंधी काही खास लेख घालून आणि अधिक कविता व गोष्टी देऊन दिवाळीनिमित्त आपला पहिला थोडा मोठा अंक काढलेला आढळतो.
 
असे असले तरी खर्‍या अर्थाने ‘मनोरंजन’ने १९०९ मध्ये मराठी नियतकालिकांच्या सृष्टीतील खरा पहिला दिवाळी अंक प्रसिद्ध केला. [[बालकवी|बालकवींच]]ी ‘आनंदी आनंद गडे’
[[चंद्रशेखर]] यांची ‘कवितारति’ ह्या प्रसिद्ध कविता, [[वि.सी. गुर्जर]] ह्यांचे ‘वधूंची अदलाबदल’ हे प्रसिद्ध प्रहसन आणि महाराष्ट्रातील तत्कालिन प्रसिद्ध लेखक, प्रकाशक, वकील, मुत्सद्दी, नट इत्यादींची छायाचित्रे ही ह्या अंकाची काही वैशिष्ट्ये होती.
 
पुुढील वर्षीच्या म्हणजे १९१० च्या ’मनोरंजन’च्या दिवाळी अंकातील ‘महाराष्ट्राला चिरस्मरणीय' अशा जवळजवळ एकशे-पंधरा ‘विभूतीं’ची दुर्मीळ छायाचित्रे व त्रोटक चरित्रे आणि ‘वधुवरांच्या लग्नाची वयोमर्यादा’ या विषयावरील विद्वानांचा परिसंवाद, हे दोन विशेष लक्षणीय गोष्टी होत्या.
 
==मनोरंजनचे इतर खास अंक==
‘मनोरंजन’ने १९१४ साली दिवाळी अंकाबरोबर खास ललित साहित्याला वाहिलेला ‘वसंत’ अंक काढायला सुरुवात केली. ‘मनोरंजन’ने आपल्या पहिल्या ‘वसंत’ अंकात प्रथमच आपल्या सर्व लेखक-लेखिकांची छायाचित्रे दिली होती.
 
‘मनोरंजन’चा १९११ सालचा अंक ‘दिल्ली दरबार विशेषांक’ होता. त्या अंकात [[श्रीपाद कृष्ण कोल्हटकर]] यांचा ‘आमचे बैठे खेळ’ हा प्रसिद्ध विनोदी लेख व [[विठ्ठल सीताराम गुर्जर]] यांची
‘हरवलेली आंगठी’ ही गोष्ट प्रसिद्ध झाली होती. ‘आमचे महाराष्ट्रीय राजपुरुष’ ही सचित्र चरित्रमाला हे सदर अंकाचे विशेष आकर्षण होते.
 
ह्या 'खास' अंकांच्या क्षेत्रातील ‘मनोरंजन’ची वाङ्मयाच्या व समाजेतिहासाच्या दृष्टीने उल्लेखनीय कामगिरी म्हणजे त्याने प्रसिद्ध केलेले व्यक्तिविशेषांक : १९१६ साली काढलेला [[गोपाळ गणेश आगरकर|आगरकर]] खास अंक, १९१८ साली काढलेला [[धोंडो केशव कर्वे|महर्षी कर्वे]] ज्युबिली खास अंक व १९१९ साली काढलेला [[हरी नारायण आपटे|हरिभाऊ आपटे]] खास अंक. हे खास अंक पुढे ‘रत्‍नाकर’, ‘प्रतिभा’, ‘पारिजात’, ‘ज्योत्स्ना’ यांच्या काळात प्रसिद्ध झालेल्या तशा प्रकारच्या अनेक अभ्यसनीय खास अंकांचे अग्रदूत ठरले. त्यातील लेखन मोठ्या आस्थेने जमवलेले व संपादित केलेले आहे. त्यातील बहुमोल लेखांबरोबर त्यातील दुर्मीळ छायाचित्रे व त्यात [[गोपाळ गणेश आगरकर|आगरकर]] व [[हरी नारायण आपटे|हरिभाऊ आपटे]] ह्यांच्या हस्ताक्षरांचे नमुने दिले होते. ‘मनोरंजन’ने व्यक्तिविशेषांकाप्रमाणेच राजकारण, समाजकारण, धर्मकारण, वाङ्मय ह्यांपैकी कोणत्याही क्षेत्रातील एखादी व्यक्ती दिवंगत होताच त्या व्यक्तीच्या निधनाची वार्ता एका अंकात देऊन त्याच्या पुढील अंकात तिच्या कार्याची यथार्थ कल्पना देणारा सचित्र लेख देण्यात कधीच कसूर केली नाही.
 
[[महादेव गोविंद रानडे|न्यायमूर्ती रानडे]], नामदार [[गोपाळ कृष्ण गोखले|गोखले]], दाजी आबाजी खरे ह्यांच्यापासून ते थेट [[केशवसुत]], [[राम गणेश गडकरी|गडकरी]], [[बालकवी]],
[[रेव्हरंड टिळक]] ह्या वाङ्मयसेवकांपर्यंत सर्वांवर ‘मनोरंजन’मध्ये मृत्युलेख लिहिले गेले आहेत व ते सगळे मृत्युलेख वाचनीय आहेत.
 
==हे सुद्धा पहा==