"श्रीकृष्ण नारायण रातंजनकर" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
(चर्चा | योगदान)
छोNo edit summary
ओळ ९:
पं.रातंजनकर हे अनेक वर्षे [[लखनौ]] येथील भातखंडे संगीत संस्थान विश्व विद्यालयाचे मुख्याध्यापक होते. (या संस्थेचे आधीचे नाव मॉरिस म्युझिक कॉलेज असे होते.) नंतर त्यांची मध्य प्रदेशातील खैरागढ(हे आता छ्त्तीसगड राज्यात आहे) येथील इंदिरा संगीत कला विश्व विद्यालयाचे कुलगुरू म्हणून नियुक्ती झाली. तिथून त्यांना पुन्हा भातखंडे संगीत संस्थान विश्व विद्यालयाच्या मुख्याध्यापकपदी २ वर्षांसाठी आमंत्रित केले गेले. मुंबईच्या भारतीय विद्या भवनाच्यी ’भातखंडे संगीत आणि नर्तन विद्यापीठा’ची स्थापना रातंजनकरांनी केली.तसेच शीव(मुंबई) येथील ’श्रीवल्लभ संगीतालय’ त्यांच्याच मार्गदर्शनाखाली आकारास आले.
 
त्यांच्या शिष्यवर्गात [[के.जी. गिंडे]], चिदानंद नगरकर, [[व्ही.जी. जोग]], [[दिनकर कैकिणी]], शन्नो खुराणा, [[सुमती मुटाटकर]], आचार्य प्रभाकर चिंचोरे, [[सी.आर. व्यास]], पं.एस.सी.आर.भट्ट, चिन्मय लाहिरी व संगीत दिग्दर्शक [[रोशनलाल]] (संगीत दिग्दर्शक) यांचा समावेश होतो.
 
त्यांनी [[आग्रा घराणे|आग्रा घराण्याच्या]] ध्रुपद व ख्याल शैलीतील अनेक रचना गायल्या. आपले उस्ताद भातखंडेबुवा यांप्रमाणेच त्यांनी ८०० पेक्षा जास्त चिजा रचल्या. या चिजा त्यांनी ''''सुजन'''' या टोपणनावाने बांधल्या होत्या. त्यांचे शिष्य [[के.जी. गिंडे]] यांनी त्या चिजांची पद्धतशीरपणे कागदोपत्री नोंद करून ठेवली आहे.
 
त्यांनी अभिनव गीतमंजरी, अभिनव संगीत शिक्षा, तानसंग्रह, हिंदुस्थानी संगीताची स्वरलिपी, यांसारखी अनेक पुस्तकेही लिहिली.