"चर्चा:दारासिंग रंधावा" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
No edit summary
खूणपताका: विशेषणे टाळा
No edit summary
ओळ ३४:
 
 
::नमस्कार श्रेयस,
::१. विकिपीडियावरील माहिती मुक्तपणे वापरता येते हे खरे असले तरी एक पत्रकाराने ती कॉपी-पेस्ट मारणे अपेक्षित नाही. असे करण्यास मज्जाव आहे कि नाही हे वकीलच सांगू शकतील.
::२. पत्रकारिता म्हणजे ''वाचलेले लिहून काढणे इतकेच नसून मिळालेल्या माहितीचा उपयोग करून विषयावर लेखन करणे'' असे असते असा माझा समज आहे. चूक असल्यास क्षमस्व.
::३. म.टा.च्या किंवा इतर ठिकाणीच प्रतिक्रिया नोंदवणे हे अपेक्षित आहे का? नसावे. आपण येथे येउन विचारणा केलीत याबद्दल तुमचे धन्यवाद. मी केलेल्या टीकेतील सगळे मुद्दे म.टा.च्या पत्रकारास उद्देशून नव्हते. आळशीपणा हा मुद्दा नक्कीच होता. कॉपी-पेस्ट करणे म्हणजे पत्रकारिता का? इतर मुद्दे (अशुद्धलेखन, मराठीचे गचाळ हिंदीकरण) हे अलीकडील वार्तांकनावरील टिप्पणी होती.
::४. आणि म.टा.च्या पत्रकाराने विकिपीडियाचा स्रोत म्हणून उल्लेख केल्याबद्दल त्यांचे धन्यवाद.
::५. टर्म्स ऑफ यूझ किंवा तत्सम कायदेशीर बाबी विकिमीडियाच्या संकेतस्थळावर स्पष्ट केलेल्या आहेत. येथील कोणीही संपादक वकील नाहीत (माहितगार कदाचित आहेत पण त्यांचा येथील ''रोल'' प्रचालक, संपादक असाच आहे). त्यावर मी (किंवा इतर सदस्यांनी) स्पष्टीकरण देणे उचित नाही.
::असो. तुम्ही व तुमचे सहकारी विकिपीडिया संदर्भस्थळ म्हणून वापराल आणि त्यात भरही घालाल अशी आशा आणि अपेक्षाही आहे. फक्त येथील लिखाण तेथे घातले असे करू नये ही विनंती. केल्यास खेद वाटेल पण त्यापलीकडे काही नाही.
::[[सदस्य:अभय नातू|अभय नातू]] ([[सदस्य चर्चा:अभय नातू|चर्चा]]) २१:३०, १७ जुलै २०१२ (IST)
 
 
 
 
"दारासिंग रंधावा" पानाकडे परत चला.